• 123.jpg
  • IMG-20170812-WA0103.jpg
  • mpc.jpg
  • mpc1.jpg
  • MPC_news.JPG
05 Aug 2017

तीन आरोपी दिल्लीमधून सायबर क्राईम पोलिसांच्या ताब्यात

एमपीसी न्यूज - विजया फायनान्समधून कर्ज देण्याचे आमिष दाखवून निगडी येथील एका महिलेची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. एकूण 63 हजार 950 रुपयांची फसवणूक करण्यात आली असून प्रकरणातील तीन आरोपींना दिल्ली येथून सायबर क्राईम सेल पुणे पोलिसांनी ताब्यात घेतले आहेत. आरोपींवर माहिती तंत्रज्ञान अधिनियम कलम 66 सी, 66 डी अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

निगडी येथील एका महिलेने वेबसाईटवर लोनसाठी विनंती केली असता त्या महिलेस विजया फायनान्समधून फोन आल्याचे भासवून कर्जाच्या प्रथम नोंदणीसाठी दोन हजार 500 रुपये भरण्यासाठी सांगितले. महिलेने ती रक्कम एका बँक खात्यात भरली असता दुस-या नंबरवरून फोन करून एक लाख 60 हजर रुपयाचे कर्ज मंजूर झाले आहे. परंतु त्यासाठी प्रोसेसिंग फी व इतर वेगवेगळी करणे सांगून एकूण 61 हजर 450 रुपये विविध खात्यावर भरण्यास भाग पाडले. आरोपींनी मागितलेली रक्कम खात्यावर भरल्यानंतर देखील महिलेच्या खात्यावर कर्जाची रक्कम न आल्याने आपली फसवणूक झाल्याचे महिलेच्या लक्षात आले.

त्यावरून महिलेने निगडी पोलीस स्टेशनच्या सायबर क्राईम सेलमध्ये तक्रार दाखल केली. गुन्ह्याचा तांत्रिक तपास करत असताना आरोपी दिल्ली येथे असल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार सायबर सेलच्या पथकाने शामकुमार प्रेमकुमार झा (वय 25, रा. शिवशख मार्ग कुंदपुरी दिल्ली), उषा उर्फ ख़ुशी प्रेमलाल गुप्ता उर्फ खुशी अगरवाल (वय 26, रा. आझादपुरी, दिल्ली), दीपचंद्र शर्मन सिंग (वय 27, रा. नगला मनी, फिरोजाबाद) या तिघांना शिवमार्केट पितमपुरा दिल्ली येथे चालू असलेल्या कॉलसेंटरवर छापा मारून ताब्यात घेण्यात आले. ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपींकडून सात मोबाईल, नऊ सिमकार्ड, एक वॉकी, आठ एटीएम कार्ड, तीन पॅनकार्ड, चेकबुक असे साहित्य जप्त करण्यात आले आहे. चीफ मेट्रोपॉलिटियन मॅजिस्ट्रेट दिल्ली यांनी आरोपींना पाच दिवसांची रिमांड कस्टडी सुनावली आहे.

ही कारवाई सायबर सेलचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राधिका फडके, पोलीस निरीक्षक दीपक लगड, सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर पानमंद, पोलीस उपनिरीक्षक विक्रम मिसाळ, पोलीस हवालदार अस्लम अत्तार, पोलीस नाईक अजित कु-हे, पोलीस नाईक दीपक भोसले, राजकुमार जाबा, अमित औचरे, बाबासाहेब कराळे, अनुप पंडित, संतोष जाधव, अंकिता राघो यांनी केली. पुढील तपास निगडी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक (गुन्हे) अवताडे करीत आहेत.

कोणत्याही लोनबाबत इंटरनेट अथवा फोनवरून माहिती मिळत असल्यास त्या वेबसाईट अथवा कंपनीची खात्री करून कर्जाची रक्कम मिळाल्याशिवाय कोणत्याही कारणासाठी पैसे देऊ नयेत. तसेच विजया फायनान्सकडून किंवा फोन नंबर 011-65678910, 9899395540, 9650461295, 9870539814, 9717957518, 8586023002, 9560362684, 9717957568, 8800463756, 7550701842 या क्रमांकावरून लोनसाठी फोन करून फसवणूक केली असल्यास नागरिकांनी सायबर क्राईम सेल, गुन्हे शाखा, पुणे शहर यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.

फसवणुकीच्या गुन्ह्याची माहिती सायबर सेलच्या 020-26123346 या क्रमांकावर अथवा This email address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it. या मेल आयडीवर संपर्क करून दयावी.

05 Aug 2017

एमपीसी न्यूज - मौजमजेसाठी दुचाकी, मोबाईल, लॅपटॉप चोरणा-या दोघांना हिंजवडी पोलिसांनी जेरबंद केले. त्यांच्याकडून तीन लॅपटॉप, दोन दुचाकी असा दोन लाख 36 हजार रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे.

रविकिरण माताबददल यादव (वय 21, रा. आदर्श कॉलनी, काळेवाडी) आणि मयक भोलानाथ जयस्वाल (वय 19, थेरगाव) अशी अटक केलेल्या दोघांची नावे आहेत.

 

हिंजवडी पोलीस हद्दीत गस्त घालत होते. पोलिसांनी संशयावरुन बुधवारी (दि.2) आरोपींना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून एक मोबाईल फोन जप्त करण्यात आला. अटकेत असताना त्यांच्याकडे कसून तपास केला असता त्यांनी मौजमजेसाठी दुचाकी, लॅपटॉप चोरल्याचे निष्पन्न झाले. लोणावळा, आकुर्डी, डांगे चौक या परिसरातून दुचाकी, लॅपटॉप चोरले असल्याची आरोपींनी कबुली दिली आहे, असे पोलिसांनी सांगितले. हिंजवडी पोलीस तपास करत आहेत.

05 Aug 2017

एमपीसी न्यूज - सात हजार रुपयांची अवैध देशी दारु निगडी पोलिसांनी जप्त केली आहे. ही कारवाई आज (शनिवारी) दुपारी साडेचारच्या सुमारास निगडी, ओटास्कीम येथे करण्यात आली. याप्रकरणी मोटार चालकाविरोधात निगडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, निगडी पोलीस शनिवारी हद्दीत गस्त घालत होते. ओटास्कीम येथून जात असताना (एम.एच 14, सी 1594) या अल्टो मोटारीतून दारुची वाहतूक करण्यात येत असल्याचा पोलिसांना संशय आला. त्यामुळे पोलिसांनी मोटार थांबविली. 

मोटारीची पाहणी केली असता मोटारीत 13 ड्रम मिळून आले. त्यापैकी 11 ड्रममध्ये दारु होती. तर, दोन ड्रम रिकामे होते. 11 ड्रममधील सात हजार रुपये किमतीची 35 लिटर देशी दारु जप्त करण्यात आली आहे. निगडी पोलीस तपास करत आहेत.
Yamuna Nagar Police Chauki pakadali gavathi Daru 02
Yamuna Nagar Police Chauki pakadali gavathi Daru 03

05 Aug 2017

एमपीसी न्यूज - बाणेरमधील महाबळेश्वर हॉटेलजवळ चालत्या कारला आज (शनिवार) सायंकाळच्या सुमारास अचानक आग लागली. या आगीत कार जळून खाक झाली आहे. कारमधील एक प्रवासी आणि चालक तात्काळ बाहेर पडल्याने जीवितहानी टळली.

आग लागलेली गाडी टुरिस्ट गाडी होती. बाणेरमधून एक प्रवासी घेऊन कारचालक जात असताना महाबळेश्वर हॉटेलजवळ गाडीतून धूर येऊ लागला. कारचालकाने प्रसंगावधान राखत कार थांबवून रस्त्याच्या कडेला लावली आणि प्रवाशाला बाहेर काढले. त्यानंतर काही वेळातच गाडीने पेट घेतला.

दरम्यान, घटनेची माहिती मिळताच पाषाण अग्निशमन दलाची एक गाडी घटनास्थळी दाखल झाली आणि आगीवर नियंत्रण मिळवले. पण, तोपर्यंत कार जळून खाक झाली होती. यामुळे रस्त्याने जाणारी वाहतूक काही काळ बंद करण्यात आली होती.

05 Aug 2017

एमपीसी न्यूज - वाहतूक पोलिसाला शिवीगाळ करत मारहाण करणा-या एका तरुणाला वाकड पोलिसांनी अटक केली आहे. ही घटना शुक्रवारी (दि.4) सायंकाळी साडेपाचच्या सुमारास वाकडमधील भूमकर चौकात घडली.

किशोर भिमाजी दाभाडे (वय 34, रा. माळवाडी, मावळ), असे अटक करण्यात आलेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी वाहतूक विभागाचे सहाय्यक पोलीस फौजदार तेजलाल भालेराव यांनी वाकड पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भालेराव व त्यांचे सहकारी गारूडे शुक्रवारी वाकड येथील भूमकर चौकात वाहतुकीचे नियमन करत होते. यावेळी दाभाडे याने भालेराव व गारुडे यांना धक्का-बुक्की करत शिवीगाळ केली. ते करत असलेल्या सरकारी कामात अडथळा आणला. वाकड पोलीस अधिक तपास करत आहेत.

05 Aug 2017

एमपीसी न्यूज - राजस्थानहून ते दोघे मोबाईलचे काम शिकण्यासाठी थेरगावमध्ये नातेवाईकाकडे आले...फिरायला जाण्यासाठी ते पिंपरी रेल्वेस्थानक परिसरात गेले.. तिकीट काढण्यासाठी लोहमार्गावरून पायी निघाले... तेवढ्यात त्यांना सेल्फीचा मोह झाला...अन् दोघेही सेल्फी काढण्यात मग्न झाले ...त्याचेवळी समोरून आलेल्या रेल्वेचा आवाज हेडफोनमुळे त्याच्या कानावर पोहोचू  शकला नसल्याने तो सेल्फी एकाच्या आयुष्यातला शेवटचा सेल्फी ठरला. तर, त्याचा मित्र मृत्यूशी झुंज देत आहे.

श्रवण मलराम घांची (वय 20, रा. थेरगाव, मूळ जोधपूर, राजस्थान), असे मृत्यूमुखी पडलेल्या तरुणाचे नाव आहे. तर, त्याचा मित्र भवनसिंग बाबूसिंग राठोड (वय 19) हा गंभीर जखमी झाला आहे.

श्रवण व भवनसिंग हे दोघे राजस्थानमध्ये एकाच परिसरात राहतात. दहावीची परीक्षा दिल्यानंतर दोघेही मोबाइलचे काम शिकण्यासाठी थेरगाव येथील नातेवाईकाकडे राहण्यास आले. दोघेही सांगवी येथील नातेवाईकाच्या मोबाईल शॉपीमध्ये शिकण्यासाठी जात. 31 जुलैला दोघे फिरण्यासाठी पिंपरी रेल्वेस्थानक परिसरात आले. रेल्वेस्थानक परिसरात आले. दोघेही रेल्वेमार्गावरून तिकीटघराच्या दिशेने चालत जाऊ लागले. त्यादरम्यान, श्रवणला सेल्फी घेण्याची इच्छा झाल्याने दोघे रेल्वेमार्गावर थांबले. सेल्फी घेत असताना त्यांच्या कानात हेडफोन होता. त्याचवेळी लोणावळ्याहून पुण्याच्या दिशेने जाणारी लोकल त्यांच्या दिशेने आली.

रेल्वेचा हॉर्न वाजत होता. मात्र, हेडफोन लावल्याने त्यांना आवाज आला नाही. यामुळे लोकलने धडक दिल्याने दोघेही जखमी झाले. त्यांना रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी श्रवणचा मृत्यू झाल्याचे सांगितले. तर, भवनसिंगला उपचारासाठी पुण्यातील एका रुग्णालयात दाखल केले असून त्याची प्रकृती गंभीर आहे. 

05 Aug 2017

एमपीसी न्यूज- दादरहून पुण्याकडे जाणाऱ्या एसटी ने अचानक पेट घेतला. ही घटना आज पहाटे साडेतीनच्या सुमारास खालापूरगावच्या हद्दीत घडली. सुदैवाने एसटीमधील सर्व प्रवासी सुखरूप आहेत. शॉर्टसर्किटमुळे ही आग लागली असावी असा प्राथमिक अंदाज आहे. 

दादरहून पुण्याकडे जाणाऱ्या (एमएच 06 एस 8924 ) या निम आराम बसने खालापूरगावच्या हद्दीत अचानक पेट घेतला. घटनेची माहिती मिळताच महामार्ग पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मदतकार्य सुरु केले. सुदैवाने एसटीमधील सर्व 13 प्रवासी सुखरूप आहेत. शॉर्टसर्किटमुळे ही आग लागली असावी असा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.

04 Aug 2017


एमपीसी न्यूज – कॉलेज ऑफ कम्प्यूटर सायन्स महाविद्यालयाच्या संचालक व प्राचार्यांनी विद्यार्थ्यांच्या प्रवेश शुल्कामध्ये अवाजवी वाढ केली आहे. जी पुणे विद्यापीठाच्या नियमांना धरून नाही. त्यामुळे ही विद्यार्थ्यांची आर्थिक फसवणूक आहे, अशी तक्रार अभाविप (अखिल भारतीय विद्यार्थी परिषद) संघटनेने वाकड पोलिसांकडे केली आहे.

या तक्रारीमध्ये त्यांनी म्हटले आहे की, पुणे विद्यापीठाने प्रवेश शुल्क, त्यामध्ये करण्यात येणारी वाढ याबाबत नियम घालून दिलेले असतानाही अचानकपणे प्रवेश शुल्कात 2 ते 3 हजारांनी वाढ करण्यात आली. याविषयी विद्यापीठाकडे निवेदन देण्यात आले. ज्यामध्ये प्रवेश वाढीच्या पावत्याही जोडल्या होत्या. मात्र, ज्यांच्या पावत्या जोडल्या होत्या त्यांनी प्राचार्यांनी कार्यालयात बोलावून अर्वाच्य भाषेत बोलून तक्रार मागे घ्या अन्यथा महाविद्यालयातूल काढून टाकू अशी धमकी दिली. त्यामुळे पोलिसांनी कार्यालयाचे सीसीटीव्हीही तपासावेत.

तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य, संचालक संस्थाचालक यांच्या विरुद्ध आर्थिक फसवणुकीचा गुन्हा दाखल करावा, असे निवेदन वाकड पोलीस ठाण्याला दिले आहे.

04 Aug 2017


एमपीसी न्यूज - कोथरूड परिसरातील डिपी रोडवर अल्पवयीन मुलगा चालवत असलेल्या भरधाव कारने धडक दिल्याने एका वृद्धाचा मृत्यू झाला. हा अपघात 31 जुलै रोजी रात्री 8.00 वाजता डिपी रोडवरील गणेशकृपा सोसायटीसमोर झाला. या अपघातात उत्तम महादेव दांडगे (वय-75, रा.शिवतारा गार्डन, गणंजय सोसायटी, पुणे) यांचा मृत्यू झाला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मयत उत्तम दांडगे हे 31 जुलै रोजी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास घटनास्थळावरून दुचाकीने जात असताना हा अपघात झाला. यावेळी 17 वर्षीय अल्पवयीन मुलाचे कारवरील नियंत्रण सुटल्याने त्यांच्या दुचाकीला जोराची धडक मारली आणि घटनास्थळी न थांबता पळून गेला. यामध्ये गंभीर जखमी झालेल्या उत्तम दांडगे यांचा मृत्यू झाला.

पोलीस उप निरीक्षक दत्तात्रय वणवे अधिक तपास करीत आहेत.

04 Aug 2017


चिंचवड-आकुर्डी दरम्यानची घटना

एमपीसी न्यूज - भरधाव वेगात मुंबईच्या दिशेने जाण-या चेन्नई-अहमदाबाद एक्सप्रेस रेल्वेखाली सापडून एका तरुणाचा मृत्यू झाला. ही घटना आज (शुक्रवार) सायंकाळी सातच्या सुमारास चिंचवड ते आकुर्डी रेल्वे स्थानकाच्या दरम्यान घडली.

या घटनेत मृत्यू झालेल्या तरुणाचे अंदाजे वय 28 आहे. उंची पाच फूट रंगाने काळा सावळा आहे. अंगामध्ये लाल रंगाचा हाफ शर्ट आणि काळी जिन्स पॅन्ट घातली आहे. या तरुणाविषयी कोणाला काही माहित असल्यास त्यांनी लोहमार्ग पोलिसांकडे संपर्क साधावा, असे आवाहन लोहमार्ग पोलिसांनी केले आहे.   

04 Aug 2017


एमपीसी न्यूज - पांडवनगर परिसरात तीन डुकरांना नाल्याजवळील झाडाला दोरीने बांधून ठेवत त्यांच्यावर अत्याचार करणा-या व त्यांना व्यवस्थित खाद्य न देणा-या एका 40 वर्षीय महिलेवर पुणे पोलिसांनी अदखलपात्र गुन्हा दाखल केला आहे. पीपल फॉर अॅनिमल्सच्या (पीएफए) सदस्या विनिता वढेरा टंडन यांनी यासंदर्भात चतुःशृंगी पोलिसात तक्रार दाखल केली होती.

प्राणी जीव सेवा संस्थेचे प्रमुख अमित शहा यांना एका पत्रकाराकडून पांडवनगर येथील आनंद भरत चौकात तीन डुकरांना बांधून ठेवल्याची व काही कुत्रे त्या बांधलेल्या डुकरांना त्रास देत आहे, अशी माहिती मिळाली. त्यांनतर शहा यांनी पोलिसांना बोलवत डुकरांची सुटका केली.

विनिता टंडन यांनी केलेल्या तक्रारीवरून गणेशखिंड रस्त्यावरील चाफेकरनगरमध्ये राहणा-या बाला तुसाम यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्राण्यास निर्दयतेने वागविण्याचा कायदा 1960 अंतर्गत पोलिसांनी या महिलेवर कारवाई केली आहे.

04 Aug 2017


एमपीसी न्यूज - वर्षाविहारासाठी कामशेत परिसरात गेलेल्या पोलीस कर्मचा-याने आपल्या सहका-यांसह एका राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्याची गाडी अडवून त्याला मारहाण करत पाच हजार रुपयांची खंडणी मागितल्याचा प्रकार उघडकीस आला. ही घटना गुरुवार (4 ऑगस्ट) रोजी सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास पुणे-मुंबई द्रुतगती महामार्गावरील बऊर खिंड येथे घडली. याप्रकरणी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यातील पोलीस नाईक श्रीधर पाटील यांच्यासह पाच जणांना  कामशेत पोलिसांनी अटक केली.

प्रकरणी पोलीस नाईक श्रीधर पाटील (वय-45), वेणुदास गणपत यादव (45), शेखर ज्ञानोबा घरकुडे (42), अक्षय देवीदास नाईक (24) आणि सतिश बबन नेधे (46) या पाच जणांना अटक करून वडगाव मावळ न्यायालयात हजर केले आहे. याप्रकरणी आरपीआय कार्यकर्ते अविनाश रमेश साळवे (25, रा. करुंज) यांनी फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी अविनाश हे त्यांच्या बोलेरो गाडीने जात असताना पोलीस नाईक पाटील व त्यांच्या सहका-यांनी पाच हजार रुपयांची मागणी केली. पैसे दिले नाहीतर घरात गांजा ठेवून खोट्या गुन्ह्यात गोवण्याची धमकी दिली. याबाबत अविनाश याने पोलिसांना माहिती दिल्यानंतर तपास करुन या पाचजणांना अटक केली असून त्यांच्यावर कामशेत पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

04 Aug 2017

आईसह भावाच्या विरोधात गुन्हा
एमपीसी न्यूज - मुलीने प्रेमविवाह केल्याच्या रागातून आई आणि भावाने तिला माहेरी बोलावून अपहरण केले आणि तिचा जबरदस्तीने गर्भपात करण्याचा कट रचून मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याच प्रकरणात यापूर्वी पत्नीस मारण्याचा प्रयत्न केल्यावरून जावयाने सासूला पेटवून दिल्याचे उघडकीस आले होते. याप्रकरणी सबंधित विवाहितेने बिबवेवाडी पोलीस ठाण्यात धाव घेत आई, भाऊ आणि मित्राच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

याप्रकरणी अधिक माहिती अशी की, तक्रारदार युवतीने आईचा विरोध पत्करून सहा महिन्यांपूर्वी प्रेमविवाह केला होता. त्यानंतर ती गरोदर राहिली. तिच्या आईला ही माहिती समजल्यानंतर तिने गोड बोलून मुलीला घरी बोलावून घेतले. त्यानंतर 30 जुलै रोजी मुलीस के. के. मार्केट येथे खरेदी करण्याच्या बहाण्याने घेऊन गेले. तेथे जबरदस्तीने कारमध्ये बसवून नांदगाव येथे नेले. तेथे एका खोलीत कोंडून ठेवून नंतर तिला स्वारगेट येथील रुग्णालयात नेऊन जबरदस्तीने गर्भपात करण्याचा कट रचला. त्यासाठी तिला के. के. मार्केट येथील लॉजमध्ये कोंडून ठेवले होते. दि. 30 जुलै ते 1 ऑगस्ट या कालावधीत हा प्रकार घडला असल्याचे मुलीने दिलेल्या फिर्यादीत नमूद केले आहे.

दरम्यान, पत्नीस मारण्याचा प्रयत्न केल्यावरून दि. एक ऑगस्ट रोजी दुपारी जावयाने सासूला मारहाण करीत जाळण्याचा प्रयत्न करण्याची घटना घडली होती. या प्रकरणात युवतीच्या पतीविरोधात तिच्या आईने बिबवेवाडी पोलिसांत तक्रार दिली आहे. त्यानुसार गुन्हा दाखल केला होता. दरम्यान, युवतीनेही तिची आई आणि भावाविरोधात बिबवेवाडी पोलिसांत फिर्याद दाखल केली आहे. एखाद्या चित्रपटाच्या कथानकाशी साजेसा हा प्रकार घडला असून, या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक एस. बी. बर्गे करीत आहेत.

04 Aug 2017

अपर पोलीस आयुक्त शशिकांत शिंदे यांच्या हस्ते हिस्ट्रीशिटर्स ची गुगल लिंक 19 पोलीस ठाण्यांना प्रदान

एमपीसी न्यूज - पुणे दक्षिण विभागाचे अपर आयुक्त शशिकांत शिंदे यांच्या हस्ते हिस्ट्रीशिटर्श अर्थात रेकॉर्डवरील गुन्हेगारांची गुगल लिंक पोलीस 19 ठाण्यांना प्रदान करण्यात आली. यामध्ये पुणे शहर व उत्तर प्रादेशिक पोलीस ठाण्यांचा समावेश आहे.

ही लिंक काल (गुरुवारी) उत्तर प्रादेशीक विभाग कार्यालयात झालेल्या कार्यक्रमात प्रदान करण्यात आली. येरवडा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अशोक कदम व तांत्रिक तज्ज्ञ रियाज नदाफ यांनी ही लिक तयार केली आहे.

महापालिकांच्या निवडणुकीच्या काळात हिस्ट्रीशिटर्सची गुगल मॅपवर लिंक तयार करण्याचे काम कदम व नदाफ यांनी सुरु केले होते. त्यांच्या या कामाची नोंद घेत वरीष्ठ पोलीस निरीक्षक मुकुंद महाजन यांनी त्यांच्या प्रयोगाची माहिती परिमंडळ चारचे पोलीस उपायुक्त दीपक साकोरे यांना दिली. प्रयोगाची माहिती घेत साकोरे यांनी या दोघांना अशीच लिंक परिमंडळ चार व उत्तर प्रादेशिक विभागाकरिता बनविण्याचे आदेश दिले.

त्यानुसार 19 पोलीस ठाण्यांच्या 362 हिस्ट्रीशिटर्सच्या लिंक तयार करुन दिल्या आहेत. त्यांच्या या कामासाठी दीपेन कदम, गुलाब शिवले, शरद बांगर, गणेश पाटोळे तसेच 19 पोलीस ठाण्याच्या कर्मच्या-यांनी त्यांना मदत केली आहे.

कसा असेल लींकचा वापर

या गुगल लिंकचा वापर करुन पोलीस दलातील कोणताही अधिकारी व कर्मचारी धडक गुन्हेगारांच्या घरी पोहचू शकतो. त्यामुळे गुन्हेगारांना शोधणे अधिक सोपे होणार आहे. त्यामुळे गुन्हेगारांवरील पोलिसांचा वचक अधिक वाढणार आहे, अशी अपेक्षाही अपर पोलीस आयुक्त शिंदे यांनी व्यक्त केली. सध्या ही लिंक केवळ परिमंडळ चारसाठी बनवलेली असली तरी संपूर्ण पुणे शहराच्या पोलीस ठाण्यांसाठी अशीच गुगल लिंक तयार करण्याचे काम सुरु आहे. या सर्व लिंकचे काम पूर्ण झाल्यानंतर पोलिसांसाठी एक मोबाईल अॅप्लीकेशनही लवकरच बनविण्यात येणार आहे.

Link 1

04 Aug 2017

एमपीसी न्यूज- सिग्नलच्या उतारावर पीएमपीएमएलच्या पुढच्या चाकाखाली एक दुचाकी आल्यामुळे किरकोळ अपघात घडला. ही  घटना आज सकाळी पुण्यात जहांगीर चौकात घडली. सुदैवाने या दुचाकीवरील एक  पुरुष आणि महिला सुखरूप बचावले.

03 Aug 2017


एमपीसी न्यूज - विविध बँकांमध्ये भरण्यासाठी दिलेल्या पैशातून काही रकमेचा अपहार करणा-या चौघांना खडकी पोलिसांनी अटक केली. हा प्रकार एप्रिल महिन्यात वांरवार घडला. याप्रकरणी बँकांच्या एटीएममध्ये पैसे भरण्यासाठी नेमलेल्या सेक्युरीट्रान्स इंडिया प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीच्या चार कर्मचा-यांना अटक केली आहे. त्यांनी 97 लाख 26 हजार 600 रुपयांचा अपहार केल्याचे उघडकीस आले आहे.

अनिल रमेश नवले (वय-36, रा.नवले बिल्डिंग, पुलाची वाडी, डेक्कन जिमखाना, पुणे), बाबासाहेब गायकवाड (वय-33, रा. डॉ.आंबेडकर वसाहत औंध, पुणे), महेश शिळीमकर (वय-36, रा.चव्हाणनगर, धनकवडी) आणि प्रदीप निर्मळ (वय-36, रा. लक्ष्मीनगर, पर्वती, पुणे), अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी गणपत राऊत (वय-32, साईनाथनगर, वडगावशेरी, पुणे) यांनी फिर्याद दिली आहे.

याप्रकरणी अधिक माहिती अशी की, फिर्यादी हे कंपनीचे ऑडिट करत असताना हा प्रकार उघडकीस आला. सेक्युरीट्रान्स इंडिया प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीचा काही बँकासोबत एटीएममध्ये पैसे भरण्यासंबंधी करार झाला आहे. वर नमूद केलेले आरोपी या कंपनीत कस्टोडीयन म्हणून कामास आहेत. कंपनीने त्यांना एप्रिल महिन्यात बँकेत भरण्यासाठी सात कोटी चार लाख रुपये दिले होते. आरोपींनी त्यातील 61 लाख रुपये एटीएममध्ये भरले नाहीत. असाच प्रकार त्यांनी परत करत 36 लाख 26 हजार 600 रुपये भरले नाहीत. ऑडीटमध्ये हा सर्व प्रकार उघड झाल्यानंतर फिर्यादींनी पोलिसात धाव घेत त्यांच्याविरोधात तक्रार दिली. पोलिसांनी चौघांनाही अटक केली असून त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस उप निरीक्षक ए.के.गोरे अधिक तपास करीत आहेत.  

03 Aug 2017


दोन्ही मुली झाल्या म्हणून करत होता छळ

एमपीसी न्यूज - तुला दोन्ही मुलीच झाल्या म्हणून पतीकडून होणा-या सततच्या छळाला कंटाळून पत्नीने विष पिऊन आत्महत्या केली आहे. याप्रकरणी चिंचवड पोलीस ठाण्यात पतीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सतिश भगवान वाघ (वय 43, रा. आनंदवन सोसायटी, चिंचवड), असे आरोपी पतीचे नाव आहे.

याप्रकरणी मयत सुनीता सतिश वाघ (वय 29) यांच्या आई शकुंतला जाधव यांनी काल चिंचवड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार सुनीताला दोन्ही मुली झाल्या म्हणून सतीश तिला मारहाण करत असे, शिवीगाळ करत असे व तिचा मानसिक शारीरिक छळ करत असल्यामुळे या छळाला कंटाळून सुनीताने 23 जुलै रोजी राहत्या घरी रात्री नऊ वाजता विषारी औषध पिले. तिला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, तिचा 26 जुलै रोजी सकाळी सहा वाजता मृत्यू झाला.

याप्रकरणी पती विरुद्ध पत्नीला आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला असून पती अद्याप ताब्यात नाही. याप्रकरणी चिंचवड पोलीस अधिक तपास करत आहेत.

03 Aug 2017


साडेसात लाखांचा मुद्देमाल जप्त

एमपीसी न्यूज- पिंपरी-चिंचवड परिसरात घरफोडी करणा-या व वाहनचोरी करणा-या दोन टोळ्यांना चिंचवड पोलिसांनी  अटक केले आहे. यामध्ये पोलिसांनी सात लाख 42 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

मोटार सायकल चोरीमध्ये मोहंमद रजा सेहमसुल्ला चौधरी (वय 21 रा. कुदळवाडी, चिखली) नौशाद अकबरअली शेख (वय 19 रा. मोशीरोड, चिखली) तर घरफोडी प्रकरणी सुरेश गोरख जाधव (वय 27) अविनाश उर्फ राहुल रोहीदास मोहिते (वय 27) दोघेही राहणार रामनगर चिंचवड, सागर राम भडकवाड (वय 23 रा. दत्तनगर, चिंचवड), असे अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पहिल्या गुन्ह्यात गस्त घालणा-या पोलिसांनी पाठलाग करून आरोपींना पकडले.  त्यांच्याकडे असलेल्या वाहनांची माहिती विचारला असता त्यांनी उडवा-उडवीची उत्तरे दिली. त्यामुळे पोलिसांनी गाडीक्रमांक मोबाईल वाहन या अॅपवर टाकला असता. गाडी भोसरी भागातून चोरीला गेल्याची तक्रार पोलिसांना सापडली. त्यांनी दोघांनाही ताब्यात घेतले व सखोल चौकशी केली असता 9 मोटार सायकल चोरल्याचे त्यांनी कबूल केले. पोलिसांनी त्यांच्याकडून 3 लाख 40 हजार रुपये किमतीच्या गाड्या जप्त केल्या. तसेच त्यांच्यावरील  एमआयडीसी भोसरी, पिंपरी-चिंचवड, असे एकूण 6 गुन्हे उघडकीस आले.

तर दुस-या गुन्ह्यामध्ये 31 जुलै रोजी गस्त घालत असताना दोन संशयीत परिसरात मोटरसायकलवरुन फिरताना पोलिसांना दिसले. यावेळी पोलिसांनी त्यांना ताब्यात घेऊन चौकशी केली असता. त्यांनी घरफोडी केल्याचे कबुल केले. पोलिसांनी त्यांच्याकडून 2 दुचाकी, 60 ग्रॅम सोने, 44 हजार रोख रक्कम व 7 एलसीडी टीव्ही ताब्यात घेतले. त्यांनी केलेले चिंचवड पोलीस ठाण्यातील चार, पिंपरी दोन, निगडी एक, चाकण दोन व भोसरी एक,  असे घरफोडीचे 10 तर वाहनचोरीचे दोन, असे 12 गुन्हे उघड झाले.

या दोन्ही टोळ्यांकडून पोलिसांनी 11 मोटारसायकली, 60 ग्राम सोने, सात एलसी डी टीव्ही, एक मोबाइल, असा एकूण सात लाख 42 हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

ही कारवाई वरिष्ठ पोलीस निरीक्षक विठ्ठल कुबडे व गुन्हे पोलीस निरीक्षक विनायक साळुंखे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक सतिश कांबळे, पोलीस उप निरीक्षक प्रशांत महाले, पोलीस हवालदार विलास होनमाने, अशोक आटोळे,पोलीस नाईक स्वप्निल शेलार, सुधाकर अवताडे, चंद्रकांत गडदे, ऋषीकेश पाटील, पोलीस शिपाई मुकेश माळी, शेखर बावीस्कर, राहुल मिसाळ, सचिन वर्णेकर, अमोल माने, गोविंद डोके, पंकज भदाणे, विजयकुमार आखाडे, महिला पोलिस नाईक रुपाली पुरीगोसावी, कांचन घवले यांनी केली.
Chinchwad Police Station PC
Chinchwad Police Station PC 01Page 5 of 64
Open Chat
1
Close chat
Hello! Thanks for visiting us. Please press Start button to chat with our support :)

Start