• 123.jpg
  • IMG-20170812-WA0103.jpg
  • mpc.jpg
  • mpc1.jpg
  • MPC_news.JPG
16 Aug 2017

एमपीसी न्यूज - कसबा पेठेतील श्रीकृष्ण मंडळाची दहिहंडी साजरी करून घरी परतणा-या युवकाचा अचानक मृत्यू झाल्याची ह्रदयद्रावक घटना पुणे शहरातील कसबा पेठ परिसरात घडली. सागर संजय पिंगळे (26, रा. कसबा पेठ) असे मयत झालेल्या तरुणाचे नाव आहे.

याप्रकरणी अधिक माहिती अशी की, सागर हा रात्री (15 ऑगस्ट) कसबा पेठेतील श्रीकृष्ण मंडळाची दहिहंडी साजरी करून रात्री दहा वाजण्याच्या सुमारास मित्रासोबत दुचाकीवर घरी जाण्यासाठी निघाला. तो दुचाकीवर मागे बसला होता. मात्र श्रीकृष्ण मंडळाजवळच तो अचानक बेशुद्ध होऊन खाली कोसळला. त्याला तात्काळ रुग्णालयाच दाखल करण्यात आले. मात्र उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला.

16 Aug 2017

एमपीसी न्यूज - कासारवाडी येथील एका इसमाचे बँक ऑफ इंडियाचे खाते हॅक करुन अज्ञात आरोपीने त्यांच्या खात्यातून तब्ब्ल 90 हजाराची रेल्वेची तिकीटे बुक केली आहेत. ही ऑनलाईन चोरी केवळ सात दिवसात झाली असल्याची तक्रार भोसरी पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.

भरत कुशावह (वय.51 रा. केशवनगर,कासारवाडी) यांनी भोसरी पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारी नुसार त्यांच्या बँक ऑफ इंडियाच्या खात्यातून एका अज्ञाताने 9 ते 16 नोव्हेंबर 2016 या सात दिवसाच्या कालावधीत आय.आर.सी.टी.सी मार्फत ऑनलाईन पद्धतीने वेळोवेळी वेगवेगळ्या ठिकाणची तिकीटे बुक केली आहेत. मात्र ही बाब फिर्यादीच्या उशीरा लक्षात आल्याने त्यांनी आता तक्रार दाखल केली आहे.

भोसरी पोलिसांनी अज्ञाता विरोधात आर्थिक फसवणुकीचा गुन्हा दाखल केला असून पोलीस अधिक तपास करत आहेत.

16 Aug 2017


एमपीसी न्यूज - पश्चिम बंगालमधील एका अल्पवयीन मुलीला नोकरी लावून देण्याचे आमिषाने पुण्यात आणले आणि 40 हजार रुपयात बुधवार पेठेतील एका कुंटणखान्यात विकले. त्यानंतर तिला डांबून ठेवून तिच्या इच्छेविरूध्द वेशाव्यवसाय करवून घेतल्याचा प्रकार उघडकीस आला. याप्रकरणी पीडित मुलीने फरासखाना पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दिली असून पोलिसांनी केलेल्या कारवाईत एका अल्पवयीन मुलीसह 4 तरुणींची सुटका केली. याप्रकरणी आठ जणांवर फरासखाना पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला.

जमाल (पूर्ण नाव माहीत नाही, मूळ रा. पश्चिम बंगाल ), राजु सय्यद, रुपा हसन शेख, बाबु उर्फ पापा तन्वीर यांच्यासह 8 जणांवर इटपा अॅक्ट कलम अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला.

याप्रकरणी अधिक माहिती अशी की, पीडित मुलीला नोकरी देण्याच्या बहाण्याने पुण्यात आणले होते. पुण्यात आणल्यानंतर बुधवार पेठेतील कुंटणखान्यात 40 हजार रुपयात तिची विक्री करून तिला वेशाव्यवसाय करण्यास भाग पाडले जात होते. ही माहित पीडित मुलीने पोलिसांना दिल्यावर फरासखाना पोलिस आणि सामाजिक सुरक्षा विभागाच्या अधिका-यांनी बुधवार पेठेतील रुपा शेख व बाबु उर्फ पापा तन्वीर यांच्या शांती बिल्डींग येथील कुंटणखान्यावर छापा टाकला. यावेळी त्या ठिकाणी असलेल्या 1 अल्पवयीन आणि तीन सज्ञान मुलींची सुटका करण्यात आली. यातील तिघांना अटक करण्यात आली असून 18 ऑगस्ट पर्यंत त्यांना पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे

16 Aug 2017

एमपीसी न्यूज- जीवघेण्या 'ब्लू व्हेल' या गेमची लिंक तातडीने हटविण्यात यावी असा आदेश केंद्र सरकारने गुगल, फेसबुक, व्हॉट्सअप, इन्स्टाग्राम, याहू आणि मायक्रोसॉफ्ट या कंपन्यांना दिले आहेत. त्यामुळे या जीवघेण्या गेमपासून नवीन पिढीच्या आयुष्याला असलेला धोका दूर झाला आहे.

'ब्लू व्हेल' या गेममध्ये देण्यात येणाऱ्या टास्कमुळे देशात अनेक ठिकाणी आत्महत्येच्या घटना घडल्याचे दिसून आले होते. त्यामुळे या गेमवर बंदी आणण्याची मागणी देशभरातून करण्यात येत होती. नुकत्याच पार पडलेल्या संसदेच्या पावसाळी अधिवेशनात 'ब्लू व्हेल' गेमवर देशात तात्काळ बंदी घालण्याची मागणी सर्वपक्षीय खासदारांनी सभागृहात केली होती. त्यांच्या या मागणीवर केंद्र सरकारने संभाव्य धोका ओळखून या गेमची लिंक हटविण्याचे आदेश गुगल, फेसबुक, व्हॉट्सअप, इन्स्टाग्राम, याहू आणि मायक्रोसॉफ्ट या कंपन्यांना दिले आहेत.

या गेममुळे देशातील लहान मुलांच्या आयुष्याला धोका निर्माण झाला होता. दुर्दैवाने या गेममुळे काही जणांना आपला जीव गमवावा लागला. या घटनांची गंभीर दखल घेत केंद्र शासनाने या गेमवर बंदी घालून या गेमची लिंक हटविण्याचे आदेश संबंधित कंपन्यांना दिले. खासदार अमर साबळे यांनीही या संदर्भात संसदेमध्ये हा मुद्दा उपस्थित करून या गेमवर बंदी आणण्याची मागणी केली होती.

14 Aug 2017


आरोपीला निगडी पोलिसांकडून अटक

एमपीसी न्यूज - चिंचवडच्या एका महिलेस आरोपीने पोलीस असल्याची बतावणी करून तिच्याशी शारीरिक संबंध ठेवले. तसेच तिच्याकडून 2 लाख 15 हजार रुपये लुबाडले. याप्रकरणी निगडी पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.

स्वप्नीलकुमार शहाजी थोरात (वय 27 रा. आळंदी), असे आरोपीचे नाव आहे.

संबंधित महिला विवाहित असून तिची संबंधित आरोपीशी ओळख झाल्यानंतर आरोपीने आपण पोलीस असून लग्नही करणार असल्याचे आमिष तिला दाखवले. मात्र, पीडित महिलेला वेळोवेळी धमकी देऊन तिच्याशी शारीरिक संबंध ठेवले व तिच्याकडे असलेली रोख रक्कम 2 लाख 15 हजार रुपये ही देण्यास सांगितले.

या प्रकरणी महिलेने दिलेल्या फिर्यादीनुसार, आरोपीवर फसवणूक व बलात्काराचा गुन्हा दाखल केला असून निगडी पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. आज त्याला न्यायालयात हजर केले असता चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

14 Aug 2017

चार आरोपी आळंदी पोलिसांच्या ताब्यात
एमपीसी न्यूज - आळंदी परिसरातील सराईत गुन्हेगार संग्राम अर्जून आघाव (वय. 26 रा आळंदी) याचा एका टोळक्याने दगड व विटांनी ठेचून खून केला. ही घटना शनिवारी (दि.12) रात्री साडेनऊच्या सुमारास केळगाव ( ता.खेड) येथे हनुमान वाडी परिसरात घडली.

याप्रकरणी विकास मारुती वहिले, सत्यपाल शेषराव हरेल, सुधीर बबन वहिले,संतोष दामोदर वहिले ( सर्व रा.केळगाव,ता.खेड ) या चार आरोपींना आळंदी पोलिसांनी अटक केली असून आणखी एक आरोपी विजय वीरकर हा फरार आहे.

आघाव हा आळंदी येथील कोयता गँगचा सक्रीय गुन्हेगार होता. त्याने दोन वर्षापूर्वी कोळगावचे माजी सरपंच अमोल विरकर यांच्यावर जीवघेणा हल्ला केला होता. तसेच त्याच्यावर इतरही गंभीर गुन्हे दाखल होते.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार शनिवारी रात्री साडेनऊच्या सुमारास केळगाव ( ता.खेड) येथे हनुमान वाडी परिसरात ही घटना घडली आहे.आरोपीनी दगड वीट,लाकडी दांडक्याने आघावच्या डोक्यावर जबर मारहाण केली. या मारहाणीत तो जबर जखमी झाला. त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले असता उपचारा पूर्वीच त्याचा मृत्यू झाला. मृत्यूपूर्व जबानीत त्याने पोलिसांना सदर आरोपींची नावे सांगितली. 

याप्रकरणी चारही आरोपींविरोधात खुनाचा गुन्हा दाखल झाला असून आळंदी पोलीस या प्रकरणी अधिक तपास करत आहेत.

14 Aug 2017

एमपीसी न्यूज- एका अनोळखी इसमाने एका 20 वर्षीय तरुणीचा पाठलाग करून तिचा विनयभंग केल्याचा प्रकार नुकताच पुण्यात घडला. कोरेगावपार्क पोलिसांनी अनोळखी इसमाच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एका अनोळखी इसमानेपीडित तरुणीचा पाठलाग करून तिचा मित्र राहत असलेल्या सोसायटीमध्ये तरुणीचे तोंड दाबून तिच्यावर प्रेम करतो असे सांगून तिच्या इच्छेविरुद्ध जवळीक साधण्याचा प्रयत्न केला. तिच्याकडे शारीरिक सुखाची मागणी करून पोलिसात तक्रार केल्यास जीवे मारण्याची धमकी दिली.

पीडित तरुणीच्या तक्रारीवरून अनोळखी इसमाविरुद्ध कोरेगाव पार्क पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस पुढील तपास करीत आहेत.

14 Aug 2017

एमपीसी न्यूज- स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी शहरात कडेकोट बंदोबस्त तैनात केला आहे. गर्दीची ठिकाणे, लॉज, हॉटेल्स यांची तपासणी करण्यात येत असून, शहरांच्या प्रवेशाच्या ठिकाणी नाकाबंदी करून वाहनांची तपासणी केली जात आहे. 

शहरात मंगळवारी स्वातंत्रदिन उत्साहात साजरा करण्यासाठी शाळा, महाविद्यालये, सरकारी कार्यालयांमध्ये जय्यत तयारी सुरू आहे. दरम्यान पुण्याला दहशतवादी कारवायांचा धोका व घातपाताची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे पोलिसांकडून स्वातंत्र्यदिन शांततेने आणि सुरक्षितपणे साजरा व्हावा यासाठी पोलिसांकडून चोख बंदोबस्त तैनात केला आहे. स्वातंत्र्यदिनाच्या दोन ते तीन दिवस आधीपासून शहरातील लॉज, हॉटेल यांची तपासणी सुरू केली आहे. बस स्थानक, रेल्वेस्टेशन येथील तपासणी केली आहे. सर्व पोलीस ठाण्याच्या हद्दीतील संवेदनशील ठिकाणांची पहाणी करून बंदोबस्त तैनात केला आहे.

13 Aug 2017
एमपीसी न्यूज- कर्वे नगर येथील गुन्हेगाराचा डोणजे गावाजवळील हॉटेलमध्ये सात ते आठ जणांनी तीक्ष्ण शस्त्राने वार करून निघृणपणे खून केल्याची  घटना समोर आली . रविवारी सायंकाळी साडेसातच्या सुमारास हि घटना घडली असून, हल्लेखोर पसार झाले आहेत.
 
स्वप्नील जयचंद्र देशमुख (32, कर्वेनगर) असे खून झालेल्याचे  नाव आहे.
 
स्वप्नील देशमुख  हा त्याचा मित्र विशाल शेळके याच्यासोबत सिंहगड परिसरात फिरायला गेला होता. त्यानंतर  डोणजे गावाजवळील एका हॉटेलमध्ये जेवण करण्यासाठी थांबले होते. त्यावेळी तोंडाला रुमाल बांधून आलेल्या सात ते आठ हल्लेखोरांनी हॉटेलमध्ये घुसून स्वप्नील देशमुखवर तीक्ष्ण हत्याराने  सपासप वार केले.
 
त्यावेळी मित्र शेळके तेथून पळाला. घटनेत गंभीर जखमी देशमुखला तातडीने खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारापुर्वीच त्याचा मृत्यू झाला. हवेली पोलिसांनी माहिती मिळताच घटनास्थळी धाव घेतली. 
दरम्यान स्वप्नील याच्यावर खुनाचा प्रयत्न, मारामारी. दहशत पसरविणे असे गुन्हे दाखल होते.
13 Aug 2017

दीड लाखांचे विदेशी मद्य जप्त

एमपीसी न्यूज -  राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाने काळेवाडी येथे  आज (13 ऑगस्टला) छापा टाकला. या कारवाईत एक लाख 41 हजार किमतीचे विदेशी मद्य जप्त करण्यात आले. 

शशी जमुनादास हिराणी (वय 35, रा. उल्हासनगर), असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राज्य उत्पादन शुल्क विभागास काळेवाडी येथे विदेशी मद्याचा बेकायदेशीर साठा असल्याची खबर मिळाली. त्यानुसार काळेवाडीत भरारी पथकाने छापा टाकला. दमन या केंद्रशासित प्रदेशासाठी विक्रीस असणारे विदेशी मद्याचे सतरा बॉक्स जप्त केले. या मद्याची किंमत एक लाख 41 हजार रुपये इतकी आहे. बेकायदेशीर साठा केल्याप्रकरणी दारूबंदी कायद्यानुसार राज्य उत्पादन शुल्क भरारी पथकाने ही कारवाई केली. 

ही कारवाई उपायुक्त अर्जुन ओहोळ, अधीक्षक मोहन वर्दे, उपाधिक्षक सुनील फुलपगार यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक तानाजी शिंदे, उपनिरीक्षक एम व्ही कदम तसेच या विभागातील एस वाय दरेकर, एस एस कांबळे, एम व्ही जाधव यांच्या भरारी पथकाने केली.

12 Aug 2017

एमपीसी न्यूज - पोलीस असल्याचे सांगून व्यावसायिकांकडून सोन्यासह आदी गोष्टी खरेदी करून त्यांना विविध बँकांचे तसेच दुस-याच व्यक्तीचे बनावट धनादेश देवून फसवणूक करणा-या सराईत गुन्हेगारास चिंचवड पोलीसांनी अटक केली.

तुकाराम शांताराम रौधळ (वय 33, रा. रौंधवाडी) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. त्याच्यावर शहरातील विविध पोलीस ठाण्यात 12 गुन्हे दाखल आहेत. याप्रकरणी सांगवीतील सराफी व्यावसायिक देवराज सोनी (वय 40, रा. पिंपळे-निलख) यांनी सांगवी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोनी यांचे सांगवी येथे व्हारायटी या नावाने सराफी पेढी आहे. आरोपीने पोलीस असल्याचे सांगून 33 हजार 784 रूपयांची सोन्याची चैन खरेदी केले. पैसे न देता पंजाब ऍण्ड सिंध बॅंकेचा बनावट धनादेश देवून आर्थिक फसवणूक केली. याच आरोपीने काळेवाडीत न्युराज शिलाई मशीन दुकानातून नोव्हेल कंपनीची शिलाई मशीन खरेदी केली. रोख पैसे न देता आरोपीने बॅक ऑफ महाराष्टचा दुस-या व्यक्तीचा धनादेश देवून साडेसात हजारांची फसवणूक केल्याचे उघडकीस आली आहे. याप्रकरणी कन्हैया वर्मा (वय-25, रा. काळेवाडी) यांनी वाकड पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.

आरोपी तुकाराम रौधळ हा सराईत गुन्हेगार आहे. त्याच्यावर शहरातील विविध पोलीस ठाण्यात फसवणुकीचे 12 गुन्हे दाखल आहेत. चिंचवड पोलीसांनी त्याला शनिवारी अटक करून मोरवाडी न्यायालयात हजर केले होते. न्यायालयाने एक दिवसाची पोलील कोठडी सुनावली आहे.

12 Aug 2017

एमपीसी न्यूज - मोटारीला बुलेटचा धक्का लागल्याच्या कारणावरून तरूणाला दोघांनी मारहाण करत अपहरण केले आणि तरूणाची बुलेट चोरून नेली. ही घटना मोशी टोलनाका येथे मंगळवारी दुपारी सव्वातीनच्या सुमारास घडली.

हर्षअंकित सिंग (वय 22, रा. धानोरी) याने भोसरी, एमआयडीसी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार मोटारीतील दोन अज्ञात आरोपीविरूध्द गुन्हा दाखल केला आहे.

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, हर्षअंकित हा मंगळवारी मोशी टोलनाका येथून जात होता. त्याच्या बुलेटचा एका मोटारीला धक्का लागला. यावरून मोटारीतील दोघांनी त्याला मारहाण करत त्याची बुलेट चोरून नेली. त्याला मोटारीत जबरदस्तीने बसवून अपहरण केले. पुना क्लब येथे घेवून गेले. तेथून हर्षअंकित याने आरोपीच्या तावडीतून आपली सुटका करून घेतली आणि पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दिली. एमआयडीसी पोलीस तपास करत आहेत.

12 Aug 2017

एमपीसी न्यूज - सासरच्या शारिरीक व मानसिक छळाला कंटाळलेल्या नवविवाहितेने आठ ऑगस्ट रोजी आत्महत्या केली होती. याप्रकरणी तिच्या सासू- सास-यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून पतीला पोलिसांनी अटक केली.

चेतल हेमकर्ण पवार (वय 25) असे आत्महत्या केलेल्या विवाहितेचे नाव आहे. हेमकर्ण आसाराम पवार (वय 27, रा. सॅन्टोसा पर्ल हौसिंग सोसायटी, वाकड) असे अटक करण्यात आलेल्या पतीचे नाव आहे. याप्रकरणी चेतलची आई भारती पाटील (वय-45, रा. अंमळनेर, जळगाव) यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, चेतल व हेमकर्ण यांचा 11 फेब्रुवारी 2017 मध्ये विवाह झाला होता. लग्नाच्या काही दिवसानंतर चेतलाकडे पती, सासू व सास-याकडून माहेराहून पैसे आणण्याची मागणी होऊ लागली. या कारणावरून तिचा शारिरीक व मानसिक छळ सुरू केला. या छळाला कंटाळून चेतलने 8 ऑगस्ट रोजी सोसायटीच्या 11 व्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली होती. सहायक पोलीस निरीक्षक एम. पी. सोनवणे अधिक तपास करत आहेत.

12 Aug 2017

एमपीसी न्यूज - पुणे-मुंबई एक्सप्रेस वेवर एका कार चालकाला स्टेअरिंगवरच हृदयविकाराचा झटका आला. चालकाने वेळीच कार रस्त्याच्या बाजूला घेऊन वेळीच हॅण्डब्रेक लावला. त्यामुळे पुढील दुर्घटना टळली. मात्र, चालकाचा यात दुर्दैवी अंत झाला.  

तानाजी खाडे (वय 45) असे चालकाचे नाव आहे.

तानाजी हे मुंबईतील चुनाभट्टी परिसरात राहतात. ते मुंबईहून पुण्याकडे येत होते. यावेळी तानाजी यांना घाट परिसरात अस्वस्थ वाटू लागले. त्यामुळे त्यांनी कार रस्त्याच्या बाजूला लावली. चढणावरून गाडी मागे येऊ नये म्हणून हॅण्डब्रेक लावल्याने मोठी दुर्घटना टळली. पुढील काही क्षणातच त्यांनी प्राण सोडले.

PCMC AD HALF PAGE new

11 Aug 2017


एमपीसी न्यूज - वाकड येथील भूमकर चौकात आपले कर्तव्य बजावणा-या महिला वाहतूक कर्मचा-यास कर्तव्य बजावत असताना युवकाने हातवारे करत व अपशब्द वापरून तिचा विनयभंग केला. ही घटना काल (गुरुवारी) सकाळी नऊ वाजता घडली असून हिंजवडी पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.

परीक्षीत प्रभाकरराव देशमुख (वय. 37 रा. एम्प्रेस पार्क, बालेवाडी), असे अटक आरोपीचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, महिला वाहतूक पोलीस कर्मचारी काल त्यांचे कर्तव्य बजावत असताना देशमुख त्याच्या दुचाकीवरून पुणे बँगलोर महामार्गावरून सर्व्हिस रोडच्या उलट्या दिशेने जात होता. यावेळी त्याला थांबण्यास सांगितले असता त्याने गाडी भरधाव वेगात घेतली व महिला कर्मचा-यास हातवारे करत अपशब्द वापरले तसेच गाडी सरळ त्यांच्या अंगावर घालून जखमी करण्याचा प्रयत्न केला.

याप्रकरणी आरोपीला हिंजवडी पोलिसांनी तातडीने अटक केली असून त्याच्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे. गेल्या काही दिवसांपासून वाहतूक पोलिसांवरील हल्ले वाढले आहेत. तसे व्हिडिओही सोशल माध्यमांवर प्रसारीत झाले आहेत. त्यामुळे वाहतूक पोलिसांच्याच सुरक्षिततेचा प्रश्न आता ऐरणीवर आला आहे.

11 Aug 2017


निगडी पोलिसांची कारवाई

एमपीसी न्यूज - निगडी पोलिसांनी दोन वेगवेगळ्या कारवाईमध्ये वाहन चोरी करणा-या दोन चोरांना जेरबंद केले असून त्याच्यांकडून एक रिक्षा व दोन दुचाकी जप्त केल्या आहेत.

दिनेश आत्माराम गंडले (वय 25 रा, मोरे बिल्डींग, आळंदी) तर गणेश धर्मानाप्पा बिराजदार (वय 27 रा. ट्रान्सपोर्टनगर निगडी, मूळ निलंगा लातूर), अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.

पहिल्या प्रकरणात पोलिसांना निगडीतील चिकन चौक येथे एक संशयीत इसम घाईगडबडीत रिक्षा घेऊन जाताना दिसला. त्याला गस्त घालणा-या पोलिसांनी त्याची चौकशी केली असता त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. तपास केला असता गाडीचा क्रमांक हा बनावट असून चासी व इंजिन नंबर दोन्ही बनावट असल्याचे समोर आले. त्यानंतर त्याला पोलिसांनी तातडीने ताब्यात घेतले. संबंधित आरोपीकडून 30 हजार रुपये पोलिसंनी जप्त केले व अधिक तपास केला असता त्याच्यावर देहूरोड पोलीस ठाण्यातही दुचाकी चोरीचा गुन्हा असल्याचे उघड झाले आहे.

तर दुस-या गुन्ह्यामध्ये पोलीस चोरीला गेलेल्या बुलेटचे सीसीटीव्ही फुटेज तपासले असता आरोपीची ओळख पटली. त्यानुसार पोलिसांनी कारवाई करत आरोपी गणेश बिराजदार याला ट्रान्सपोर्टनगर येथून अटक केले. त्याच्याकडून पोलिसांनी 2 लाख किंमतीची तीन वाहने जप्त केली. त्याचावर निगडी पोलीस ठाणे येथे दोन तर देहूरोड येथे एक असे तीन गुन्हेही तपासाअंती उघड झाले आहेत.

ही कारवाई निगडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजयकुमार पळसुले, पोलीस निरीक्षक गुन्हे शंकर आवताडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक देवेंद्र चव्हाण, मच्छिंद्र घनवट, तात्या तापकीर, मंगेश गायकवाड, नारायण जाधव, आनंद चव्हाण, नितीन बहिरट यांनी केली.

11 Aug 2017


आकुर्डी स्थानकाजवळ रेल्वेच्या धडकेत विद्यार्थ्याचा मृत्यू

एमपीसी न्यूज - महाविद्यालयाचे दिवस हे फुलपाखरा सारखे असतात. येथे येणारा प्रत्येक तरुण व तरुणी उत्साही व डेअरींगबाज असतो. मात्र, हा उत्साह व हे डेअर जीव घेणारेही ठरू शकते. याच डेअर व उत्साहात कानात हेडफोन घालून रेल्वेचा रुळ ओलांडत असताना त्याचा दुर्दैवी अंत झाला. ही दुर्दैवी घटना आज दुपारी साडेचार वाजता आकुर्डी रेल्वे स्थानकाजवळ घडली.

ओमकार दशरथ ओडाफे (वय.16 रा. तळेगाव), असे मयत विद्यार्थ्याचे नाव आहे.

ओमकार ने नुकतेच निगडी येथील पिंपरी-चिंचवड एज्युकेशन ट्रस्टच्या तंत्रनिकेतन (पॉलिटेक्निक) महाविद्यालयात मेकॅनिकल शाखेच्या पहिल्या वर्षाला प्रवेश घेतला होता. आज त्याचा महाविद्यालयाचा पहिलाच दिवस होता. पहिल्या दिवशी काही मित्रांच्या ओळखी केल्या. त्या ओळखी मनात साठवून तो नव्या स्वप्नांसह घरी परतण्यासाठी रेल्वेस्थानकावर येत असताना हा अपघात घडला.

रेल्वे प्रशासानाचे सर्व नियम धाब्यावर बसवून त्याने कानात हेडफोन घालून दाद-याचा वापर न करता सरळ रुळ ओलांडणे पसंत केले. याच त्याच्या आत्मविश्वासाने त्याचा घात केला पुण्याकडे जाणा-या एक्सप्रेसगाडीने त्याला उडवले यातच त्याचा दुर्दैवी अंत झाला.

यामुळे त्याच्या घरच्यांनाच नाही तर महाविद्यालय प्रशासनालाही चांगलाच धक्का बसला आहे. कारण करता-सवरता तरुण केवळ निष्काळजीपणामुळे त्याच्या आयुष्याला मुकला आहे. त्याचे आई-वडील तळेगाव येथे माळीकाम करतात. त्यांचा असा शिकणारा तरुण मुलगा गेल्याने त्यांच्या घरावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

यामध्ये त्याच्याजवळ असलेल्या महाविद्यालयाच्या ओळखपत्रावरून त्याची ओळख पटली. चिंचवड रेल्वे पोलिसांनी त्याचा नातेवाईकाला कळवले असून त्याचा मृतदेह पिंपरीच्या यशवंतराव चव्हाण रुग्णालयात पाठविण्यात आला आहे.  मात्र यावेळी तरुणांनी रुळ ओलांडणे, चालत्या गाडीतून स्टंट करणे टाळावे, असे आवाहन रेल्वे पोलिसांनी केले आहे.

PCMC AD HALF PAGE new

11 Aug 2017


एमपीसी न्यूज - पुणे शहरातील हडपसर आणि वारजे भागात झालेल्या दोन वेगवेगळ्या अपघातात दोघांचा मृत्यू झाला. या घटना 8 आणि 9 ऑगस्ट रोजी घडल्या. दत्ता दाईजोडे आणि एक 35 वर्षीय अनोळखी इसमाचा यामध्ये मृत्यू झाला.

यातील पहिल्या घटनेत वारजेतील डुक्कर खिंड येथे भरधाव वेगातील दुचाकी स्लीप होऊन रस्त्यावर पडल्याने यामध्ये गंभीर जखमी झालेला दुचाकीचालक दत्ता दिगंबर दाईजोडे (रा. बालेवाडी) याचा मृत्यू झाला. तर अन्य एका घटनेत हडपसर येथील ए.एम.महाविद्यालयाच्या समोर अज्ञात वाहनाने धडक दिल्याने एकाचा मृत्यू झाला आहे.

Page 2 of 64
Open Chat
1
Close chat
Hello! Thanks for visiting us. Please press Start button to chat with our support :)

Start