• mahesh_kale_1250by200.jpg
12 Jan 2018

Kalewadi : पतंगाचा मांजा ठरतोय जीवघेणा
लहान मुलापाठोपाठ ज्येष्ठ नागरिकाच्या गळ्यालाही जखम 

एमपीसी न्यूज - काळेवाडी परिसरात पतंगाच्या मांज्यामुळे एका दोन वर्षीय मुलाच्या डोळ्याला गंभीर जखम झाल्याची घटना ताजी असताना पुन्हा एका ज्येष्ठ नागरिकाला गळ्याला जखम झाली आहे. ही घटना काल(दि 11) सायंकाळी सहा वाजता घडली. 

रंगनाथ बाळकृष्ण भुजबळ (रा.ज्योतिबा नगर काळेवाडी), असे जखमी इसमाचे नाव आहे. 

रंगनाथ हे काल सायंकाळी गाडीवरून जात असताना तापकीर चौकात त्यांच्या चष्म्यावर दोरा पडला. त्यांच्या ही बाब लक्षात यायच्या आधीच तोच मांजा रंगनाथ यांच्या गळ्याला गुंडाळला गेला होता. त्याला काढायचा प्रयत्न केला असता त्यांच्या हाताच्या अंगठ्यालाही जखम झाली. त्यांच्या गळ्याला तीन तर अंगठ्याला सहा जखम झाल्या आहेत. दोन दिवसांपूर्वी काळेवाडीतच हमजा खान या दोन वर्षाच्या मूलाचे डोळे जाता जाता राहिले. यात त्या मुलाला 32 टाके डोळ्याला पडले आहेत. संक्रात सणानिमित्त शहरात अनेक ठिकाणी मूलं पतंग उडवत आहेत. त्याचा मांजा हा नायलॉनच्या धागा असतो जो आरामात तुम्हाला इजा करू शकतो. हा धागा जीवघेणा ठरू शकतो. यात अनेक पक्ष्यांनी आपले जीव गमावले आहेत. तर आता नागरिकांनाही त्याची इजा पोहोचत असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे पतंग खेळताना काळजी घेणे गरजेचे आहे.

manja

Like what you see?

Close

Hit the buttons below to follow us

0
Shares