• 1250-x200.jpg
  • Advt-Baba-Tripbhun.jpg
  • Advt-Laxman-saste.jpg
  • Advt-Nitin-Kalje.jpg
  • IMG-20171212-WA0093.jpg
  • Vaishali-Kalbhor.jpg
  • Vishal-Kalbhor.jpg
07 Dec 2017

Pimpri: एच.ए मैदानावरील अनधिकृत झोपड्यांवर पालिकेची धडक कारवाई (व्हिडीओ)

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या अनधिकृत व अतिक्रमण बांधकाम विभागाने पिंपरीतील एच.ए मैदानावरील अनधिकृत झोपड्यांवर धडक कारवाई सुरु केली आहे. आत्तापर्यंत 50 ते 60 झोपड्या हटविल्या आहेत. गुरुवारी सकाळपासून कारवाई करण्यास सुरुवात केली आहे.


पिंपरी पालिकेच्या एच.ए मैदानावर तसेच मासूळकर कॉलनीच्या बाजूला असलेल्या़ मोकळ्या मैदानात नागरिक अनधिकृतपणे झोपड्या थाटून वास्तव्य करत होतो. या झोपडपट्यातील नागरिकांमुळे मासूळकर कॉलनी, नेहरुनगर येथील नागरिकांना त्रास होत होता. या झोपड्यांवर कारवाई करण्याची मागणी देखील करण्यात आली होती.

त्यानुसार पालिकेच्या अनधिकृत बांधकाम व नियंत्रण विभाग आणि 'क' क्षेत्रिय कार्यालयाच्या अधिका-यांनी या झोपड्यावर धडक कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. एच.ए कॉलनीतील 50 ते 60 झोपड्या हटविल्या असून मासूळकर कॉलनी येथील 25 ते 30 झोपड्या हटविल्या आहेत. तसेच झोपड्यांवरील कारवाई अद्यापही सुरुच आहे.

IMG 20171207 WA0013

IMG 20171207 WA0015

IMG 20171207 WA0014

IMG 20171207 WA0018

IMG 20171207 WA0019

IMG 20171207 WA0020

Media