• 1250-x200.jpg
  • Advt-Baba-Tripbhun.jpg
  • Advt-Laxman-saste.jpg
  • Advt-Nitin-Kalje.jpg
  • IMG-20171212-WA0093.jpg
  • Vaishali-Kalbhor.jpg
  • Vishal-Kalbhor.jpg
07 Dec 2017

Pune : एकवीरा देवी कळस चोरीचा तपास पंधरा दिवसात लावा - शिवसेना माजी आमदार अनंत तरे

एमपीसी न्यूज - कार्ला येथील एकवीरा देवी मंदीराच्या कळस चोरी प्रकरणाला तीन महिने झाले असून अद्याप या गुन्ह्याचा तपास लागला नाही. या गुन्ह्याचा तपास सीआयडीकडे देऊन पंधरा दिवसात गुन्ह्याचा तपास लावावा अन्यथा पोलीस ठाण्यावर मोर्चा काढण्यात येईल असा ईशारा शिवसेनेचे माजी आमदार अनंत तरे यांनी पत्रकार परिषदेत दिला.

कार्ला येथील कार्ला देवी मंदीराच्या कळसाच्या चोरीला तीन महिन्यांचा कालावधी होऊन गेला आहे. परंतु अद्याप या गुन्ह्याचा तपास लागला नसून लोणावळा पोलीस ठाण्याच्या सहायक पोलीस फौजदार साधना पाटील या चुकीच्या पद्धतीने तपास करत आहेत. त्यांना या तपासात अपयश आले असून त्यांचे निलंबन करण्यात यावे अशी मागणी गृहराज्य मंत्री दिपक केसरकर यांच्याकडे केली असल्याचेही त्यांनी सांगितले.