• 1250-x200.jpg
  • Advt-Baba-Tripbhun.jpg
  • Advt-Laxman-saste.jpg
  • Advt-Nitin-Kalje.jpg
  • IMG-20171212-WA0093.jpg
  • Vaishali-Kalbhor.jpg
  • Vishal-Kalbhor.jpg
07 Dec 2017

Pune : छत्रपती संभाजीराजे उद्यानामधील मत्सालयाच्या प्रवेश शुल्कात वाढ

एमपीसी न्यूज - जंगली महाराज रस्त्यावरील महापालिकेच्या छत्रपती संभाजी राजे उद्यानामधील मत्सालयाच्या प्रवेशासाठी प्रौढास दोन रुपये आणि लहान मुलांला एक रुपया शुल्क आकारले जात आहे.  त्यामुळे मत्सालयाचा वाढीव विस्तार पाहता प्रवेश शुल्कात वाढ करुन ते प्रौढास 20 रुपये आणि लहानास 10 रुपये करण्याचा प्रस्ताव पालिका प्रशासनाने स्थायी समितीपुढे ठेवला आहे.
स्थायी समितीच्या बैठकीच्या कार्यपत्रिकेवर हा प्रस्ताव ठेवण्यात आला आहे.

पालिका आयुक्त कुणाल कुमार यांनी हा प्रस्ताव ठेवला आहे. पुणे महापालिकेचे स्वत:चे गोडया पाण्यातील शोभिवंत माशांचे मत्सालय 1 ऑगस्ट 1953 पासुन कार्यरत आहे. या मत्सालयाची जागतिक मत्सालयात 1971 साली नोंदणी करण्यात आली आहे. हे मत्सालय सुरु करताना 45 लोंखडी टाक्या होत्या. या टाक्यामध्ये शोभिवंत मासे प्रदर्शीत करण्यासाठी ठेवण्यात आले होते. त्यानुसार नागरिकाकडुन प्रवेश शुल्क प्रौढास 1 रुपये, लहान मुलसाठी 0.50 पैसे आकारण्यात येत होते. 1 जानेवारी 1994 ते 18 मे 1994 या कालावधीत हे मत्सालय बंद ठेवून त्यांचे नुतनीकरण करण्यात आले होते. त्यात लोंखंडी साचा काढुन सिमेंटच्या टाक्या बनवून पढील भागात काच बसविण्यात आली होती. त्यानंतर पौंढांना 2 रुपये आणि लहान मुलांना 1 रुपये शुल्क आकारण्यात येऊ लागले.या मत्सालयाचे 2004 दुस-यांदा नुतनीकरण करण्यात आले.

छत्रपती संभाजीराजे उघानामध्ये हे मत्सालय असल्याने सर्व थरांतील नागरिकांचा प्रतिसाद मिळत आहे.शालेय सहली आणि अभ्यास यांना शास्त्रीय पध्दतीने मत्संगोपणाबाबत माहिती देण्यात येते. मत्सालयासाठी जागा अपुरी होत असल्याने त्यांच्या विस्तारीकरणाची गरज भासू लागली आहे. नागरिकांनीही मोठया आकारातील मत्सालयाची आणि आणखी विविध प्रकारचे मासे पाहण्याची संधी उपलब्ध करुन देण्याबाबत तोंडी विनंती केली होती. त्यानुसार खात्याने मत्यालयाच्या मागील बाजूस आणि पोर्चमध्ये मोठया आकाराचे अध्यावत वैविध्यपुर्ण मत्सालय विस्तारीत केले आहे. या मत्सालयाचे  लवकरच लोकापर्ण नियोजले असुन सर्व तयारी अंतिम टप्पात आहे. सध्याचे प्रचलित दर प्रौढास 2 रुपये आणि लहान मुलांला एक रुपया हे फारच कमी आहेत. त्यामुळे मत्सालयाचा वाढीव विस्तार पाहता प्रोंढास 20 रुपये आणि लहानास 10 रुपये आकारावे असे या प्रस्तावात नमुद केले आहे.