• 1250-x200.jpg
  • Advt-Baba-Tripbhun.jpg
  • Advt-Laxman-saste.jpg
  • Advt-Nitin-Kalje.jpg
  • IMG-20171212-WA0093.jpg
  • Vaishali-Kalbhor.jpg
  • Vishal-Kalbhor.jpg
07 Dec 2017

Chinchwad : मोरया गोसावी संजीवन समाधी महोत्सवात अध्यात्मिक आणि सांस्कृतिक मेजवानी
एमपीसी न्यूज- महान गणेशभक्त श्रीमन् महासाधू श्री मोरया गोसावी यांच्या 456 व्या संजीवन समाधी महोत्सवात पिंपरी-चिंचवडकरांना विविध अध्यात्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांची मेजवानी मिळत आहे. महोत्सवात मंगळवार आणि बुधवार रोजी सोलापूर येथील महिलांच्या विविध प्रश्नांवर काम करणा-या अपर्णा रामतीर्थकर यांचे व्याख्यान झाले. व्याख्यानाला चिंचवड परिसरातील शेकडो नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

तुझं माझं संपवून आपलं म्हणून राहता आलं पाहिजे. आई वडिलांच्या म्हातारपणी त्यांना समजून घ्यायला हवं. नात्यांमधल्या संवेदना बोथट होत आहेत. त्यांना योग्य धार लावून नात्यांमधल्या संवेदना एका पिढीने दुस-या पिढीकडे दिल्या पाहिजे. अशा प्रकारचे उपदेश अपर्णा रामतीर्थकर यांनी आपल्या व्याख्यानात दिले.

कौटुंबिक वादांमध्ये सर्वाधिक वाद एकमेकांना समजून न घेतल्यामुळे व एकमेकांबद्दल संशय वाढल्यामुळे होत आहेत. त्यामुळे आपली तुलना इतरांशी न करता एकमेकांना समजून घेता आलं पाहिजे. समजून घेतल्याने नाती अधिक घट्ट होतात.

चिंचवड येथे श्रीमोरया गोसावी समाधी मंदिर पटांगणावर (देऊळमळा) हे सर्व कार्यक्रम होत आहेत. बुधवारी सकाळी सामुदायिक अथर्वशीर्षपठण, श्रीमोरया गोसावी चरित्र पठण झाले. त्यानंतर श्रीमोरया गोसावी यांच्या समाधीवर सामुदायिक महाभिषेक करण्यात आला. याचे संयोजन नगरसेविका अश्विनी चिंचवडे आणि गजानन चिंचवडे यांनी केले. सायंकाळी आनंदगंधर्व आनंद भाटे यांचा आनंदरंग हा सांगीतिक कार्यक्रम झाला. या कार्यक्रमात त्यांना तबल्यावर भरत कामत आणि संवादिनीवर सुयोग कुंडलकर यांनी साथ दिली.