• 1250-x200.jpg
  • Advt-Baba-Tripbhun.jpg
  • Advt-Laxman-saste.jpg
  • Advt-Nitin-Kalje.jpg
  • IMG-20171212-WA0093.jpg
  • Vaishali-Kalbhor.jpg
  • Vishal-Kalbhor.jpg
07 Dec 2017

Pimpri : रात्री अकरा वाजता सुटणारी पुणे-तळेगाव लोकल रद्द; सोशल मीडियावर प्रवाशांच्या तिखट प्रतिक्रिया

एमपीसी न्यूज - पुणे रेल्वे मंडळाने मंगळवार (दि. 5) रोजी अचानक रात्री अकरा वाजता सुटणारी पुणे-तळेगाव लोकल आणि रात्री 12.05 वाजता सुटणारी तळेगाव-पुणे लोकल रद्द करण्यात आली असल्याचा
 निर्णय जाहीर केला. यावरून सोशल मीडियामध्ये प्रवाशी अत्यंत तिखट प्रतिक्रिया देत असून रेल्वे प्रशासनाविरोधात मोर्चा काढण्याची देखील प्रवाशांनी तयारी दर्शविली आहे.

रात्री अकरा वाजता सुटणारी पुणे-तळेगाव (गाडी क्रमांक 99908) आणि मध्यरात्री 12.05 वाजता सुटणारी तळेगाव-पुणे (गाडी क्रमांक 99901) या गाड्यांना प्रवासी संख्या कमी असल्यामुळे लोकल तोट्यात जात आहे, असे कारण पुढे करत पुणे रेल्वे मंडळाने या दोन गाड्या रद्द करण्यात आल्याचे प्रवाशांच्या माथी मारले. पुणे-तळेगाव मार्गावर दररोज लाखो प्रवासी प्रवास करत आहेत. लाखो प्रवासी कामासाठी पुण्याकडे व पुण्याकडून तळेगावकडे जातात. रात्री उशिरा कामावरून येणारे प्रवासी या लोकलने घरी परतत असतात. तसेच मध्यरात्री प्रवास करणारे प्रवासी देखील या लोकलने प्रवास करतात. त्यामुळे या रात्रीच्या लोकलफे-या नागरिकांसाठी अधीक फायद्याच्या ठरत आहेत.

11 मार्च 1978 रोजी पुणे लोणावळा इलेक्ट्रिकल मल्टिपल युनिट (ईएमयू) लोकलची सुरुवात झाली. लोकलसेवा सुरु झाल्याने नागरिकांना या मार्गावर प्रवास करणे अत्यंत सोयीचे झाले. तसेच या मार्गावरील नागरिकांना वेळेवर कामावर पोहोचणे सोपे झाले. ईएमयू लोकलपूर्वी सेकंड क्लास कंपार्टमेंट ट्रेन सुरु होती. या ट्रेनचा वेग कमी होता. ईएमयू च्या येण्याने रेल्वेच्या नियमिततेमध्ये सुधार झाला. ही रेल्वे तात्काळ वेग घेते व कमी वेळात थांबते. पुणे ते लोणावळा हे 63 किलोमीटरचे अंतर आताची लोकल केवळ दीड तासात पार करते. एक्सप्रेस वगळता इतर गाड्या हे अंतर पार करायला सुमारे दोन ते अडीच तास लावतात. त्यामुळे लोकलला पुणेकर नागरिक अधिक पसंती देऊ लागले. दिवसेंदिवस लोकलला प्रतिसाद वाढला.

सुरुवातीला नऊ डब्यांची असलेली लोकल 2010 साला दरम्यान 12 डब्यांची करावी लागली. तरी देखील प्रवासी संख्या वाढत चालली. 12 डब्यांच्या गाडीत बहुतांश फे-यांमध्ये पाय ठेवायला जागा मिळेना झाली. 
आज दिवसाला पुणे लोणावळा मार्गावर 40-45 फे-या होत आहेत; त्यातील काही फे-या तळेगाव ते पुणे आणि शिवाजी नगर ते तळेगाव किंवा लोणावळा दरम्यान होत आहेत. प्रवाशांची लोकलला पसंती वाढली पण लोकलने त्यात सुधारणा करण्याऐवजी नागरिकांना त्रास होईल असेच धोरण अवलंबिले.

लोकल लेट होण्याचे प्रकार दररोज नियमितपणाचे झाले. नागरिकांनी देखील त्याची सवय करून घेतली. आजही लोणावळा स्थानकावरून सकाळी 10.10 वाजता सुटणारी लोकल सकाळी 10.37 वाजता तळेगाव स्थानकावर पोहोचणार अशी वेळ देण्यात आली आहे. परंतु ही लोकल 10.50 शिवाय तळेगाव स्थानकावर येतच नाही. अशीच परिस्थिती अजून ब-याच लोकल गाड्यांची आहे. सकाळी 08.20 वाजता लोणावळा स्थानकावरून सुटणा-या लोकलला दररोज तुडुंब गर्दी असते. गर्दीमुळे बाहेर लटकून प्रवास करावा लागत आहे. बाहेर लटकलेले प्रवासी पडल्याच्या देखील ब-याच घटना घडल्या आहेत.

याबाबतच्या सर्व नोंदी रेल्वे प्रशासनाकडे आहेत. त्यावर सकारात्मक किंवा प्रवाशांच्या हिताचे निर्णय घ्यायचे सोडून प्रवाशांच्या अहिताचा निर्णय घेण्यात पुणे रेल्वे मंडळाने कसलीही कसर केली नाही. प्रवाशांसाठी नवीन चार लोकल पुणे रेल्वेमध्ये दाखल झाल्या. त्या लोकल अन्य लोकलपेक्षा अधिक वेगवान आहेत. त्यात पुढील स्थानकाची घोषणा होते, असे सांगण्यात आले. पण या लोकलसुद्धा उशिरा धावू लागल्या. त्यात कसलीही घोषणा होत नाही. उलट या लोकल वेग घ्यायला आणि थांबायलाच उशीर करू लागल्या. गाडीमध्ये मोकळी जागा खूप मिळू लागली. पण होणारा उशीर कायमच आहे.

लोकल गाड्या वाढवा, गाड्यांची वारंवारिता वाढवा, डब्यांची संख्या वाढवा, सुरक्षा वाढवा अशा प्रकारच्या मागण्या वेळोवेळी करत आहेत. पण त्यांच्या मागण्यांची रेल्वे प्रशासनाने प्रत्येक वेळी निराशाच केली आहे. लोकलमध्ये मोबाईलचो-या किंवा दागिने हिसकावून पळणे अशा घटना वारंवार घडत आहेत. पण त्यावर कोणीच काही करायला तयार नाही.

नागरिक गर्दीत प्रवास करत असतील तरच लोकल फायद्याची असे सूत्र जर रेल्वे प्रशासन अवलंबिणार असेल तर ते साफ चुकीचे आहे. कारण लोकल किंवा रेल्वे ही शासनाने नागरिकांना दिलेली एक महत्वपूर्ण सेवा आहे. ही सेवा कधी फायद्याची ठरते तर कधी तोट्याची देखील ठरते. यामध्ये आर्थिक फायदा किंवा तोटा न पाहता. लोकांच्या व्यवस्था आणि सेवेचा विचार रेल्वे प्रशासनाने करायला हवा.

पुणे तळेगाव मार्गावरील रात्रीच्या दोन लोकलफे-या अचानक रद्द केल्याने प्रवासी नागरिक संतप्त झाले आहेत. त्यांनी सोशल मीडियामधून आपला निषेध किंवा प्रतिक्रिया नोंदविण्यास सुरुवात केली आहे. एमपीसी न्यूजच्या फेसबुक पेजवरील पोस्टला प्रवासी नागरिकांच्या काही तिखट प्रतिक्रिया आल्या आहेत. त्या प्रतिक्रिया जशा आहेत तशा :

# अक्षय गायकवाड - Dokeeeee firleee aheeee...

# पियुष वझलवार - जपान मध्ये क्यू-शिराताकी नावाच्या शेवटच्या स्टेशन पर्यंत ट्रेन सोडण्यात येत असे फक्त एक शाळकरी मुलीला ने-आण करण्यासाठी. तिचं शालेय शिक्षण पूर्ण होत पर्यंत फक्त एका मुलींसाठी ट्रेन अंतिम स्थानक जेथे फक्त एक प्रवासी असतो त्या स्थानक पर्यंत जात असे जी नुकतीच त्या मुलीचे शिक्षण संपल्यावर अली कडच्या स्टेशन पर्यंत परावर्तित केली गेली. ही आहे जपान रेल्वे आणि तिथल्या सरकार ची प्रत्येक व्यक्ती विषयी ची काळजी आणि संवेदनशीलता.

नाही तर भारतीय रेल.. सब के साथ खेल

# विनोद रमण - एवढा खर्च करून मेट्रो कशाला बांधायची मग

# कीर्ती जोशी - ----- वाटू द्या जरा. काल रात्री 12 वाजता पुण्यावरून निघालेली लोकल तळेगाव मध्ये पहाटे 3 वाजता आली. काय चाललंय ?

# चंद्रशेखर पत्रे - रेल्वे वाल्यांचा अजब मनमानी कारबार. . . . समजा जर लोणावळाचे प्रवासी पुण्याला आले आणि त्यांना उशीर झाला, तर बायका पोरांना घेऊन स्टेशन वर मुक्काम करायचे का? पुण्यावरून तळेगावकडे मध्यरात्री जाणा-या किंवा काम करणा-या नागरिकांना पुण्यामध्येच रात्र घालवावी लागेल. रेल्वेमंत्री झोपले का?

# राहुल रमेशराव मुणगिकर - पुणे ते लोणावळा या दरम्यानच्या सर्व भागात रेल्वे प्रवासी संघ आहेत. परंतु अजूनपर्यंत एकाही संघाने साधा याचा निषेध नोंदवला नाही किंवा यावर प्रतिक्रिया दिलेल्या नाही. या प्रवासी संघात बहुतेक ठिकाणचे लोक रेल्वेने नियमित प्रवास करीत नाहीत. यापेक्षा दुर्दैव ते काय???

# चंद्रशेखर पत्रे - प्रवासी संघ हे नावापुरते असावा हे संघटना कधीतरी जागा होतो असे वाटते.

# उपेंद्रभाऊ उंडे - मागच्या 30 वर्षात विशेष असा कोणताही बदल झाला नाही. पुणे लोणावळा लोकल मध्ये. रेल्वे मंत्री याना tweet करा.

# डॉ. अनंत परांजपे - सर्व लोकप्रतिनिधींनी याविरोधात आवाज उठविणे आवश्यक आहे. लोकलच्या 
संख्येत वाढ करायची दूरच पण आहे त्या लोकल बंद करण्यात येत आहेत. हे म्हणजे डागण्या देण्यासारखे आहे.

# उपेंद्र उंडे - यांनी गर्दी दिवाईड केली पाहिजे. तळेगाव-लोणावळा, पुणे-देहूरोड. जिथे गर्दी जास्त तिथपासून डायरेक्ट लोकल चालू केली पाहिजे. चार ट्रॅक केले पाहिजेत. ज्याप्रमाणे लोकसंख्या वाढत आहे, त्याप्रमाणे सुविधा पुरवल्या पाहिजेत.

# श्रेेेयस श्रीधर पाटील - आपल्याला होत असलेल्या त्रासा बद्दल आम्ही दिलगीर आहोत ! असं म्हटलं की संपल ह्यांच काम, मग प्रवाशांचे किती का हाल होईनात.

# प्रभाकर पार्थसारथी - लोकल लेट आहे, याची अनाउंसमेंट बहुतेक वेळेला होतच नाही.

# प्रणव नि-हाली - जे कमी आहेत, पण 9 नंतरचे प्रवासी आहेत, त्यांनी काय सकाळी 5:30 च्या लोकलची वाट बघायची का? ----- सारखे निर्णय घेतात. आंदोलन झालेच पाहिजे.

# मुकुंद देव - चुकीचा निर्णय

# राजेश बाफना - लोणावळा - पुणे लोकलचे सर्व टाईम टेबल कोलमडले असून सर्व ट्रेन लेट होत आहेत. सर्व शांळा काॅलेजच्या परीक्षा चालू आहेत. तसेच कामगार वर्गाचे पण खूप त्रास होतो आहे.

# प्रसाद लोणकर - प्रवासी संघाचे पदाधिकारी फक्त फोटोपुरते उरलेत आणि रेल्वेचे अधिकारी गेंड्याच्या कातडीचे झालेत. मुंबईतील प्रवाशांप्रमाणे आता रूळावर उतरायची वेळ आली आहे. निवेदन देऊन ते ऐकणार नाहीत एखाद्या हिंसक आंदोलनाची चपराक बसल्याशिवाय प्रवासी संघटनेचे तथाकथित नेते व अधिकारी ऐकणार नाहीत.

# उत्तरा जोशी - लज्जास्पद आहे रेल्वेचा कारभार

# राहुल रमेशराव मुणगिकर - प्रवासी संगठनेच्या अधिका-यांना असे वाटत हे की सर्व लोकांनी त्यांना हात जोडून विंनंती केल्याशिवाय ते साधे पत्रही लिहणार नाहीत किंवा या बाबीचा विचारही करणार नाहीत.

'केवळ गाडी संख्या वाढवा' अशी एकच मागणी प्रवासी संघ गेली अनेक वर्षांपासून करीत आहे व प्रत्येकवेळी त्याचे निवेदन रेल्वे अधिका-यांना देतानाचे फोटो छापून आणत आहेत. निर्णय काहीही होत नाही व प्रवासी संघाचे पदाधिकारीही बदलत नाहीत. या लोकांनी कधी सर्व प्रवाशांना घेऊन मिटिंग घेतल्याचेही आठवत नाही. कोणत्याही प्रश्नावर काय चर्चा केली किंवा त्यावर प्रवासी संघ म्हणून काय करीत आहे याची माहिती देत नाही. मात्र हाच प्रवासी संघ रेल्वेच्या दृष्टीने अधिकृत असतो. तसे त्यांचे पत्र दिले जाते. याच्या पेक्षा अजून काय अपेक्षा असणार.
डॉ परांजपे म्हणतात तसे अगदी बरोबर आहे, सर्वांनीच एकत्र येऊन याचा विरोध केला पाहिजे. मग आपणच एकत्र येण्यासाठी प्रयत्न करायचा आहे तर रेल्वे प्रवासी संघ कशासाठी मान्य करायचा? त्यांना अधिकृत मान्यता दिली ती कशासाठी यावरही चर्चा होणे आवश्यक आहे व विरोधही.

प्रवासी कमी आहेत म्हणून उद्या दुपारी 12 ते 4 च्याही गाड्या बंद करतील. तेव्हा आपण सर्व जागे होणार आहात का? प्रवासी संघाचे सध्याचे धोरण म्हणजे केवळ स्वतःपुरते पाहण्यासारखे आहे. लोकांना त्रास होत असेल तर त्यांनी स्वतः विरोध किंवा आंदोलन करावे. पण जेव्हा निवेदन द्यायची वेळ येईल तेव्हा मात्र हे सर्व तिथे हजर असतील. शेवटी फोटोत तर तेच आले पाहिजे. अधिकृत मान्यता असलेले लोक आहेत.

# राजेश बाफना - ह्या वर एक ऊग्र आदोलन केले पाहीजे नाही तर रेलवे प्रशासनाला जाग येणार नाही आणि रेल्वे प्रवाशांना सोई मिळनार नाहीत. जागो प्रवासी संगठना जागो.

# पियुष वझलवार - जपान मध्ये क्यू-शिराताकी नावाच्या शेवटच्या स्टेशन पर्यंत ट्रेन सोडण्यात येत असे. या ट्रेनमध्ये शेवटच्या स्थानकापर्यंत केवळ एक शाळकरी मुलगी प्रवास करीत होती. एका मुलीला ने-आण करण्यासाठी, तिचं शालेय शिक्षण पूर्ण होईपर्यंत जपान सरकारने ती ट्रेन सुरु ठेवली. अलीकडे तीचं शिक्षण पूर्ण झाल्यानंतर ही ट्रेन अलीकडच्या स्थानकापर्यंत परावर्तित करण्यात आली. ही आहे जपान रेल्वे आणि तिथल्या सरकारची आपल्या देशातील प्रत्येक व्यक्ती विषयीची काळजी आणि संवेदनशीलता.