• 123.jpg
  • IMG-20170812-WA0103.jpg
  • mpc.jpg
  • mpc1.jpg
  • MPC_news.JPG
07 Aug 2017

जीएसटीसाठी कोणतीही गोपनीय माहिती देऊ नका- जीएसटी प्रशासन

एमपीसी न्यूज -  आत्तापर्यंत एटीएम कार्ड किंवा ऑनलाईन शॉपिंगच्या नावाने फसवल्याचे तुम्ही ऐकले असेल मात्र ऑनलाईन फसवणूक करणारेही आत्ता अपडेट झाले असून त्यांनी चक्क जीएसटीच्या नावाने फसवणूक करण्यास सुरुवात केली आहे. भोसरी येथे एका महिलेची ऑनलाईन फसवणूक करण्यात आली आहे.

वैशाली कदम (वय 27 रा. केशवनगर कासारवाडी) यांनी भोसरी पोलीस ठाण्यात अज्ञात मोबाईल धारकाविरुद्ध ही तक्रार दिली आहे. त्यानुसार कदम यांना तुमच्या जीएसटीचे अपडेशन करायचे आहे. त्यासाठी तुमच्या बँकेच्या एटीएम कार्डचा व पॅनकार्डचा गोपनीय सांकेतांक (पासवर्ड) हवा आहे, असे सांगितले. त्यानुसार त्यांच्या खात्यावरून आरोपीने ऑनलाईन पद्धतीने चक्क 73 हजार 984 रुपयांची खरेदी केली. हा प्रकार फिर्यादीच्या लक्षात येताच त्यांनी पोलीस ठाण्यात धाव घेतली व मोबाईल धारकाविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.

जीएसटीची नोंदणी व अपडेशनसाठी करदात्याची गोपनीय माहिती आवश्यक नाही- जीएसटीचे अतिरीक्त आयुक्त मानकोसकर

याविषयी एमपीसी न्यूजने जीएसटीचे पुणे विभागाचे अतिरीक्त आयुक्त सुरेंद्र मानकोसकर यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी स्पष्ट शब्दात सांगितले की, करदात्यांनी अशा फोन कॉल व ईमेलला बळी पडू नये. जीएसटी नोंदणी किंवा अपडेशन फोनद्वारे होत नाही. त्यासाठी करदात्याला आमच्या संकेतस्थळाला भेट द्यावी लागते. दुसरी महत्वाची बाब म्हणजे या नोंदणीसाठी फक्त करदात्याचे नाव, त्याचा पत्ता व पॅन क्रमांक घेतला जातो. त्यासाठी एटीएम कार्डचा क्रमांक किंवा बँक खाते विचारत नाही. एवढेच नाही तर तुमच्या पॅन कार्डची माहितीही आम्ही परस्पर तपासतो. त्यासाठीही आम्ही करदात्यांना त्रास देत नाही.

त्यामुळे तुम्हाला असा गोपनीय माहिती मागणारा फोन किंवा ईमेल आला तर त्याला माहिती देऊ नका, असे स्पष्ट आवाहन मानकोसकर यांनी एमपीसी न्यूजच्या माध्यमातून केले. त्यामुळे नागरिकांनी अशा भूलथापांना बळी न पडता असा फोन क्रमांक किंवा ईमेल आयडी संबंधीत पोलिसांना कळवावा.

07 Aug 2017

ओळख पटली मात्र मृत्यूचे कारण अस्पष्ट

एमपीसी न्यूज - रावेत येथील पुलाजवळील पवना नदीपात्रात एका पुरुषाचा मृतदेह सापडला आहे. ही घटना आज (सोमवारी) चारच्या सुमारास उघडकीस आली. मृताची ओळख पटली असून मृत्यूचे कारण मात्र स्पष्ट झालेले नाही.

दिनेश भिमराव पाटील (वय 30, रा. चिखली), असे मयत इसमाचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नागरिकांनी नदीपात्रात मृतदेह दिसत आहे, अशी खबर देहूरोड पोलीस ठाण्यात दिली. माहिती मिळताच तातडीने पोलीस तेथे दाखल झाले व त्यांनी तो मृतदेह बोटीच्या सहाय्याने बाहेर काढला. पाच दिवसांपूर्वी संबंधीत इसम बेपत्ता असल्याची तक्रार देहूरोड पोलीस ठाण्यात दाखल झाली होती. त्यानुसार देहूरोड पोलिसांनी नातेवाईकांना बोलावले असता त्याची ओळख पटली.

मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पिंपरीच्या वायसीएम रुग्णालयात दाखल केला असून प्राथमिक माहितीनुसार तो मनोरुग्ण असल्याचे समोर येत आहे. मात्र, त्याच्या मृत्यूचे कारण काय व हा अपघात होता की हत्या हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. याप्रकरणी देहूरोड पोलीस अधिक तपास करत आहेत.

07 Aug 2017

प्रतिकारामुळे पीडिता थोडक्यात बचावली

एमपीसी न्यूज - स्वारगेट परिसरात एका अल्पवयीन मुलीवर दोन नराधमांनी जबरदस्तीने अत्याचार करण्याचा प्रयत्न केला. ही घटना रविवारी (6 ऑगस्ट) सायंकाळी सहा वाजण्याचा सुमारास घडली. संबंधित मुलीने जोरदार प्रतिकार केल्यामुळे पुढील अनर्थ टळला. पोलिसांनी याप्रकरणी अल्पवयीन मुलासह दोघांना ताब्यात घेतले.

कुणाल राजू वाघमारे (वय 19) अटक केलेल्या आरोपीचे नाव असून त्याला अटक करण्यात आली. तर त्याच्या अल्पवयीन साथीदारालाही पोलिसांनी ताब्यात घेतले. याप्रकरणी स्वारगेट पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पीडित मुलीच्या आईने फिर्याद दिली आहे.

याप्रकरणी अधिक माहिती अशी की, फिर्यादी महिलेची अल्पवयीन मुलगी काम आटोपल्यानंतर सॅलीसबरी पार्क येथील मिशन कंपाऊंड परिसरातून जात असताना आरोपी कुणालने तिचा हात पकडून जबरदस्तीने दूर गवतात नेऊन तिला खाली पाडले. यावेळी आरोपीसोबत असलेल्या अल्पवयीन युवकाने पीडित मुलीचे दोन्ही हात पकडले आणि तिच्यावर जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला. मात्र, संबंधित मुलीने त्यास विरोध करून आरोपीस लाथ मारून तेथून पळ काढला व स्वतःची सुटका करून घेतली.

त्यानंतर ती तिच्या घरी गेल्यांनतर वडिलांशी बोलत असताना आरोपींनी तिच्या वडिलांनाही शिवीगाळ करून मारहाण केली. पीडित मुलीच्या आईने तक्रार दिल्यानंतर स्वारगेट पोलिसांनी आरोपींना अटक केली. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक वाघमारे करीत आहेत.

07 Aug 2017

विवस्त्र फोटो कुटूंबीयांना दाखवण्याची दिली धमकी

एमपीसी न्यूज - सहकारनगरमध्ये ओळखीच्याच दोन तरुणांकडून एका अल्पवयीन मुलीवर बलात्काराचा केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. विवस्त्र फोटो आई-वडिलांना दाखवण्याची धमकी देत सतत सहा महिने हा प्रकार सुरू होता. 11 मार्च ते ऑगस्ट 2017 दरम्यान ही घटना घडली. या प्रकरणी सहकारनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आकाश प्रशांत वाघ (वय 22, रा. दत्तवाडी), निखील श्रीकांत गोडसे (वय 20, रा. धनकवडी) व त्यांच्या आणखी एका मित्रावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी 17 वर्षीय मुलीने फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित तरुणी सिंहगड रोड परिसरात राहण्यास आहे. पीडित मुलीची व आरोपी क्रमांक तीन यांची शाळेपासून मैत्री आहे. त्याच्या ओळखीतून आकाश वाघ व निखील गोडसे यांच्यासोबत पीडित मुलीची ओळख झाली होती. त्यानंतर आकाश व निखिल यांनी पीडित अल्पवयीन मुलीला तिचे स्वतःचे विवस्त्र फोटो या दोघांना पाठवण्यास भाग पाडले. फोटो मिळताच, हे फोटो पीडित मुलीच्या आई-वडिलांना दाखवण्याची धमकी देऊन तिला निखिल गोडसे याच्या बंगल्यावर बोलवून घेतले. त्यानंतर दोघांनी तिच्यावर अत्याचार केले. गेल्या सहा महिन्यांपासून हा प्रकार सुरु आहे. अधिक तपास सहकारनगर पोलीस करत आहेत.

07 Aug 2017

एमपीसी न्यूज- वाहतुकीचे नियम हे वाहनचालकाच्या सुरक्षेसाठी असतात. पण काही लोकांच्या हे डोक्यात शिरत नाही. अपघात झाल्यानंतर त्यांचे डोळे उघडतात पण तोपर्यंत वेळ निघून गेलेली असते. शनिवारी ( ता. 5 ) असाच एक प्रकार देहूरोडजवळ जुन्या पुणे मुंबई महामार्गावर पाहायला मिळाला. महाविद्यालयीन 10 तरुणांचे एक टोळके तीन दुचाक्यांवरून इतर वाहनचालकांना हुलकावणी देत आरडा ओरड करीत निघालेले पाहायला मिळाले.

देहूरोडजवळ घोरावडेश्वर डोंगरापासून कात्रज बायपास रस्त्यापर्यंत सकाळी साडेनऊच्या सुमारास तीन दुचाक्यांवर दहा महाविद्यालयीन तरुणांचे एक टोळके डोक्यात उन्माद शिरल्यासारखे आरडा ओरडा करीत निघालेले पाहायला मिळाले. दोन दुचाक्यांवे ट्रीपल सीट तर एका दुचाकीवर( एमएच 14 डी वी 9414) चक्क चार जण बसून निघाले होते. त्यापैकी एकजण त्या गाडीवर उभा राहून स्टंट करीत इतर वाहनचालकांना हुलकावण्या देत निघाला होता. त्यांना अन्य वाहनचालकांनी हटकण्याचा प्रयत्न केला असता त्याकडे दुर्लक्ष करून ते सर्वजण आणखीनच चेकाळल्यासारखे करू लागले. रस्ता आपल्यासाठीच आहे अशा अविर्भावात ते सर्वजण आरडा ओरड करीत निघाले होते.

अशा उन्मादी वाहनचालकांना कोण आवर घालणार ? यांचे डोळे अपघात झाल्यानंतरच उघडायचे. त्यांच्या अशा बेदरकार वागण्यामुळे ते आपल्या जीवाशी खेळतातच पण त्यापेक्षाही त्यांच्या या जीवघेण्या चाळ्यांमुळे इतरांचा जीव धोक्यात येतो त्याचे काय ?

Tolke 1

07 Aug 2017

एमपीसी न्यूज- आपल्या बहिणीशी प्रेमसंबंध असल्याच्या रागातून मित्रांच्या मदतीने एका भावाने तरुणावर कोयत्याने वार केले. ही घटना काल (रविवारी) दुपारी चार वाजता घडली.

ज्ञानेश्वर दशरथ शिंदे (वय 18. रा बिजलीनगर झोपडपट्टी चिंचवड) असे या हल्ल्यात जखमी झालेल्या तरुणाचे नाव आहे. किट्या ऊर्फ कृष्णा घंटेश्वर (वय 24), पाप्या (पूर्ण नाव माहीत नाही वय.23) शंकऱ्या गायकवाड(वय.23) सर्व राहणार नागसेननगर, बिजलीनगर झोपडपट्टी चिंचवड अशी आरोपींची नावे आहेत. यापैकी कृष्णा व शंक-या या दोन्ही आरोपींना पोलिसांनी चिंचवड परिसरातून अटक केली असून त्यांना उद्या न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.

आपल्या बहिणीसोबत ज्ञान्या ऊर्फ ज्ञानेश्वर दशरथ शिंदे याचे प्रेमसंबंध आहेत असा समज झाल्याने त्याचा राग मनात धरून साथीदाराच्या मदतीने किट्याने ज्ञानेश्वरशी भांडण करून त्याच्या डोक्यावर व दोन्ही पायावर कोयत्याने वार केले. ही घटना काल (रविवारी) दुपारी चार वाजता घडली.

याप्रकरणी चिंचवड पोलीस ठाण्यात ज्ञानेश्वरचे वडील दशरथ शिंदे यांनी फिर्याद दिली असून आरोपी विरुद्ध मारहाण व जीवे मारण्याचा प्रयत्न असा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

06 Aug 2017

एमपीसी न्यूज - नोकरी लावतो, असे सांगून चिंचवड येथील दोघांनी हिंजवडीच्या युवतीला 80 हजाराचा गंडा घातला आहे.

याप्रकरणी राजू चव्हाण व राहुल अनवले या दोघांविरुद्ध निगडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

रेणू गुप्ता (वय 30) यांनी निगडी पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार सप्टेंबर 2016 पासून मल्टी अॅक्सेस या कंपनीच्या  (कुणाल प्लाझा, चिंचवड स्टेशन जवळ, चिंचवड) नावाखाली दोन्ही आरोपींनी गुप्ता यांना फसवले आहे. नोकरी लावतो, असे सांगत त्यांच्याकडून वेळो-वेळी असे 80 हजार रुपये घेतले. मात्र, नोकरी लावली नाही तसेच त्यांचे पैसेही परत केले नाहीत.

याप्रकरणी निगडी पोलीस ठाण्यात दोघांविरुद्ध आर्थिक फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.

06 Aug 2017

एमपीसी न्यूज - चारित्र्याच्या संश्यावरून पत्नीला भेटायला बोलवून पतीनेच चाकूने पत्नीवर वार केले आहेत. ही घटना काल (शनिवारी) दुपारी चारच्या सुमारास घडली. यामध्ये पत्नी जखमी झाली आहे.

फिरोज अली शेख (वय 30 रा. वास्तू उद्योग सोसायटी, अजमेरा, पिंपरी), असे आरोपीचे नाव आहे.

फिरोज व फरहाना शेख (वय 26) यांचा 8 वर्षांपूर्वी विवाह झाला होता. त्यांना दोन मुले व एक मुलगी असा परिवारही आहे. फिरोज पोटापाण्यासाठी कॅब चालवतो. त्यांच्यामध्ये यापूर्वीही भांडणे झाली होती. त्यानुसार फरहाना हिने पिंपरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर फरहाना तिच्या आईकडे मुंबईला गेली होती. काही दिवसांपूर्वी ती पुन्हा पिंपरीत तिच्या सासूकडे राहण्यास आली.

यावेळी फरहानने तिला भेटण्यासाठी म्हणून काल बोलावले. तिला घेऊन तो मोशी प्राधिकरण येथील आरटीओच्या पासिंगच्या गाड्या लागतात. त्या मोकळ्या जागेत घेऊन गेला. तिथे त्याने तिच्याशी वाद घातला. तिला शिवीगाळ केली. हाताने मारहाण केली व त्यांनतर तिच्या चेह-यावर व पोटावर त्याच्या जवळील चाकूने वार केले. यामध्ये फिरोजने त्याचा वेळीच हात धरला. तसेच आसपासच्या नारगरिकांनी धाव घेतल्याने मोठा अनर्थ टळला.

यामध्ये फरहाना थोडी जखमी झाली असून तिनेच भोसरी एमआयडीसी पोलीस ठाण्यात जाऊन पती विरुद्ध तक्रार दिली. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस अधिक तपास करत आहेत.

06 Aug 2017


एमपीसी न्यूज - पुण्यातील धनकवडी परिसरात एका लॉजच्या रुममध्ये तरुण आणि तरुणी जखमी अवस्थेत आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे. त्यांच्यावर वार करुन गंभीर जखमी करण्यात आले असून त्या दोघांवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. हि घटना आज सकाळी उघडकीस आली.

शरद जगदाळे आणि पूजा अशी त्यांची नावे आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, धनकवडी परिसरातील एका लॉजमध्ये हे दोघे मुक्कामी राहिले होते. आज सकाळी लॉजच्या कामगाराने त्यांच्या रुमचा दरवाजा ठोठावला. परंतू आतून काही प्रतिसाद येत नसल्याने त्यांनी पोलिसांना याची माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत रुमचा दरवाजा तोडला. त्यावेळी हे दोघे जखमी अवस्थेत आढळून आले. त्यांच्यावर वार करण्यात आले असून भारती विद्यापीठ हॉस्पीटलमध्ये त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. 

दोघेही मित्र असल्याचा पोलिसांचा संशय असून, मुलाने वार करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला असावा अशी शक्यता पोलिसानी व्यक्त केली आहे.

06 Aug 2017


एमपीसी न्यूज - पर्यटनस्थळी गेल्यानंतर प्रत्येकाला सेल्फीचा मोह आवरता येत नाही. परंतु सेल्फी काढत असताना योग्य ती काळजी न घेतल्याने अनेकांना आपले जिव गमवावे लागले आहेत. अशीच एक घटना काल (शनिवार) सायंकाळी सिंहगडावर तानाजी कडा येथे घडली. या घटनेत एक गरोदर महिला 150 फूट खोल दरीत पडली. सुदैवाने या घटनेत हि महिला बचावली असून तिला किरकोळ जखमा झाल्या आहेत.

प्रणिता लहू इंगळे (वय 28 , रा. लातूर) असे जखमी झालेल्या महिलेचे नाव आहे.

प्रणिता आणि तिचे पती आणि भाऊ काल सिंहगडावर फिरण्यासाठी आले होते. सायंकाळी साडेसहा ते सातच्या दरम्यान तानाजी कड्याजवळ ते फोटो काढत होते. कड्या जवळ सुरक्षेच्या दृष्टीने लोखंडी रेलिंग लावले आहेत. परंतु प्रणिता रेलिंगच्या बाहेर जाऊन फोटो काढत होती. पावसाळी दिवस असल्याने आणि पावसाच्या सरी पडत असल्याने या ठिकाणचा भाग निरसरडा झाला आहे. फोटो काढण्याच्या नादात तिचा पाय घसरला आणि ती 150 फूट खोल दरीत पडली. त्यावेळी तिच्या समवेत असलेल्या पतीने आरडा ओरडा करुन गडावरील लोकांकडे मदत मागितली. स्थानिक नागरिकांच्या मदतीने तीला बाहेर काढण्यात आले. सुदैवाने ति या घटनेतून बचावली असून तिला किरकोळ जखमा झाल्या आहेत.

सिंहगड पाहण्यासाठी ती तिचा पती लहू आत्माराम इंगळे तिचा भाऊ सुरेश दत्तात्रय जगताप यांच्या समवेत गडावर आली होती. दरडी पडत असल्याने घाट रस्ता बंद आहे. म्हणुन हे तिघे त्यांच्या मोटारीने सिंहगड पायथा आतकरवाडी येथे आले. तेथून पायवाटेने गडावर आले होते.

05 Aug 2017

तीन आरोपी दिल्लीमधून सायबर क्राईम पोलिसांच्या ताब्यात

एमपीसी न्यूज - विजया फायनान्समधून कर्ज देण्याचे आमिष दाखवून निगडी येथील एका महिलेची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. एकूण 63 हजार 950 रुपयांची फसवणूक करण्यात आली असून प्रकरणातील तीन आरोपींना दिल्ली येथून सायबर क्राईम सेल पुणे पोलिसांनी ताब्यात घेतले आहेत. आरोपींवर माहिती तंत्रज्ञान अधिनियम कलम 66 सी, 66 डी अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

निगडी येथील एका महिलेने वेबसाईटवर लोनसाठी विनंती केली असता त्या महिलेस विजया फायनान्समधून फोन आल्याचे भासवून कर्जाच्या प्रथम नोंदणीसाठी दोन हजार 500 रुपये भरण्यासाठी सांगितले. महिलेने ती रक्कम एका बँक खात्यात भरली असता दुस-या नंबरवरून फोन करून एक लाख 60 हजर रुपयाचे कर्ज मंजूर झाले आहे. परंतु त्यासाठी प्रोसेसिंग फी व इतर वेगवेगळी करणे सांगून एकूण 61 हजर 450 रुपये विविध खात्यावर भरण्यास भाग पाडले. आरोपींनी मागितलेली रक्कम खात्यावर भरल्यानंतर देखील महिलेच्या खात्यावर कर्जाची रक्कम न आल्याने आपली फसवणूक झाल्याचे महिलेच्या लक्षात आले.

त्यावरून महिलेने निगडी पोलीस स्टेशनच्या सायबर क्राईम सेलमध्ये तक्रार दाखल केली. गुन्ह्याचा तांत्रिक तपास करत असताना आरोपी दिल्ली येथे असल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार सायबर सेलच्या पथकाने शामकुमार प्रेमकुमार झा (वय 25, रा. शिवशख मार्ग कुंदपुरी दिल्ली), उषा उर्फ ख़ुशी प्रेमलाल गुप्ता उर्फ खुशी अगरवाल (वय 26, रा. आझादपुरी, दिल्ली), दीपचंद्र शर्मन सिंग (वय 27, रा. नगला मनी, फिरोजाबाद) या तिघांना शिवमार्केट पितमपुरा दिल्ली येथे चालू असलेल्या कॉलसेंटरवर छापा मारून ताब्यात घेण्यात आले. ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपींकडून सात मोबाईल, नऊ सिमकार्ड, एक वॉकी, आठ एटीएम कार्ड, तीन पॅनकार्ड, चेकबुक असे साहित्य जप्त करण्यात आले आहे. चीफ मेट्रोपॉलिटियन मॅजिस्ट्रेट दिल्ली यांनी आरोपींना पाच दिवसांची रिमांड कस्टडी सुनावली आहे.

ही कारवाई सायबर सेलचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राधिका फडके, पोलीस निरीक्षक दीपक लगड, सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर पानमंद, पोलीस उपनिरीक्षक विक्रम मिसाळ, पोलीस हवालदार अस्लम अत्तार, पोलीस नाईक अजित कु-हे, पोलीस नाईक दीपक भोसले, राजकुमार जाबा, अमित औचरे, बाबासाहेब कराळे, अनुप पंडित, संतोष जाधव, अंकिता राघो यांनी केली. पुढील तपास निगडी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक (गुन्हे) अवताडे करीत आहेत.

कोणत्याही लोनबाबत इंटरनेट अथवा फोनवरून माहिती मिळत असल्यास त्या वेबसाईट अथवा कंपनीची खात्री करून कर्जाची रक्कम मिळाल्याशिवाय कोणत्याही कारणासाठी पैसे देऊ नयेत. तसेच विजया फायनान्सकडून किंवा फोन नंबर 011-65678910, 9899395540, 9650461295, 9870539814, 9717957518, 8586023002, 9560362684, 9717957568, 8800463756, 7550701842 या क्रमांकावरून लोनसाठी फोन करून फसवणूक केली असल्यास नागरिकांनी सायबर क्राईम सेल, गुन्हे शाखा, पुणे शहर यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.

फसवणुकीच्या गुन्ह्याची माहिती सायबर सेलच्या 020-26123346 या क्रमांकावर अथवा This email address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it. या मेल आयडीवर संपर्क करून दयावी.

05 Aug 2017

एमपीसी न्यूज - मौजमजेसाठी दुचाकी, मोबाईल, लॅपटॉप चोरणा-या दोघांना हिंजवडी पोलिसांनी जेरबंद केले. त्यांच्याकडून तीन लॅपटॉप, दोन दुचाकी असा दोन लाख 36 हजार रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे.

रविकिरण माताबददल यादव (वय 21, रा. आदर्श कॉलनी, काळेवाडी) आणि मयक भोलानाथ जयस्वाल (वय 19, थेरगाव) अशी अटक केलेल्या दोघांची नावे आहेत.

 

हिंजवडी पोलीस हद्दीत गस्त घालत होते. पोलिसांनी संशयावरुन बुधवारी (दि.2) आरोपींना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून एक मोबाईल फोन जप्त करण्यात आला. अटकेत असताना त्यांच्याकडे कसून तपास केला असता त्यांनी मौजमजेसाठी दुचाकी, लॅपटॉप चोरल्याचे निष्पन्न झाले. लोणावळा, आकुर्डी, डांगे चौक या परिसरातून दुचाकी, लॅपटॉप चोरले असल्याची आरोपींनी कबुली दिली आहे, असे पोलिसांनी सांगितले. हिंजवडी पोलीस तपास करत आहेत.

05 Aug 2017

एमपीसी न्यूज - सात हजार रुपयांची अवैध देशी दारु निगडी पोलिसांनी जप्त केली आहे. ही कारवाई आज (शनिवारी) दुपारी साडेचारच्या सुमारास निगडी, ओटास्कीम येथे करण्यात आली. याप्रकरणी मोटार चालकाविरोधात निगडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, निगडी पोलीस शनिवारी हद्दीत गस्त घालत होते. ओटास्कीम येथून जात असताना (एम.एच 14, सी 1594) या अल्टो मोटारीतून दारुची वाहतूक करण्यात येत असल्याचा पोलिसांना संशय आला. त्यामुळे पोलिसांनी मोटार थांबविली. 

मोटारीची पाहणी केली असता मोटारीत 13 ड्रम मिळून आले. त्यापैकी 11 ड्रममध्ये दारु होती. तर, दोन ड्रम रिकामे होते. 11 ड्रममधील सात हजार रुपये किमतीची 35 लिटर देशी दारु जप्त करण्यात आली आहे. निगडी पोलीस तपास करत आहेत.
Yamuna Nagar Police Chauki pakadali gavathi Daru 02
Yamuna Nagar Police Chauki pakadali gavathi Daru 03

05 Aug 2017

एमपीसी न्यूज - बाणेरमधील महाबळेश्वर हॉटेलजवळ चालत्या कारला आज (शनिवार) सायंकाळच्या सुमारास अचानक आग लागली. या आगीत कार जळून खाक झाली आहे. कारमधील एक प्रवासी आणि चालक तात्काळ बाहेर पडल्याने जीवितहानी टळली.

आग लागलेली गाडी टुरिस्ट गाडी होती. बाणेरमधून एक प्रवासी घेऊन कारचालक जात असताना महाबळेश्वर हॉटेलजवळ गाडीतून धूर येऊ लागला. कारचालकाने प्रसंगावधान राखत कार थांबवून रस्त्याच्या कडेला लावली आणि प्रवाशाला बाहेर काढले. त्यानंतर काही वेळातच गाडीने पेट घेतला.

दरम्यान, घटनेची माहिती मिळताच पाषाण अग्निशमन दलाची एक गाडी घटनास्थळी दाखल झाली आणि आगीवर नियंत्रण मिळवले. पण, तोपर्यंत कार जळून खाक झाली होती. यामुळे रस्त्याने जाणारी वाहतूक काही काळ बंद करण्यात आली होती.

05 Aug 2017

एमपीसी न्यूज - वाहतूक पोलिसाला शिवीगाळ करत मारहाण करणा-या एका तरुणाला वाकड पोलिसांनी अटक केली आहे. ही घटना शुक्रवारी (दि.4) सायंकाळी साडेपाचच्या सुमारास वाकडमधील भूमकर चौकात घडली.

किशोर भिमाजी दाभाडे (वय 34, रा. माळवाडी, मावळ), असे अटक करण्यात आलेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी वाहतूक विभागाचे सहाय्यक पोलीस फौजदार तेजलाल भालेराव यांनी वाकड पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भालेराव व त्यांचे सहकारी गारूडे शुक्रवारी वाकड येथील भूमकर चौकात वाहतुकीचे नियमन करत होते. यावेळी दाभाडे याने भालेराव व गारुडे यांना धक्का-बुक्की करत शिवीगाळ केली. ते करत असलेल्या सरकारी कामात अडथळा आणला. वाकड पोलीस अधिक तपास करत आहेत.

05 Aug 2017

एमपीसी न्यूज - राजस्थानहून ते दोघे मोबाईलचे काम शिकण्यासाठी थेरगावमध्ये नातेवाईकाकडे आले...फिरायला जाण्यासाठी ते पिंपरी रेल्वेस्थानक परिसरात गेले.. तिकीट काढण्यासाठी लोहमार्गावरून पायी निघाले... तेवढ्यात त्यांना सेल्फीचा मोह झाला...अन् दोघेही सेल्फी काढण्यात मग्न झाले ...त्याचेवळी समोरून आलेल्या रेल्वेचा आवाज हेडफोनमुळे त्याच्या कानावर पोहोचू  शकला नसल्याने तो सेल्फी एकाच्या आयुष्यातला शेवटचा सेल्फी ठरला. तर, त्याचा मित्र मृत्यूशी झुंज देत आहे.

श्रवण मलराम घांची (वय 20, रा. थेरगाव, मूळ जोधपूर, राजस्थान), असे मृत्यूमुखी पडलेल्या तरुणाचे नाव आहे. तर, त्याचा मित्र भवनसिंग बाबूसिंग राठोड (वय 19) हा गंभीर जखमी झाला आहे.

श्रवण व भवनसिंग हे दोघे राजस्थानमध्ये एकाच परिसरात राहतात. दहावीची परीक्षा दिल्यानंतर दोघेही मोबाइलचे काम शिकण्यासाठी थेरगाव येथील नातेवाईकाकडे राहण्यास आले. दोघेही सांगवी येथील नातेवाईकाच्या मोबाईल शॉपीमध्ये शिकण्यासाठी जात. 31 जुलैला दोघे फिरण्यासाठी पिंपरी रेल्वेस्थानक परिसरात आले. रेल्वेस्थानक परिसरात आले. दोघेही रेल्वेमार्गावरून तिकीटघराच्या दिशेने चालत जाऊ लागले. त्यादरम्यान, श्रवणला सेल्फी घेण्याची इच्छा झाल्याने दोघे रेल्वेमार्गावर थांबले. सेल्फी घेत असताना त्यांच्या कानात हेडफोन होता. त्याचवेळी लोणावळ्याहून पुण्याच्या दिशेने जाणारी लोकल त्यांच्या दिशेने आली.

रेल्वेचा हॉर्न वाजत होता. मात्र, हेडफोन लावल्याने त्यांना आवाज आला नाही. यामुळे लोकलने धडक दिल्याने दोघेही जखमी झाले. त्यांना रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी श्रवणचा मृत्यू झाल्याचे सांगितले. तर, भवनसिंगला उपचारासाठी पुण्यातील एका रुग्णालयात दाखल केले असून त्याची प्रकृती गंभीर आहे. 

05 Aug 2017

एमपीसी न्यूज- दादरहून पुण्याकडे जाणाऱ्या एसटी ने अचानक पेट घेतला. ही घटना आज पहाटे साडेतीनच्या सुमारास खालापूरगावच्या हद्दीत घडली. सुदैवाने एसटीमधील सर्व प्रवासी सुखरूप आहेत. शॉर्टसर्किटमुळे ही आग लागली असावी असा प्राथमिक अंदाज आहे. 

दादरहून पुण्याकडे जाणाऱ्या (एमएच 06 एस 8924 ) या निम आराम बसने खालापूरगावच्या हद्दीत अचानक पेट घेतला. घटनेची माहिती मिळताच महामार्ग पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मदतकार्य सुरु केले. सुदैवाने एसटीमधील सर्व 13 प्रवासी सुखरूप आहेत. शॉर्टसर्किटमुळे ही आग लागली असावी असा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.

04 Aug 2017


एमपीसी न्यूज – कॉलेज ऑफ कम्प्यूटर सायन्स महाविद्यालयाच्या संचालक व प्राचार्यांनी विद्यार्थ्यांच्या प्रवेश शुल्कामध्ये अवाजवी वाढ केली आहे. जी पुणे विद्यापीठाच्या नियमांना धरून नाही. त्यामुळे ही विद्यार्थ्यांची आर्थिक फसवणूक आहे, अशी तक्रार अभाविप (अखिल भारतीय विद्यार्थी परिषद) संघटनेने वाकड पोलिसांकडे केली आहे.

या तक्रारीमध्ये त्यांनी म्हटले आहे की, पुणे विद्यापीठाने प्रवेश शुल्क, त्यामध्ये करण्यात येणारी वाढ याबाबत नियम घालून दिलेले असतानाही अचानकपणे प्रवेश शुल्कात 2 ते 3 हजारांनी वाढ करण्यात आली. याविषयी विद्यापीठाकडे निवेदन देण्यात आले. ज्यामध्ये प्रवेश वाढीच्या पावत्याही जोडल्या होत्या. मात्र, ज्यांच्या पावत्या जोडल्या होत्या त्यांनी प्राचार्यांनी कार्यालयात बोलावून अर्वाच्य भाषेत बोलून तक्रार मागे घ्या अन्यथा महाविद्यालयातूल काढून टाकू अशी धमकी दिली. त्यामुळे पोलिसांनी कार्यालयाचे सीसीटीव्हीही तपासावेत.

तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य, संचालक संस्थाचालक यांच्या विरुद्ध आर्थिक फसवणुकीचा गुन्हा दाखल करावा, असे निवेदन वाकड पोलीस ठाण्याला दिले आहे.

Page 4 of 64
Open Chat
1
Close chat
Hello! Thanks for visiting us. Please press Start button to chat with our support :)

Start