• mahesh_kale_1250by200.jpg
12 Jan 2018

Hyderabad : इस्रोचं शंभरावं उड्डाण; एकाच वेळी 31 उपग्रह अंतराळात सोडले
कार्टोसेट उपग्रहानं पृथ्वीचं अवलोकन करता येणार

एमपीसी न्यूज - भारतीय अंतराळ संशोधन संस्था अर्थात इस्रोने आज (शुक्रवार) आपल्या 100 व्या उपग्रहाचं प्रक्षेपण करुन नवा इतिहास रचला. इस्त्रोने श्रीहरीकोटा या प्रक्षेपण केंद्रावरुन 31 उपग्रह अंतराळात सोडून आतापर्यंत शंभर उपग्रह अंतराळात सोडण्याचा विक्रम प्रस्थापित केला आहे. श्रीहरीकोटा येथून आज सकाळी 9.29 वा पीएसएलव्ही सी 40/कार्टोसॅट 2 मिशनचं यशस्वी प्रक्षेपण करण्यात आलं.

पीएसएलव्ही सी 40 सोबत भारताने तब्बल 31 उपग्रह अंतराळात सोडले. यामध्ये 3 भारताचे तर 28 उपग्रह अन्य 6 देशांचे आहेत. या सहा देशांमध्ये फ्रान्स, फिनलँड, कॅनडा, इंग्लंड, अमेरिका आणि दक्षिण कोरियाचा समावेश आहे. या 31 उपग्रहांचं एकूण वजन 1 हजार 323 किलो आहे. हवामान निरीक्षणासाठी उपयोगात आणला जाणारा हा उपग्रह इस्रोच्या ताफ्यातला 100 वा उपग्रह आहे.

गेल्या वर्षी इस्रोचं पीएसएलव्ही सी 39 हे मिशन अपयशी ठरलं होतं. त्यामुळे भारताच्या आजच्या मोहिमेकडे संपूर्ण जगाचे लक्ष वेधले होते. या अपयशानंतरही इस्रोने पुन्हा जोमाने तयारी करुन, पीएसएलव्ही सी 40 या प्रक्षेपकाचं यशस्वी उड्डाण केलं.

Like what you see?

Close

Hit the buttons below to follow us

0
Shares