• mahesh_kale_1250by200.jpg
12 Jan 2018

Pimpri: सत्ताधा-यांविरोधांत विरोधकांची वज्रमुठ; प्रलंबित प्रश्नांबाबत धरणे आंदोलन

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड शहरातील मिळकतधारकांसाठी लावण्यात आलेला शास्तीकर संपूर्ण रद्द होणे, अनियमित बांधकामे नियमित करण्याबाबत बनविण्यात आलेली नियमावली रद्द करून नागरिकांना दिलासा मिळेल अशी नियमावली बनविण्याबाबत. त्यास राज्य सरकारची मंजुरी घेणे, शहरातील सर्व स्मशानभूमी व दफनभूमी मध्ये अंत्य संस्काराची जबाबदारी महापालिकेने घेणे आणि कालबाह्य झालेला प्रस्तावित रिंगरोड रद्द करणे, अशा विविध मागण्यांसाठी विरोधी पक्ष आणि शहरातील विविध सामाजिक संघटना शनिवारी (दि.20) धरणे आंदोलन करणार आहेत.


पिंपरीतील, डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा चौकात सकाळी दहा ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत धरणे आंदोलन करण्यात येणार आहे. या आंदोलनाच्या तयारीबाबत आज ( शुक्रवारी) पालिकेत बैठक झाली. या बैठकीला शिवसेनेचे शहरप्रमुख व पालिकेतील गटनेते राहुल कलाटे, राष्ट्रवादीचे रामदास मोरे, सामाजिक कार्यकर्ते मारुती भापकर, स्वराज अभियानाचे मानव कांबळे, काँग्रेसचे मयुर जयस्वाल, तसेच स्वाभिमानी घर बचाव संघर्ष चळवळ, भारीप, आ पीआय कवाडे गट, शेकाप, प्रहार संघटना, सीपीएम, सीपीआय, बोपखेल संघर्ष समितीचे पदाधिकारी बैठकीला उपस्थित होते. 

बैठकीनंतर मारुती भापकर यांनी आंदोलनाची पत्रकारांना माहिती दिली.  पिंपरी-चिंचवड शहरात अनियमित बांधकामांचा प्रश्न निर्माण झाल्यानंतर अनियमित बांधकामे नियमित व्हावीत. यासाठी त्यावेळी विरोधी पक्षात असणारे व आज सत्तेत असनारे भाजपचे सर्व पदाधिकारी, नेते या आंदोलनात सहभागी झाले होते. या शहरातील एकाही घराच्या विटेला धक्का लावू देणार नाही. तसेच संपूर्ण शास्तीकर रद्द करू अशी आश्वासने लोकसभा, विधानसभा, महापालिका निवडणुकीत भाजपने जनतेला दिली होती. मात्र, सत्ता आल्यानंतर भाजपला जनतेचा आणि आश्वासनांचा विसर पडला आहे.  भाजपा सत्तेवर येऊन चार वर्षे झाली तरी हे प्रश्न सुटण्याऐवजी अधिक जटील बनले आहेत.

अनियमित बांधकामे नियमित करण्याबाबत केलेला कायदा सपशेल अपयशी ठरला आहे. चार महिन्यात केवळ सात जणांचे अर्ज नियमितीकरणासाठी आले आहेत. घरे नियमित करण्यासाठी नाममात्र शुल्क आकारणे गरजेचे आहे. संपुर्ण शास्तीकर माफ करावा, कालबाह्य रिंगरोड रद्द करण्यात यावा, अशा विविध मागण्यांसाठी  हे धरणे आंदोलन करण्यात येणार असल्याचे, मारुती भापकर यांनी सांगितले.

Like what you see?

Close

Hit the buttons below to follow us

0
Shares