• 1250-x200.jpg
  • Advt-Baba-Tripbhun.jpg
  • Advt-Laxman-saste.jpg
  • Advt-Nitin-Kalje.jpg
  • IMG-20171212-WA0093.jpg
  • Vaishali-Kalbhor.jpg
  • Vishal-Kalbhor.jpg
07 Dec 2017

Pimpri : आरोग्य सुरक्षा साधनांचा स्वच्छता कर्मचा-यांनी वापर करावा - वैजयंता उमरगेकर
रोटरी क्लब ऑफ पिंपरी टाऊनतर्फे आरोग्य कर्मचा-यांना हातमोजे व मास्कचे वाटप

एमपीसी न्यूज - रोटरी क्लब ऑफ पिंपरी टाऊनच्या वतीने तीर्थक्षेत्र आळंदी नगरपरिषदेतील आरोग्य विभागाच्या कर्मचा-यांना स्वच्छतेसाठी हातमोजे, मास्कचे तसेच विविध सुरक्षा साधनांचे वाटप करण्यात आले. हा उपक्रम कामगारांच्या आरोग्यासाठी स्तुत्य आहे. कामगारांनी देखील या सुरक्षा साधनांचा वापर करून शहरासह आपल्याही आरोग्याची काळजी घ्यावी, असे आवाहन नगराध्यक्षा वैजयंता उमरगेकर यांनी केले.

रोटरी क्लब ऑफ पिंपरी टाऊनच्या वतीने आळंदी नगरपरिषदेतील आरोग्य विभागातील कर्मचा-यांना आज (गुरुवारी) स्वच्छतेसाठी हातमोजे आणि मास्कचे वाटप आळंदी नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा उमरगेकर यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी त्या बोलत होत्या. यावेळी रोटरी क्लब ऑफ पिंपरी टाऊनच्या अध्यक्षा वर्षा पांगारे, सचिव नीता अरोरा, प्रकल्प अधिकारी राम भोसले, उपनगराध्यक्ष सागर भोसले, सामाजिक कार्यकर्ते गणेश राहणे, दत्तात्रय काळे, कामगार नेते अरुण घुंडरे, आळंदी जनहित फौंडेशनचे अध्यक्ष राजेंद्र घुंडरे, कार्याध्यक्ष अर्जुन मेदनकर, सचिव रामदास दाभाडे, कार्यालयीन अधीक्षक रामदास भांगे, विद्युत विभाग प्रमुख दत्तात्रय सोनटक्के, शेतकरी बचाव आंदोलनाचे अध्यक्ष गजानन गाडेकर आदी उपस्थित होते.

रोटरी क्लब ऑफ पिंपरी टाऊन अतिशय चांगले उपक्रम राबवित आहे. रोटरीने पिंपरीसह आळंदी परिसरात सामाजिक उपक्रम राबवित आरोग्य सेवेचे केलेले कार्य कौतूकास्पद आहे. आळंदीत रोटरीने सामाजिक, नागरी सेवा सुविधांचे उपक्रम प्रभावीपणे राबवावेत. त्यासाठी आळंदी नगरपरिषद सर्वतोपरी सहकार्य करील अशी ग्वाही नगराध्यक्षा उमरगेकर दिली.


रोटरीच्या अध्यक्षा वर्षा पांगारे म्हणाल्या, " स्वच्छता कर्मचा-यांमुळे तीर्थक्षेत्र आळंदी आपले शहर स्वच्छ आणि सुंदर राहत आहे. स्वच्छता कामगारांचा आणि त्यांच्या कामाचा आपण नेहमीच आदर केला पाहिजे. त्यांच्याकडे स्वच्छता करणारे कर्मचारी या भावनेने न पाहता स्वच्छतादूत म्हणून पाहावे. स्वच्छतेसारखे पवित्र कार्य दुसरे कोणतेही नाही. वाटप करण्यात आलेल्या सुरक्षा साधनांचा वापर आपल्या आरोग्याचे सुरक्षेसाठी नियमित करावा. आळंदीत कामगारांचे आरोग्याचे सुरक्षिततेसाठी आरोग्य तपासणी शिबिर घेतले जाईल असेही, त्यांनी सांगितले.

आळंदीतील जलपर्णी समस्यांवर चर्चा

यावेळी आळंदी नगरपरिषद व रोटरी क्लब ऑफ पिंपरी टाऊन यांचे वतीने सुसंवाद साधण्यात आला. तीर्थक्षेत्र आळंदीतील विविध विकास कामे तसेच नागरी आरोग्य,स्वच्छता,इंद्रायणी नदी प्रदूषण, जलपर्णी,रस्ते आदी विषयावर चर्चा करण्यात आली. यात प्रकल्प अधिकारी राम भोसले, अध्यक्षा वर्षा पांगारे, सचिव नीता अरोरा, गणेश राहणे, उपाध्यक्ष सागर भोसले, रामदास भांगे, दत्तात्रय सोनटक्के आदींनी सहभाग घेतला.