• 123.jpg
  • IMG-20170812-WA0103.jpg
  • mpc.jpg
  • mpc1.jpg
  • MPC_news.JPG
12 Aug 2017

एमपीसी न्यूज - पोलीस असल्याचे सांगून व्यावसायिकांकडून सोन्यासह आदी गोष्टी खरेदी करून त्यांना विविध बँकांचे तसेच दुस-याच व्यक्तीचे बनावट धनादेश देवून फसवणूक करणा-या सराईत गुन्हेगारास चिंचवड पोलीसांनी अटक केली.

तुकाराम शांताराम रौधळ (वय 33, रा. रौंधवाडी) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. त्याच्यावर शहरातील विविध पोलीस ठाण्यात 12 गुन्हे दाखल आहेत. याप्रकरणी सांगवीतील सराफी व्यावसायिक देवराज सोनी (वय 40, रा. पिंपळे-निलख) यांनी सांगवी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोनी यांचे सांगवी येथे व्हारायटी या नावाने सराफी पेढी आहे. आरोपीने पोलीस असल्याचे सांगून 33 हजार 784 रूपयांची सोन्याची चैन खरेदी केले. पैसे न देता पंजाब ऍण्ड सिंध बॅंकेचा बनावट धनादेश देवून आर्थिक फसवणूक केली. याच आरोपीने काळेवाडीत न्युराज शिलाई मशीन दुकानातून नोव्हेल कंपनीची शिलाई मशीन खरेदी केली. रोख पैसे न देता आरोपीने बॅक ऑफ महाराष्टचा दुस-या व्यक्तीचा धनादेश देवून साडेसात हजारांची फसवणूक केल्याचे उघडकीस आली आहे. याप्रकरणी कन्हैया वर्मा (वय-25, रा. काळेवाडी) यांनी वाकड पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.

आरोपी तुकाराम रौधळ हा सराईत गुन्हेगार आहे. त्याच्यावर शहरातील विविध पोलीस ठाण्यात फसवणुकीचे 12 गुन्हे दाखल आहेत. चिंचवड पोलीसांनी त्याला शनिवारी अटक करून मोरवाडी न्यायालयात हजर केले होते. न्यायालयाने एक दिवसाची पोलील कोठडी सुनावली आहे.

12 Aug 2017

एमपीसी न्यूज - मोटारीला बुलेटचा धक्का लागल्याच्या कारणावरून तरूणाला दोघांनी मारहाण करत अपहरण केले आणि तरूणाची बुलेट चोरून नेली. ही घटना मोशी टोलनाका येथे मंगळवारी दुपारी सव्वातीनच्या सुमारास घडली.

हर्षअंकित सिंग (वय 22, रा. धानोरी) याने भोसरी, एमआयडीसी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार मोटारीतील दोन अज्ञात आरोपीविरूध्द गुन्हा दाखल केला आहे.

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, हर्षअंकित हा मंगळवारी मोशी टोलनाका येथून जात होता. त्याच्या बुलेटचा एका मोटारीला धक्का लागला. यावरून मोटारीतील दोघांनी त्याला मारहाण करत त्याची बुलेट चोरून नेली. त्याला मोटारीत जबरदस्तीने बसवून अपहरण केले. पुना क्लब येथे घेवून गेले. तेथून हर्षअंकित याने आरोपीच्या तावडीतून आपली सुटका करून घेतली आणि पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दिली. एमआयडीसी पोलीस तपास करत आहेत.

12 Aug 2017

एमपीसी न्यूज - सासरच्या शारिरीक व मानसिक छळाला कंटाळलेल्या नवविवाहितेने आठ ऑगस्ट रोजी आत्महत्या केली होती. याप्रकरणी तिच्या सासू- सास-यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून पतीला पोलिसांनी अटक केली.

चेतल हेमकर्ण पवार (वय 25) असे आत्महत्या केलेल्या विवाहितेचे नाव आहे. हेमकर्ण आसाराम पवार (वय 27, रा. सॅन्टोसा पर्ल हौसिंग सोसायटी, वाकड) असे अटक करण्यात आलेल्या पतीचे नाव आहे. याप्रकरणी चेतलची आई भारती पाटील (वय-45, रा. अंमळनेर, जळगाव) यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, चेतल व हेमकर्ण यांचा 11 फेब्रुवारी 2017 मध्ये विवाह झाला होता. लग्नाच्या काही दिवसानंतर चेतलाकडे पती, सासू व सास-याकडून माहेराहून पैसे आणण्याची मागणी होऊ लागली. या कारणावरून तिचा शारिरीक व मानसिक छळ सुरू केला. या छळाला कंटाळून चेतलने 8 ऑगस्ट रोजी सोसायटीच्या 11 व्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली होती. सहायक पोलीस निरीक्षक एम. पी. सोनवणे अधिक तपास करत आहेत.

12 Aug 2017

एमपीसी न्यूज - पुणे-मुंबई एक्सप्रेस वेवर एका कार चालकाला स्टेअरिंगवरच हृदयविकाराचा झटका आला. चालकाने वेळीच कार रस्त्याच्या बाजूला घेऊन वेळीच हॅण्डब्रेक लावला. त्यामुळे पुढील दुर्घटना टळली. मात्र, चालकाचा यात दुर्दैवी अंत झाला.  

तानाजी खाडे (वय 45) असे चालकाचे नाव आहे.

तानाजी हे मुंबईतील चुनाभट्टी परिसरात राहतात. ते मुंबईहून पुण्याकडे येत होते. यावेळी तानाजी यांना घाट परिसरात अस्वस्थ वाटू लागले. त्यामुळे त्यांनी कार रस्त्याच्या बाजूला लावली. चढणावरून गाडी मागे येऊ नये म्हणून हॅण्डब्रेक लावल्याने मोठी दुर्घटना टळली. पुढील काही क्षणातच त्यांनी प्राण सोडले.

PCMC AD HALF PAGE new

11 Aug 2017


एमपीसी न्यूज - वाकड येथील भूमकर चौकात आपले कर्तव्य बजावणा-या महिला वाहतूक कर्मचा-यास कर्तव्य बजावत असताना युवकाने हातवारे करत व अपशब्द वापरून तिचा विनयभंग केला. ही घटना काल (गुरुवारी) सकाळी नऊ वाजता घडली असून हिंजवडी पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.

परीक्षीत प्रभाकरराव देशमुख (वय. 37 रा. एम्प्रेस पार्क, बालेवाडी), असे अटक आरोपीचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, महिला वाहतूक पोलीस कर्मचारी काल त्यांचे कर्तव्य बजावत असताना देशमुख त्याच्या दुचाकीवरून पुणे बँगलोर महामार्गावरून सर्व्हिस रोडच्या उलट्या दिशेने जात होता. यावेळी त्याला थांबण्यास सांगितले असता त्याने गाडी भरधाव वेगात घेतली व महिला कर्मचा-यास हातवारे करत अपशब्द वापरले तसेच गाडी सरळ त्यांच्या अंगावर घालून जखमी करण्याचा प्रयत्न केला.

याप्रकरणी आरोपीला हिंजवडी पोलिसांनी तातडीने अटक केली असून त्याच्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे. गेल्या काही दिवसांपासून वाहतूक पोलिसांवरील हल्ले वाढले आहेत. तसे व्हिडिओही सोशल माध्यमांवर प्रसारीत झाले आहेत. त्यामुळे वाहतूक पोलिसांच्याच सुरक्षिततेचा प्रश्न आता ऐरणीवर आला आहे.

11 Aug 2017


निगडी पोलिसांची कारवाई

एमपीसी न्यूज - निगडी पोलिसांनी दोन वेगवेगळ्या कारवाईमध्ये वाहन चोरी करणा-या दोन चोरांना जेरबंद केले असून त्याच्यांकडून एक रिक्षा व दोन दुचाकी जप्त केल्या आहेत.

दिनेश आत्माराम गंडले (वय 25 रा, मोरे बिल्डींग, आळंदी) तर गणेश धर्मानाप्पा बिराजदार (वय 27 रा. ट्रान्सपोर्टनगर निगडी, मूळ निलंगा लातूर), अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.

पहिल्या प्रकरणात पोलिसांना निगडीतील चिकन चौक येथे एक संशयीत इसम घाईगडबडीत रिक्षा घेऊन जाताना दिसला. त्याला गस्त घालणा-या पोलिसांनी त्याची चौकशी केली असता त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. तपास केला असता गाडीचा क्रमांक हा बनावट असून चासी व इंजिन नंबर दोन्ही बनावट असल्याचे समोर आले. त्यानंतर त्याला पोलिसांनी तातडीने ताब्यात घेतले. संबंधित आरोपीकडून 30 हजार रुपये पोलिसंनी जप्त केले व अधिक तपास केला असता त्याच्यावर देहूरोड पोलीस ठाण्यातही दुचाकी चोरीचा गुन्हा असल्याचे उघड झाले आहे.

तर दुस-या गुन्ह्यामध्ये पोलीस चोरीला गेलेल्या बुलेटचे सीसीटीव्ही फुटेज तपासले असता आरोपीची ओळख पटली. त्यानुसार पोलिसांनी कारवाई करत आरोपी गणेश बिराजदार याला ट्रान्सपोर्टनगर येथून अटक केले. त्याच्याकडून पोलिसांनी 2 लाख किंमतीची तीन वाहने जप्त केली. त्याचावर निगडी पोलीस ठाणे येथे दोन तर देहूरोड येथे एक असे तीन गुन्हेही तपासाअंती उघड झाले आहेत.

ही कारवाई निगडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजयकुमार पळसुले, पोलीस निरीक्षक गुन्हे शंकर आवताडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक देवेंद्र चव्हाण, मच्छिंद्र घनवट, तात्या तापकीर, मंगेश गायकवाड, नारायण जाधव, आनंद चव्हाण, नितीन बहिरट यांनी केली.

11 Aug 2017


आकुर्डी स्थानकाजवळ रेल्वेच्या धडकेत विद्यार्थ्याचा मृत्यू

एमपीसी न्यूज - महाविद्यालयाचे दिवस हे फुलपाखरा सारखे असतात. येथे येणारा प्रत्येक तरुण व तरुणी उत्साही व डेअरींगबाज असतो. मात्र, हा उत्साह व हे डेअर जीव घेणारेही ठरू शकते. याच डेअर व उत्साहात कानात हेडफोन घालून रेल्वेचा रुळ ओलांडत असताना त्याचा दुर्दैवी अंत झाला. ही दुर्दैवी घटना आज दुपारी साडेचार वाजता आकुर्डी रेल्वे स्थानकाजवळ घडली.

ओमकार दशरथ ओडाफे (वय.16 रा. तळेगाव), असे मयत विद्यार्थ्याचे नाव आहे.

ओमकार ने नुकतेच निगडी येथील पिंपरी-चिंचवड एज्युकेशन ट्रस्टच्या तंत्रनिकेतन (पॉलिटेक्निक) महाविद्यालयात मेकॅनिकल शाखेच्या पहिल्या वर्षाला प्रवेश घेतला होता. आज त्याचा महाविद्यालयाचा पहिलाच दिवस होता. पहिल्या दिवशी काही मित्रांच्या ओळखी केल्या. त्या ओळखी मनात साठवून तो नव्या स्वप्नांसह घरी परतण्यासाठी रेल्वेस्थानकावर येत असताना हा अपघात घडला.

रेल्वे प्रशासानाचे सर्व नियम धाब्यावर बसवून त्याने कानात हेडफोन घालून दाद-याचा वापर न करता सरळ रुळ ओलांडणे पसंत केले. याच त्याच्या आत्मविश्वासाने त्याचा घात केला पुण्याकडे जाणा-या एक्सप्रेसगाडीने त्याला उडवले यातच त्याचा दुर्दैवी अंत झाला.

यामुळे त्याच्या घरच्यांनाच नाही तर महाविद्यालय प्रशासनालाही चांगलाच धक्का बसला आहे. कारण करता-सवरता तरुण केवळ निष्काळजीपणामुळे त्याच्या आयुष्याला मुकला आहे. त्याचे आई-वडील तळेगाव येथे माळीकाम करतात. त्यांचा असा शिकणारा तरुण मुलगा गेल्याने त्यांच्या घरावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

यामध्ये त्याच्याजवळ असलेल्या महाविद्यालयाच्या ओळखपत्रावरून त्याची ओळख पटली. चिंचवड रेल्वे पोलिसांनी त्याचा नातेवाईकाला कळवले असून त्याचा मृतदेह पिंपरीच्या यशवंतराव चव्हाण रुग्णालयात पाठविण्यात आला आहे.  मात्र यावेळी तरुणांनी रुळ ओलांडणे, चालत्या गाडीतून स्टंट करणे टाळावे, असे आवाहन रेल्वे पोलिसांनी केले आहे.

PCMC AD HALF PAGE new

11 Aug 2017


एमपीसी न्यूज - पुणे शहरातील हडपसर आणि वारजे भागात झालेल्या दोन वेगवेगळ्या अपघातात दोघांचा मृत्यू झाला. या घटना 8 आणि 9 ऑगस्ट रोजी घडल्या. दत्ता दाईजोडे आणि एक 35 वर्षीय अनोळखी इसमाचा यामध्ये मृत्यू झाला.

यातील पहिल्या घटनेत वारजेतील डुक्कर खिंड येथे भरधाव वेगातील दुचाकी स्लीप होऊन रस्त्यावर पडल्याने यामध्ये गंभीर जखमी झालेला दुचाकीचालक दत्ता दिगंबर दाईजोडे (रा. बालेवाडी) याचा मृत्यू झाला. तर अन्य एका घटनेत हडपसर येथील ए.एम.महाविद्यालयाच्या समोर अज्ञात वाहनाने धडक दिल्याने एकाचा मृत्यू झाला आहे.

11 Aug 2017

 

एमपीसी न्यूज - आळंदी येथील गोपाळपुरा येथे इंद्रायणी नदीच्या काठी प्रेमी युगूलाने विष पिऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना आज (शुक्रवारी) दुपारी दीड वाजता उघडकीस आली.

राहुल साहेबराव पाटील (वय 35) तर रिना उर्फ गुड्डी विलास गिरीगोसावी (वय 25) अशी मयतांची नावे असून दोघेही राहणार डागुर्ण, धुळे येथील राहणारे होते.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रेताजवळ विषारी औषधाची बाटली सापडली असून दोन मोबाईल फोन मिळाले आहेत.  यासंबंधी चौकशी केली असता महिलेचे लग्न झाले असून दोघेही प्रेमसंबंधातून चार दिवसापूर्वी आळंदी येथे पळून आले होते. याप्रकरणी मयत महिलेने औषध घेण्यापूर्वी नातेवाईकांना फोन करून आत्महत्या करीत असल्याचे कळविले होते, असेही तपासात उघड झाले आहे.

त्यानुसार पोलिसांनी मयताच्या नातेवाईकांना कळवले असून आळंदी पोलीस अधिक तपास करत आहेत.

11 Aug 2017


एमपीसी न्यूज - फ्लॅट व प्लॉट देण्याच्या नावाखाली 12 नागरिकांची करोडो रुपयांनी फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला. याप्रकरणी दोघांवर विमानतळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. हा सर्व प्रकार 2013 पासून आजपर्यंत वेळोवेळी घडला आहे.

सुमीत भलोटीया आणि शहाजी उकीरडे अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी नितीन चव्हाण (वय-52, जवळकर नगर, पिंपळे-गुरव, पुणे) यांनी फिर्याद दिली आहे.

याप्रकरणी अधिक माहिती अशी की, वर नमूद केलेल्या आरोपींनी विमाननगर येथे स्पार्क रियालिटी नावाने कार्यालय उघडले. त्यांनी डोंगरगाव येथे कंपनीची साईट चालू असल्याचे सांगून व ही साईट ऑफिसबॉय मार्फत फिर्यादी आणि इतरांना दाखवून फिर्यादी व इतर 11 जणांना हे फ्लॅट आणि प्लॉट विकण्याच्या आमिषाने त्यांची 2 करोड, 7 लाख 25 हजार रुपयांनी फसवणूक केली. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून सहाय्यक पोलीस निरीक्षक एस.बी.खेडकर अधिक तपास करीत आहेत.

11 Aug 2017


एमपीसी न्यूज - महिला अभियंता अंतरा दासची डिसेंबर 2016 मध्ये एकतर्फी प्रेमातून रात्री साडेआठच्या सुमारास तळवडे येथे धारदार शस्त्राने  हत्या करण्यात आली होती. ज्याने हल्ला केला तो मुख्य आरोपी मात्र अजून पोलिसांच्या गळाला लागलेला नाही. त्यामुळे जो कोणी या आरोपीची माहिती देईल त्याला पुणे ग्रामीण पोलिसांतर्फे 25 हजार रुपयांचे बक्षीस दिले जाणार आहे.

अंतरा दास ही कामावरून घरी परतत असताना तळवडे येथे मारेक-याने तिचा पाठलाग करून पाठीमागून तिच्यावर तीक्ष्ण हत्याराने वार केला. यामध्ये ती गंभीर जखमी झाली व त्यातच तिचा मृत्यू झाला. हा हल्ला तिच्याच कंपनीत काम करणा-या संतोष कुमार याने एकतर्फी प्रेमातून केल्याचे पोलीस तपासात उघड झाले होते. याप्रकरणी आरोपी संतोष कुमारला देहूरोड पोलिसांनी बंगळुरुतून अटक केली होती.

मात्र संतोष कुमार याने ज्याला अंतरा दासवर हल्ला करायला पैसे दिले होते तो मारेकरी सापडावा म्हणून पोलिसांनी नागरिकांना जाहीर आवाहन केले आहे की, निळ्या रंगाचा गोल गळ्याचा त्यावर पट्टे असलेला टीशर्ट व पॅन्ट घातलेल्या मारेक-याबद्दल कोणालाही खात्रीशीर व उपयुक्त काही माहिती असेल तर त्यांनी पुणे ग्रामीणच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या  9423884745, 9420827001, 9923481235, 9823232421 या क्रमांकावर संपर्क साधावा.

माहिती देणा-याचे नाव इतर माहिती गुप्त राखण्यात येईल. तसेच माहिती देणा-यास रोख 25 हजाराचे बक्षीस पोलीस प्रशासनातर्फे देण्यात येणार आहे.  

10 Aug 2017
एमपीसी न्यूज - पुण्यातील सुखसागरनगर परिसरात एक महिला डॉक्टरने आजारपणाला कंटाळून रुग्णालयाच्या चौथ्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली. आज (गुरुवार) सायंकाळच्या सुमारास हा प्रकार उघडकीस आला असून आजारणाला कंटाळून आत्महत्या केल्याचे उघड झाले आहे.
 
डॉ. इंदू शाम डोंगरे (रा. साईनगर, सुखसागरनगर, कोंढवा) असे आत्महत्या केलेल्या महिला डॉक्टरचे नाव आहे. सायंकाळी सहाच्या सुमारास कोंढवा पोलिसांना माहिती मिळाल्यानंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. 
 
याप्रकरणी अधिक माहिती अशी की, मयत डॉ. इंदू डोंगरे आणि त्यांचे पती डॉ. शाम डोंगरे यांचे सुखसागरनगर येथे स्वत:चे गजानन हॉस्पिटल आहे. मागील काही दिवसांपासून इंदू मानसोपचारतज्ज्ञाकडे उपचार घेत होत्या. या उपचारांना कंटाळूनच त्यांनी आज (गुरूवारी) सायंकाळी गजानन रुग्णालयाच्या चौथ्या मजल्यावर उडी मारली. त्यांना रुग्णालयात नेत असतानाच त्यांचा मृत्यू झाला.
10 Aug 2017


एमपीसी न्यूज - चिंचवड येथील शाहूनगर येथील रत्नप्रभा ज्वेलर्सला पोलीस असल्याची बतावणी करत सोने खरेदी करून सोनाराला बँकेचा खोटा धनादेश देऊन 20 हजार रुपयांना फसवले आहे.

शाहूनगर येथील रत्नप्रभा ज्वेलर्सचे मालक निलेश सोनार यांनी एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, मंगळवारी सकाळी दहाच्या सुमारास एक अज्ञात इसम त्यांच्या दुकानात आला. त्याने 20 हजार 500 रुपयांचे दागिने खरेदी केले व त्या बदल्यात त्याने रोख पैसे न देता धनादेश दिला. धनादेशावर शंका घेतली असता मी पोलीस आहे, अशी त्याने बतावणी केली. मात्र, प्रत्यक्षात बँकेत गेले असता तो धनादेश खोटा असल्याचे समोर आले.

सोनार यांनी आर्थिक फसवणुकीचा गुन्हा अज्ञात इसमा विरुद्ध दाखल केला असून एमआयडीसी पोलीस अधिक तपास करत आहेत. 

10 Aug 2017

एमपीसी न्यूज - सहकारनगर परिसरातील सराईत गुन्हेगार विशाल उर्फ डोक्या सुदाम साळुंके (वय-30, रा.संभाजीनगर, धनकवडी, पुणे) याला एमपीडीए कायद्याअंतर्गत एक वर्षासाठी नाशिक मध्यवर्ती कारागृहात स्थानबद्ध करण्यात आले आहे.

विशाल उर्फ डोक्या हा 2009 पासून गुन्हेगारी क्षेत्रात आहे. सहकारनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत त्याच्यावर जिवघेणी हत्यारे बाळगणे, जबरी चोरी करणे, पळवून नेणे, शासकीय कर्तव्य बजावताना अडथळा निर्माण करणे यासारखे गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल आहेत. यापूर्वी त्याला दोन वर्षासाठी पुणे शहर आणि लगतच्या जिल्ह्यातून हद्दपार करण्यात आले होते. तरीसुद्धा त्याच्या गुन्हेगारी कारवायामध्ये फरक पडला नाही.

त्यामुळे 9 ऑगस्ट 2017 पासून एक वर्षासाठी त्याला नाशिक मध्यवर्ती कारागृहात एक वर्षासाठी स्थानबद्ध करण्याचे आदेश पोलीस आयुक्त रश्मी शुक्ला यांनी दिले.

10 Aug 2017


एमपीसी न्यूज - पिंपळे गुरव येथील नव महाराष्ट्र शाळेच्या पाठीमागील काटे पिंपळे पुलाजवळ एका महिलेचा मृतदेह वाहत येताना एका इसमाला दिसला. मात्र, अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी येण्यापूर्वीच मृतदेह पाण्यात बुडाला असल्याचे  प्रत्यक्षदर्शींने सांगितले. ही घटना आज (गुरुवारी) दुपारी बाराच्या सुमारास उघडकीस आली. घटनास्थळी सांगवी पोलीस आणि अग्निशमन दलाचे जवान शोधकार्य करत आहेत.

प्रत्यक्षदर्शी संतोष साठे यांनी एमपीसी न्यूजशी बोलताना सांगितले की, मी पिंपळे सौदागर येथून पिंपरी गावाकडे दुपारी येत होतो. तेवढ्यात मला नदीच्या पाण्यात एक 20 ते 25 वर्षाची तरुणी बुडताना दिसली. तिच्या अंगावर लाल रंगाचा कुर्ता होता. मी माझ्या आसपास असलेले तरुण गाडी बाजूला घेऊन नदी पात्रात उतरणार होतो. मात्र, पुढे असलेल्या भव-यात ती तरुणी दिसेनाशी झाली. काही मुले पाण्यात उतरलीही पण तिचा काही शोध लागला नाही. त्यानंतर आम्ही पोलिसांना फोन लावला व बचाव पथक घटनास्थळी दाखल झाले, असे सांगितले.

घटनास्थळी पोलीस कर्मचारी व पिंपरी अग्निशामक दल व रहाटणी अग्निशामक दलाच्या दोन गाड्या दाखल झाल्या असून शोधकार्य सुरू आहे.

10 Aug 2017

एमपीसी न्यूज - कोथरुड परिसरातील प्राचीन शुभंकर महादेव मंदिरात चोरी करून दानपेटीतील रोख रक्कम चोरून नेणा-या दोघांना कोथरूड पोलिसांनी बेड्या ठोकल्या. हा सर्व प्रकार 9 ऑगस्ट च्या पहाटे सव्वाचार वाजता भेलकेनगर कोथरूड येथे घडला. आरोपींना न्यायालयात हजर केले असता त्यांना तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

ओंकार बापु गायके (वय-19, संत ज्ञानेश्वर कॉलनी, गार्डन चौक, कोथरूड, पुणे) आणि समीर सिकंदर राऊत (वय-20, संगम चौक, नानानानी पार्क समोर, कोथरूड) अशी अटक केलेल्या दोघांचा नावे आहेत. याप्रकरणी अनिल विश्वास परांजपे (वय-40, रा. शुभंकर अपार्टमेट, भेलके नगर, कोथरूड, पुणे) यांनी फिर्याद दिली आहे.

याप्रकरणी अधिक माहिती अशी की, कोथरूडमधील शुभंकर अपार्टमेंटमध्ये राजेंद्र मोहिते (रा.पद्मावती) यांच्या मालकीचे प्राचीन शुभंकर महादेव मंदिर आहे. सध्या श्रावण महिना असल्याने या मंदिरामध्ये दर्शन घेण्यासाठी भाविकांची मोठी गर्दी असते. येणारे भाविक मंदिरातील दानपेटीत श्रध्देने दान करीत असतात. त्याच दानपेटीवर लक्ष ठेवून आरोपींनी पहाटेच्या सुमारास मदिराच्या दरवाजास लावलेले कुलूप तोडून आत प्रवेश करत कटरच्या सहाय्याने दानपेटी उचकटून त्यातील 19 हजार 877 रुपये चोरून नेले.

दरम्यान चोरी करून पळून जात असताना या सोसायटीतील वॉचमन रंजन शुक्ला याने रंगेहाथ पकडले. यावेळी त्याचे इतर साथीदार पळून गेले. आरोपीकडून रोख 19 हजार 877 रुपये हस्तगत केले आहेत. या पूर्वीही कोथरूड परिसरात झालेल्या घरफोड्यामध्ये आरोपींचा सहभाग असण्याची शक्यता आहे.

10 Aug 2017

एमपीसी न्यूज- शिक्षणासाठी पुण्यात आलेल्या इराणी विद्यार्थिनीकडे महाविद्यालयाच्या प्राध्यापकांनी शारीरिक सुखाची मागणी करत, गुरु शिष्याच्या नात्याला काळिमा फासण्याची घटना उघडकीस आली आहे. याबाबत कोथरूड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना मंगळवार (8 ऑगस्ट) रोजी घडली. याप्रकरणी संबंधित प्राध्यापकाला अटक करण्यात आली आहे.

शिवाजी बो-हाडे (वय-53, रा.कृष्णा नगर, सांगवी, पुणे) असे अटक करण्यात आलेल्या प्राध्यापकाचे नाव आहे. याप्रकरणी संबंधित विद्यार्थिनीने कोथरूड पोलीस ठाण्यात तक्रार दिली असून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी विवाहीत असून त्याला दोन मुली आहेत. त्यापैकी एका मुलीचे लग्न झाले आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, पुण्यातील पौड रस्त्यावरील यशवंतराव मोहिते महाविद्यालयात आरोपी प्राध्यापक आहे. पीडित विद्यार्थीनी मुळची इराणची असून ती मागील एक वर्षापासून पाषाण परिसरात राहते. तिला अकाऊंट विषयात पीएचडीसाठी संबंधित महाविद्यालयात प्रवेश हवा होता. त्यासंबंधी विचारणा करण्यासाठी ती आरोपी बो-हाडे याच्याकडे मंगळवारी (8 ऑगस्ट) रोजी दुपारी एक वाजण्याच्या सुमारास गेली होती. यावेळी आरोपीने प्रवेश करून देण्याच्या बदल्यात तिच्याकडे शरीरसुखाची मागणी केली. परंतु पीडित मुलगी याला नकार देत त्याठिकाणाहून निघून गेली.

या सर्व प्रकाराने घाबरलेल्या तरुणीने याबाबत इराणमधील आपल्या पालकांना कळवले. तर पालकांनी केलेल्या सूचनेनुसार सदरील विद्यार्थिनीने कोथरूड पोलीस ठाणे गाठत झालेल्या प्रकारची माहिती पोलिसांना दिली आहे. प्राध्यापक शिवाजी बोऱ्हाडे यांच्या विरोधात कोथरूड पोलिसांनी विनयभंगाचा गुन्हा दाखल केला असून त्याला अटक करण्यात आली आहे.

10 Aug 2017

एमपीसी न्यूज- पुण्यातील खराड़ी येथील इऑन आयटी पार्क मधील एनॉलिटिक्स कंपनीमध्ये एका संगणक अभियंता महिलेचा सोबत काम करणाऱ्या पाच कर्मचार्यानी विनयभंग केल्याचा प्रकार समोर आला आहे.

या प्रकरणी पीड़ित महिलेच्या तक्रारीवरून एनॉलिटिक्स कंपनीच्या पाच आरोपींच्या विरोधात चंदन नगर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कंपनी प्रशासनाकडे वारंवार तक्रार करूनही करवाई होत नसल्याने पीड़ित महिलेने चंदन नगर पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दाखल केली आहे. पोलीस पुढील तपास करीत आहेत. सविस्तर वृत्त लवकरच....

Page 2 of 64
Open Chat
1
Close chat
Hello! Thanks for visiting us. Please press Start button to chat with our support :)

Start