• 1250-x200.jpg
  • Advt-Baba-Tripbhun.jpg
  • Advt-Laxman-saste.jpg
  • Advt-Nitin-Kalje.jpg
  • IMG-20171212-WA0093.jpg
  • Vaishali-Kalbhor.jpg
  • Vishal-Kalbhor.jpg
07 Dec 2017

Pune ; गोवंशाच्या रक्षणार्थ गो-प्रेमींसह गायी उतरल्या रस्त्यावर !
गायींच्या कत्तलीसाठी होणारी खरेदी -विक्री बंद करणारा कायदा कायम ठेवण्याची हिंदू आघाडीची मागणी

एमपीसी न्यूज - 'गाय की रक्षा देशा की रक्षा...गोमाता के सम्मान मे हिंदू उतरे मैदान में...जनम जनम का नाता है, गाय हमारी माता है...गो हिंसा नही सहेंगे...'अशा घोषणा देत गायींच्या कत्तलीकरिता होणारी खरेदी विक्री बंद करणारा कायदा रद्द करु नका या मागणीसाठी समस्त हिंदू आघाडीच्या कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर गायींसमवेत आंदोलन केले.

यावेळी समस्त हिंदू आघाडीचे कार्याध्यक्ष मिलिंद एकबोटे, गोरक्षक शिवशंकर स्वामी, संतोष गायकवाड, लोकेश कोंढरे, बाबा लांडगे, उपेन्द्र बलकवडे, कृष्णा सातपुते, प्रतिक गायकवाड, सौरभ करडे, अक्षय घोरपडे, अनिरुद्ध बनसोड, प्रशांत रेवडीकर, सनी वर्मा ,अविनाश तायडे आणि मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.

मिलींद एकबोटे म्हणाले, "कत्तलखान्यामुळे होणारे नुकसान सामान्य जनतेला माहीत नाही, परंतु सरकारला, राज्यकर्त्यांना ते अतिशय चांगले माहीत आहे. पर्यावरण खात्याने गाय, बैल आणि म्हैस यांची कत्तलीकरिता खरेदी विक्री होऊ नये, यासाठी २३ मे २०१७ रोजी आदेश जारी केला होता. हा कायदा रद्द होणार, अशी माहिती आम्हाला मिळाली असून कोणत्याही परिस्थितीत हा कायदा रद्द होऊ नये यासाठी आंदोलन करण्यात आले आहे"

गोहत्येमुळे हिंदू आणि मुस्लिम यांच्यामध्ये अविश्वासाचे वातावरण निर्माण होते. त्यामुळे देशाची राष्ट्रीय एकात्मता धोक्यात येत आहे. हिंदू धर्मामध्ये गोमातेला देवत्त्वाचा दर्जा आहे. गोवंश हत्याबंदीचा कायदा संपूर्ण देशात व्हायला हवा, असेही ते म्हणाले.