• 1250-x200.jpg
  • Advt-Baba-Tripbhun.jpg
  • Advt-Laxman-saste.jpg
  • Advt-Nitin-Kalje.jpg
  • IMG-20171212-WA0093.jpg
  • Vaishali-Kalbhor.jpg
  • Vishal-Kalbhor.jpg
07 Dec 2017

Chinchwad : श्री मोरया गोसावी संजीवन समाधी महोत्सव नेत्रचिकित्सा व महाआरोग्य शिबिराचा 417 जणांनी घेतला लाभ
एमपीसी न्यूज - श्रीमन महासाधू श्रीमोरया गोसावी संजीवन समाधी महोत्सवानिमित्त नगरसेविका अश्विनी गजानन चिंचवडे यांच्या वतीने घेण्यात आलेल्या नेत्रचिकित्सा व महाआरोग्य शिबिराचा 417 जणांनी लाभ घेतला.

चिंचवड येथे आज (गुरुवारी) झालेल्या आरोग्य शिबिराचे ज्येष्ठ नागरिक सूर्याजी गावडे, क्रांतिवीर चापेकर स्मारक समितीचे शंकरराव देशमुख, उत्सव समितीचे पांडुरंग बेणारे, गजानन चिंचवडे, सुनीता चव्हाण यांच्या हस्ते उद्घाटन झाले.

महान गणेशभक्त श्रीमन् महासाधू श्री मोरया गोसावी यांच्या 456 व्या संजीवन समाधी महोत्सवात पिंपरी-चिंचवडकरांना विविध अध्यात्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांची मेजवानी मिळत आहे. या महोत्सवात दरवर्षी नगरसेविका अश्विनी चिंचवडे यांच्या वतीने आरोग्य शिबिराचे आयोजन केले जाते. दरवर्षीप्रमाणे यंदा देखील आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.

या आरोग्य शिबिराचा परिसरातील ज्येष्ठ नागरिक, महिलांनी मोठ्या संख्येने लाभ घेतला. त्यामध्ये 417 जणांची आरोग्य तपासणी करण्यात आली. त्यापैकी 238 जणांना अल्पदरात चष्म्याचे वाटप करण्यात आले. डॉ. एस.एस.चव्हाण, डॉ. आर. वाय.चव्हाण, डॉ. दत्ता संजय मोहरले व त्यांच्या पथकाने रुग्णांची तपासणी केली. दत्तात्रय संगमे, उमेश इनामदार, पूजा पाखरे यांनी संयोजनात पुढाकार घेतला.