• 1250-x200.jpg
  • Advt-Baba-Tripbhun.jpg
  • Advt-Laxman-saste.jpg
  • Advt-Nitin-Kalje.jpg
  • IMG-20171212-WA0093.jpg
  • Vaishali-Kalbhor.jpg
  • Vishal-Kalbhor.jpg
07 Dec 2017

Pune : आय टी एक्स्पो 2017 मध्ये इ-वेस्ट कलेक्शन सेंटर




एमपीसी न्यूज - कॉम्प्युटर्स अँड मीडिया डीलर्स असोसिएशनतर्फे आयोजित आय. टी. एक्स्पो 2017 मध्ये भेट देणा-या नागरिकांसाठी इलेक्ट्रॉनिक वेस्टची माहिती देण्यासाठी माहिती आणि संकलन केंद्र सुरु केल्याची माहिती आनंद कॉम्प्युटर्स सिस्टिम्सचे संचालक संजय भंडारी यांनी दिली. कृषी महाविद्यालयाच्या मैदानावर सुरु असलेल्या एक्स्पोच्या प्रवेशद्वारावरच हे संकलन केंद्र उभारण्यात आले आहे.


महाराष्ट्र प्रदूषण नियामक मंडळाची मान्यताप्राप्त 'इ -वेस्ट' एजन्सी असलेल्या 'आनंद कॉम्प्युटर्स सिस्टिम्सच्या या माहिती आणि संकलन केंद्रात इलेक्ट्रॉनिक कचरा, पुनर्वापर याबद्दल माहिती दिली जात आहे. तसेच नागरिकांनी आणलेले 'इ-वेस्ट' स्वीकारले जात आहे. नागरिकांना, आस्थापना आणि माहिती-तंत्रज्ञान कंपन्यांना; इ-वेस्ट बद्दल असलेल्या शंकांचे समाधान करण्यासाठी, संकलनासाठी हेल्पलाईन देखील सुरु करण्यात आली आहे. अधिक माहितीसाठी 9371015373 या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

भारतात दरवर्षी 50 मेट्रिक टन इ-वेस्ट तयार होत असून पर्यावरण जपण्यासाठी इलेक्ट्रॉनिक साहित्यातून पुनर्वापर करणे हा एक प्रभावी उपाय आहे, असे यावेळी सांगण्यात आले. पुणे आय टी एक्स्पो 2017 हे प्रदर्शन सर्वांसाठी खुले असून 7 ते 11 डिसेंबर पर्यंत सकाळी 10 ते रात्री 08  यावेळेत इ-वेस्ट माहिती आणि संकलन केंद्राला नागरिकांना भेट देता येईल.