• mahesh_kale_1250by200.jpg
12 Jan 2018

Pune : थंडी पळाली, पुण्याचा पारा १३. ५ वर
एमपीसी न्यूज - गेल्या दोन दिवसापासून पुणे शहर परिसरातील पारा काहीसा वाढला असून थंडीने शहरातून पळ काढला आहे. ढगाळ वातावरणामुळे थंडीची तीव्रता कमी झाल्याने किमान तापमानाचा पारा 13.5 अंश सेल्सिअस नोंदला गेला. परंतु बुधवारनंतर पुन्हा थंडी वाढेल, असा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला. 

कोकण, मध्य महाराष्ट्र या भागातील किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत किंचित वाढ झाली आहे. मराठवाड्यातील काही भागातही किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत किंचित चढ-उतार सुरू आहे. विदर्भातील किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत किंचित घट झाली आहे. उर्वरित भागात किमान तापमान सरासरीच्या जवळपास होते. येत्या सोमवारपर्यंत (ता. 15) गोव्यासह संपूर्ण राज्यात हवामान कोरडे राहण्याची शक्‍यता आहे. पुणे परिसरात बुधवारपर्यंत (ता. 17) आकाश मुख्यत: निरभ्र राहील, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.

मुंबई (कुलाबा) २१.२, सांताक्रूझ १९.४, अलिबाग २०.२, रत्नागिरी २०.८, पर्जी (गोवा) २१.४, लर्रा २०.५, पुणे १३.५, अहमदनगर ११.१, जळगाव --, कोल्हापूर १८.५, महाबळेश्वर १५.२, मालेगाव १३.०, नाशिक ११.६, सांगली १७.२, सातारा १५.५, सोलापूर, उस्मानाबाद ११.३, औरंगाबाद १३.०, नांदेड १३.५, अकोला १२.८, अमरावती १३.४, नागपूर ११.१, यवतमाळ १३.४.

Like what you see?

Close

Hit the buttons below to follow us

0
Shares