• 123.jpg
  • IMG-20170812-WA0103.jpg
  • mpc.jpg
  • mpc1.jpg
  • MPC_news.JPG
17 Aug 2017


सीसीटीव्हीच्या माध्यमातून महिलेचा अपहरणाचा बनाव उघड

24 तासात गुन्ह्याची उकल

एमपीसी न्यूज - बोपोडी येथे भरदिवसा माझे बाळ माझ्यापासून हिसकावून नेले असा बनाव करणा-या महिलेनेच आपले दहा दिवसाचे बाळ केवळ इर्षेपोटी नदी पात्रात फेकल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे. तिचा हा बनाव खडकी पोलीसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेजच्या माध्यमातून उघडकीस आणला.

रेश्मा रियासत शेख (वय. 20 रा. बॉम्बे कॉलनी, दापोडी) असे आरोपी महिलेचे नाव असून पोलीसांनी तिला काल (बुधवार) ताब्यात घेतले आहे.

बोपोडी येथे काल (बुधवारी) सकाळी रिक्षातून प्रवास करणाऱ्या एका सहप्रवासी महिलेने चक्क बाळाच्या आईला धक्का देऊन त्यांची दहा दिवसाची मुलगी पाठविल्याची घटना घडली होती. रेश्मा शेख (वय 20 रा. दापोडी) या खडकी येथील एका खासगी रुग्णालयात आपल्या मुलीला उपचारासाठी घेऊन गेल्या होत्या. परतत असताना त्यांनी शेअर रिक्षा केली होती. त्या रिक्षात आधीपासूनच एक महिला प्रवास करत होती. शेख ही पैसे देण्यासाठी खाली उतरली असता आतील महिलेने तिच्या जवळील बाळ हिसकावून रिक्षातून ती पळून गेली अशी तक्रार रेश्मा शेख हिने खडकी पोलिसांत दिली होती.

मात्र रेश्मा शेख हिने दिलेली माहीती संभ्रमात टाकणारी व संशयास्पद होती, कारण तिने सांगितलेल्या मार्गावरुन चुकीच्या दिशेने रिक्षा भरधाव वेगाता एका बाळाचे अपहरण करुन नेणे शक्य नाही. त्यामुळे पोलिसांचा संशय बळावला. यावेळी पोलिसांनी त्या परिसरातील हॉटेल, दुकान यांचे सुमारे दहा सीसीटीव्ही फुटेज तपासले त्यात काही ठिकाणी तिच्या हातात मुल आहे तर काही ठिकाणी नाही. तर एका फुटेजमध्ये रेश्मा शेख ही चालत आली व तिने एका दुकानांसमोर येताच अचानक आरडा ओरड करत रोडवरी पडली व तीने त्या ठिकाणी उपस्थित स्थानिकांना माझे मुल गेले असा कागांवा करताना दिसून आली. त्यामुळे पोलीसांचा संशय खऱा ठरला. पोलिसांनी तिची कसून चौकशी केली असता तीने तिचा गुन्हा कबूल केला.

गुन्हा कबूल करताना तिने सांगितले की, तिच्या जावेला काही दिवसांपुर्वी मुलगा झाला त्यात शेख यांना एक मोठी मुलगी आहे, एक मुलगा आहे, त्यानंतर एक मुलगी झाली ती न्युमोनियाने वारली त्यानंतर ही चिमुकली झाली. मात्र जावेला मुलगा आणि मला तीसरी मुलगी याचा राग तिच्या मनात होता. दरम्यान मुलगी आजरी होती तिच्या डोळे पिवळे झाले होते व ती सतत लघवी करत होती. त्यामुळे रेश्माने तिला औंध येथील शेवाळे हॉस्पिटलमध्ये नेले व तेथेच तिने तिला मारण्याचा निर्णय घेतला. तीने तेथून निघताच बाळाला बोपोडीच्या पुलावरून नदीत फेकले.

या तपासात पोलिसांनी श्वान पथकाची मदत घेतली असता श्वानांनीही बोपोडी पुलापर्यंत मार्ग काढला. त्यामुळे अवघ्या 24 तासात खडकी पोलीसांनी गुन्हयाची उकल केली.ही करावाई वरीष्ठ पोलीस निरीक्षक लक्ष्मण बोराटे, पोलीस निरीक्षक अजित लकडे, पालीस उपनिरीक्षक मदन कांबळे व पोलीस कर्मच्या-यांनी केली.

17 Aug 2017

एमपीसी न्यूज - वाल्हेकरवाडी येथील राजवाडा लॉजच्या खोलीत एका 19 वर्षीय तरुणाने खोलीमध्ये पंख्याला गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. ही घटना आज (बुधवारी) सकाळी साडेआठ वाजता उघडकीस आली.

नयन सुबोध शिंदे (वय19 रा. पोलीस लाईन, वाकड) असे मृत तरुणाचे नाव आहे. याविषयी देहुरोड पोलीस ठाण्यात हॉटेलचे व्यवस्थापक दिवाकर भास्कर शेट्टी (वय.28 रा. मस्केवस्ती, रावेत) यांनी खबर दिली. नयन याने 13 ऑगस्ट रोजी रात्री दहा वाजता हॉटेल राजवाडा येथील खोली क्रमांक 202 बुक केली. त्यानंतर आज सकाळी त्याच्या खोलीचा दरवाजा उघडला नाही. त्यामुळे मॅनेजर स्वतः तेथे चौकशीसाठी गेले असता दरवाजा वाजवूनही आतून प्रतिसाद मिळाला नाही. शेवटी हॉटेल व्यवस्थापनाने खोलीच्या मागच्या बाजूच्या खिडकीमधून पाहिले असता नयनने गळफास घेलत्याचे उघडकीस आले.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नयन याच्या वडिलांचे निधन झाले आहे.त्यामुळे तो, आई आणि बहीण त्याच्या वाकड येथील पोलीस लाईनमध्ये राहत असलेल्या मामाकडे रहात होते. मामा हिंजवडी वाहतूक शाखेमध्ये पोलीस कर्मचारी म्हणून कार्यरत आहेत. तर नयन हा हॉटेलमध्ये कामे करत होता.  रविवारी (दि.13) तो घरून भांडण करुन हॉटेल राजवाडा येथे राहण्यास आला. तेथे त्याने तीन ते चार दिवस वास्तव्य करुन शेवटी आत्महत्या केली. 

घटनास्थळाची देहुरोड पोलिसांनी पाहणी केली असून आत्महत्येचे नेमके कारण अद्याप कळाले नसून पोलीस अधिक तपास करत आहेत.

 

17 Aug 2017

मुलगी गरोदर राहिल्याने प्रकरण उघडकीस

एमपीसी न्यूज- भोसरी येथील दहावीची मुलगी बोर्डाच्या पेपरसाठी शाळेत गेली असताना एक अज्ञात इसमाने तिच्यावर बलात्कार केल्याची तक्रार भोसरी पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे.

आरोपी अज्ञात असून ही घटना मार्च ते एप्रिल दरम्यान घडली असल्याचे फिर्यादीने सांगितले आहे. पीडित मुलगी उर्दूच्या पेपर संपवून परतत असताना शाळेच्या आवारातच एक अज्ञात इसमाने तिच्यावर जबरदस्ती केली.मुलीने घाबरून घरी सांगितले नाही मात्र आता ती गरोदर राहिल्या नंतर सारा प्रकार उघडकीस आला आहे. मात्र या प्रकरणात पीडित मुलीनेही आरोपी व घटनेबद्दल स्पष्ट माहिती दिलेली नाही. 

भोसरी पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपी विरुध्द गुन्हा दाखल केला असून पोलीस अधिक तपास करत आहेत.

16 Aug 2017
एमपीसी न्यूज - येरवडा येथील फायर ब्रिगेडच्या कार्यालयासमोरील रस्त्यावर खोदलेल्या खड्ड्यात प्रवाशी रिक्षा कोसळली. सुदैवाने या अपघातात कुठलीही जीवितहानी नाही झाली. ही घटना आज (बुधवार) रोजी रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास घडली.
येरवड्यातील हा रस्ता कामानिमित्त खोदण्यात आला होता. येथून जाणाऱ्या वाहनांना अपघात होऊ नये यासाठी खड्ड्याच्या बाजूने बॅरिकेट्स लावण्यात आले होते. परंतु हे बॅरिकेट्सही या खड्ड्यात पडले होते. त्यामुळे रात्रीच्या सुमारास जाणाऱ्या रिक्षाला अंदाज न आल्याने ती सरळ खड्ड्यात कोसळली.
16 Aug 2017


एमपीसी न्यूज - मोरवाडी येथील अशोका पॅथॉलॉजी समोर पजेरो गाडी चालकाने बेदरकारपणे गाडी चालवून तेथे उभ्या असलेल्या सहा दुचाकींना धडक दिली आहे. ही घटना आज (बुधवारी) सकाळी साडेअकरा वाजता घडली.

आरोपी अजित सुरेश गिलबिले (वय 22 रा. पवनानगर काळेवाडी), असे आरोपीचे नाव असून तोही जखमी आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार गिलबिले त्याच्या मित्राची पजेरो (गाडी क्रमांक एम.एच.12 जे. एम. 3456) गाडी घेऊन निघाला होता. सकाळी साडेअकरा वाजता तो अशोका पॅथॉलॉजी जवळ आला असता त्याचे गाडीवरचे नियंत्रण सुटले व त्याने पार्किंगमध्ये उभ्या असलेल्या सहा दुचाकीला धडक दिली. यामध्ये पार्किंगला लावलेल्या दुचाकीवर बसलेले नामदेव चुडामन पाटील, त्यांची पत्नी व मुलगी हे जखमी झाले तर गिलबिले स्वतःही जखमी झाला आहे. जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू आहे. या अपघातात कारची पुढची काच, बोनेट तुटले यात दोन लाखांचे नुकसान झाले आहे. 

याप्रकरणी गिलबिले याच्यावर गुन्हा दाखल झाला असून पिंपरी पोलीस अधिक तपास करत आहेत.

16 Aug 2017


एमपीसी न्यूज - तळेगाव येथील बेबेड ओहळ येथे एकाला तिघांनी चाकूचा धाक दाखवून साडेसहा लाख रुपयांना लुटले. ही घटना आज (बुधवारी) दुपारी साडेचारच्या सुमारास घडली. बेबेड ओहोळ (ता.मावळ) हद्दीत पवनानदीवरील दुरुस्ती सुरु असलेल्या पुलाजवळ घडली. 


याप्रकरणी सूर्य मोनी हुर्रा जेना (वय 44, रा. वडगाव ता. मावळ जि.पुणे) यांनी तळेगाव पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार तीन अज्ञातांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी सूर्य हे बेबेड ओहोळ हद्दीत अभिजित कंपनीतील कामगारांच्या पगारासाठीचे साडेसात लाख रुपये तळेगाव दाभाडे येथील अभ्युदय बँकेतून काढून बॅगेतून घेऊन त्यांच्या दुचाकीवरून ते कंपनीकडे निघाले होते. यावेळी दुचाकी बेबेड ओहोळ येथील पवनानदीवरील दुरुस्ती सुरू असलेल्या पुलाजवळ आली असता, काळ्या रंगाच्या सीबीझेड दुचाकीवरून आलेल्या अज्ञात तीन दरोडेखोरांनी जैना यांच्या गाडीला जोरात धक्का देऊन खाली पाडले. त्यांच्या जवळील साडेसात लाख रुपये असलेली बॅग हिसकावताना दरोडेखोरांनी हातातील चाकूने वार करून दमदाटी, मारहाण व झटापट करताना बॅग फाटल्याने त्यातील एक लाख रुपये खाली पडले. दरोडेखोरांनी बॅगेतील साडेसहा लाख रुपये घेऊन पसार झाले. काही कळण्याच्या आत अचानक लाखोंची रोकड लुटल्याने जेना घाबरले होते. या झटापटीत जेना यांच्या हाताला जखम झाली आहे.

16 Aug 2017


एमपीसी न्यूज - कोंढवा पोलीस ठाण्याच्या हद्दीत मार्च महिन्यात डोक्यात दगड घातलेल्या आणि अर्धवट जळालेल्या अवस्थेत एका महिलेचा मृतदेह सापडला होता. तेव्हा मृतदेहाची ओळख पटू शकली नव्हती, परंतू खब-याकडून मिळालेल्या माहितीच्या आधारावरून पोलिसांनी या घटनेचा उलगडा केला असून याप्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला. पत्नीला वेश्या व्यवसायास प्रवृत्त करीत असल्याच्या संशयातून 'त्या' महिलेची हत्या केल्याचे आरोपीने कबूल केले आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली.

विकी जठार (वय-25, रा. अप्पर इंदिरा नगर, पुणे), असे हत्या केलेल्या आरोपीचे नाव आहे. आरोपी सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर खून, दरोड्याची तयारी आणि मारामारीचे गुन्हे दाखल आहेत. दुसरा आरोपी हृषिकेश श्रीकांत गाडे (वय-22, रा. अप्पर इंदिरा नगर, पुणे), सराईत गुन्हेगार आहे. त्याने जेजुरी येथील बँक ऑफ महाराष्ट्राची 43 लाख रुपयाची रक्कम लुटल्याचा गुन्हा त्याच्यावर दाखल आहे. या गुन्ह्यात त्याच्यावर मोक्का अन्वये कारवाई करण्यात आली असून सध्या तो याच गुन्ह्यात जामिनावर बाहेर आहे. बिबवेवाडी, हडपसर पोलीस ठाण्यात त्याच्यावर मारामारी व खंडणीचे गुन्हे दाखल आहेत. त्याचा मित्र विकी दुस-या एका गुन्ह्यात नाशिकच्या तुरुंगात शिक्षा भोगत आहे.

याप्रकरणी अधिक माहिती अशी की, या गुन्ह्याचा तपास करत असताना गुन्हे शाखेचे फौजदार उदय मोरे आणि हवालदार दिनेश गडांकुश यांना संशयीत आरोपीची माहिती मिळाली होती. त्यानुसार गुन्हे शाखेच्या पोलिसांनी वारजे येथील म्हाडा कॉलनीत छापा टाकून हृषिकेश गाडे याला अटक केली.

हृषिकेश गाडे याच्याकडे केलेल्या अधिक चौकशीत विकी जठार याने त्या महिलेची हत्या केल्याची कबुली दिली. जठार याला राणी ही महिला त्याच्या पत्नीला वाममार्गाला लावत असल्याचा संशय होता. त्यावरून त्याने राणी हिला विचारणा केली असता त्यांच्यात वादावादी झाली. यातून त्याने आणि त्याच्या अन्य एका मित्राने कोयत्याचे वार करून तिला ठार मारले. त्यानंतर दगडाने तिचा चेहरा विद्रुप केला. हृषिकेश गाडे याने दुचाकीतील पेट्रोल काढून तिच्या अंगावर ओतून आग लावली आणि पळून गेले.

ही कामगिरी सहाय्यक पोलीस उपआयुक्त पंकज डहाणे, सहाय्यक पोलीस आयुक्त सुरेश भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सतिश निकम, सहाय्यक पोलीस निरीक्षक अन्सार शेख, फौजदार मोरे, उगले, हवालदार गडांकुश, खराडे, पठाण, भिलारे, नरुटे, जंगीलवाड, पवार यांनी केली.

16 Aug 2017


एमपीसी न्यूज - शिवाजीनगर कोर्टातील न्यायाधीश असलेल्या महिलेच्या पतीने कर्तव्य निभावत असलेल्या वाहतूक कर्मचा-याला मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार आज दुपारच्या सुमारास कर्वे रस्त्यावर घडला. घटना घडल्यानंतर सहा तासानंतरही आरोपीवर गुन्हा दाखल झाला नव्हता. ही घटना जवळच असलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाली आहे.

रवींद्र इंगळे, असे मारहाण झालेल्या पोलीस कर्मचा-याचे नाव आहे. श्याम भदाणे असे मारहाण करणा-या दुचाकीचालकाचे नाव आहे. मारहाण करणाऱ्यांमध्ये एका युवतीचाही समावेश आहे.

इंगळे हे वाहतूक नियमनाचे काम करत असताना सिग्नल तोडून निघालेल्या एका दुचाकीला त्यांनी अडवले. त्यावरून दुचाकी चालक आणि त्यांच्यात बाचाबाची झाली. त्यानंतर दुचाकी चालकाने थेट पोलिसांच्या अंगावर गाडी घालण्याचा प्रयत्न केला. इतकंच नाही तर मोटारसायकलवरील दोघांनी त्या पोलिसांना मारहाण केली.

दरम्यान, दुपारच्या सुमारास घडलेल्या या घटनेनंतर श्याम भदाणे यांच्यावर अद्यापही गुन्हा दाखल केलेला नाही. भदाणे यांची पत्नी न्यायाधीश असल्याने त्यांना स्पेशल ट्रीटमेंट मिळत असल्याचा आरोप आहे. त्यामुळे आपल्या देशात खरच कायदा सर्वांसाठी समान आहे का? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

16 Aug 2017


एमपीसी न्यूज - एस.एम. जोशी पुलावरून एका विद्यार्थीनीने मुठा नदीत उडी मारल्याचे पाहताच एका तरुणाने क्षणाचाही विलंब न करता तिच्या पाठोपाठ लगेच उडी मारून तरुणीला वाचवले. ही घटना सोमवारी सायंकाळी घडली. 

समीर शेख (वय 18) असे या तरुणीला वाचवणा-या तरुणाचे नाव आहे. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही तरुणी मूळची पनवेलची असून पुण्यात शिक्षणासाठी आलेली आहे. पुण्यात ती पेइंगेस्ट म्हणून राहते. डेक्कन परिसरातील महाविद्यालयात तिसऱ्या वर्षाला शिकते. तरुणीच्या मैत्रिणी अभ्यासात हुशार असून त्यांच्या एवढा अभ्यास होत नसल्यामुळे ती नैराश्यात आली होती. त्यातून ती सोमवारी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास एस. एम. जोशी पुलावर आली. तिने पुलावरून नदीमध्ये उडी घेतली.

त्यावेळी समीर हा तरुण दुचाकीवरून पुलावरून जात होता. त्याने हा प्रकार पाहिला आणि त्याने ही तत्काळ तिच्या मागे पुलावरून नदीत उडी घेऊन तिला वाचविले. मुलीने नदीत उडी मारल्याचे पाहिल्यानंतर पुलावर मोठी गर्दी झाली होती. तसेच, अनेकांनी नदीपात्रात जाऊन दोघांना बाहेर काढले. नागरिकांनी तात्काळ पोलिसांना घटनेची माहिती दिली. त्यानंतर तरुणीला तात्काळ उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले.

16 Aug 2017


बोपोडी येथील घटना

एमपीसी न्यूज - बोपोडी येथे रिक्षातून एका महिलेने चक्क बाळाच्या आईला धक्का देऊन त्यांची दहा दिवसाची मुलगी पळवली. ही घटना आज (मंगळवारी) सकाळी अकराच्या सुमारास घडली.


पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रेश्मा शेख (वय 20 रा. दापोडी) या खडकी येथील एका खासगी रुग्णालयात आपल्या मुलीला उपचारासाठी घेऊन गेल्या होत्या. परतत असताना त्यांनी शेअर रिक्षा केली होती. त्या रिक्षात आधीपासूनच एक महिला प्रवास करत होती. शेख पैसे देण्यासाठी खाली उतरली असता आतील महिलेने त्यांच्या जवळील बाळ हिसकावून घेतले व शेख यांना जोराचा धक्का दिला व रिक्षातून ती पळून गेली.

याप्रकरणी महिलेने रिक्षावाला व अज्ञात महिलेविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. मात्र, फिर्यादी यांनी दिलेली माहिती थोडी संभ्रमात टाकणारी आहे. त्यामुळे पोलीस दोन्ही बाजुने तपास करत आहेत. 

16 Aug 2017

एमपीसी न्यूज - कसबा पेठेतील श्रीकृष्ण मंडळाची दहिहंडी साजरी करून घरी परतणा-या युवकाचा अचानक मृत्यू झाल्याची ह्रदयद्रावक घटना पुणे शहरातील कसबा पेठ परिसरात घडली. सागर संजय पिंगळे (26, रा. कसबा पेठ) असे मयत झालेल्या तरुणाचे नाव आहे.

याप्रकरणी अधिक माहिती अशी की, सागर हा रात्री (15 ऑगस्ट) कसबा पेठेतील श्रीकृष्ण मंडळाची दहिहंडी साजरी करून रात्री दहा वाजण्याच्या सुमारास मित्रासोबत दुचाकीवर घरी जाण्यासाठी निघाला. तो दुचाकीवर मागे बसला होता. मात्र श्रीकृष्ण मंडळाजवळच तो अचानक बेशुद्ध होऊन खाली कोसळला. त्याला तात्काळ रुग्णालयाच दाखल करण्यात आले. मात्र उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला.

16 Aug 2017

एमपीसी न्यूज - कासारवाडी येथील एका इसमाचे बँक ऑफ इंडियाचे खाते हॅक करुन अज्ञात आरोपीने त्यांच्या खात्यातून तब्ब्ल 90 हजाराची रेल्वेची तिकीटे बुक केली आहेत. ही ऑनलाईन चोरी केवळ सात दिवसात झाली असल्याची तक्रार भोसरी पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.

भरत कुशावह (वय.51 रा. केशवनगर,कासारवाडी) यांनी भोसरी पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारी नुसार त्यांच्या बँक ऑफ इंडियाच्या खात्यातून एका अज्ञाताने 9 ते 16 नोव्हेंबर 2016 या सात दिवसाच्या कालावधीत आय.आर.सी.टी.सी मार्फत ऑनलाईन पद्धतीने वेळोवेळी वेगवेगळ्या ठिकाणची तिकीटे बुक केली आहेत. मात्र ही बाब फिर्यादीच्या उशीरा लक्षात आल्याने त्यांनी आता तक्रार दाखल केली आहे.

भोसरी पोलिसांनी अज्ञाता विरोधात आर्थिक फसवणुकीचा गुन्हा दाखल केला असून पोलीस अधिक तपास करत आहेत.

16 Aug 2017


एमपीसी न्यूज - पश्चिम बंगालमधील एका अल्पवयीन मुलीला नोकरी लावून देण्याचे आमिषाने पुण्यात आणले आणि 40 हजार रुपयात बुधवार पेठेतील एका कुंटणखान्यात विकले. त्यानंतर तिला डांबून ठेवून तिच्या इच्छेविरूध्द वेशाव्यवसाय करवून घेतल्याचा प्रकार उघडकीस आला. याप्रकरणी पीडित मुलीने फरासखाना पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दिली असून पोलिसांनी केलेल्या कारवाईत एका अल्पवयीन मुलीसह 4 तरुणींची सुटका केली. याप्रकरणी आठ जणांवर फरासखाना पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला.

जमाल (पूर्ण नाव माहीत नाही, मूळ रा. पश्चिम बंगाल ), राजु सय्यद, रुपा हसन शेख, बाबु उर्फ पापा तन्वीर यांच्यासह 8 जणांवर इटपा अॅक्ट कलम अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला.

याप्रकरणी अधिक माहिती अशी की, पीडित मुलीला नोकरी देण्याच्या बहाण्याने पुण्यात आणले होते. पुण्यात आणल्यानंतर बुधवार पेठेतील कुंटणखान्यात 40 हजार रुपयात तिची विक्री करून तिला वेशाव्यवसाय करण्यास भाग पाडले जात होते. ही माहित पीडित मुलीने पोलिसांना दिल्यावर फरासखाना पोलिस आणि सामाजिक सुरक्षा विभागाच्या अधिका-यांनी बुधवार पेठेतील रुपा शेख व बाबु उर्फ पापा तन्वीर यांच्या शांती बिल्डींग येथील कुंटणखान्यावर छापा टाकला. यावेळी त्या ठिकाणी असलेल्या 1 अल्पवयीन आणि तीन सज्ञान मुलींची सुटका करण्यात आली. यातील तिघांना अटक करण्यात आली असून 18 ऑगस्ट पर्यंत त्यांना पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे

16 Aug 2017

एमपीसी न्यूज- जीवघेण्या 'ब्लू व्हेल' या गेमची लिंक तातडीने हटविण्यात यावी असा आदेश केंद्र सरकारने गुगल, फेसबुक, व्हॉट्सअप, इन्स्टाग्राम, याहू आणि मायक्रोसॉफ्ट या कंपन्यांना दिले आहेत. त्यामुळे या जीवघेण्या गेमपासून नवीन पिढीच्या आयुष्याला असलेला धोका दूर झाला आहे.

'ब्लू व्हेल' या गेममध्ये देण्यात येणाऱ्या टास्कमुळे देशात अनेक ठिकाणी आत्महत्येच्या घटना घडल्याचे दिसून आले होते. त्यामुळे या गेमवर बंदी आणण्याची मागणी देशभरातून करण्यात येत होती. नुकत्याच पार पडलेल्या संसदेच्या पावसाळी अधिवेशनात 'ब्लू व्हेल' गेमवर देशात तात्काळ बंदी घालण्याची मागणी सर्वपक्षीय खासदारांनी सभागृहात केली होती. त्यांच्या या मागणीवर केंद्र सरकारने संभाव्य धोका ओळखून या गेमची लिंक हटविण्याचे आदेश गुगल, फेसबुक, व्हॉट्सअप, इन्स्टाग्राम, याहू आणि मायक्रोसॉफ्ट या कंपन्यांना दिले आहेत.

या गेममुळे देशातील लहान मुलांच्या आयुष्याला धोका निर्माण झाला होता. दुर्दैवाने या गेममुळे काही जणांना आपला जीव गमवावा लागला. या घटनांची गंभीर दखल घेत केंद्र शासनाने या गेमवर बंदी घालून या गेमची लिंक हटविण्याचे आदेश संबंधित कंपन्यांना दिले. खासदार अमर साबळे यांनीही या संदर्भात संसदेमध्ये हा मुद्दा उपस्थित करून या गेमवर बंदी आणण्याची मागणी केली होती.

14 Aug 2017


आरोपीला निगडी पोलिसांकडून अटक

एमपीसी न्यूज - चिंचवडच्या एका महिलेस आरोपीने पोलीस असल्याची बतावणी करून तिच्याशी शारीरिक संबंध ठेवले. तसेच तिच्याकडून 2 लाख 15 हजार रुपये लुबाडले. याप्रकरणी निगडी पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.

स्वप्नीलकुमार शहाजी थोरात (वय 27 रा. आळंदी), असे आरोपीचे नाव आहे.

संबंधित महिला विवाहित असून तिची संबंधित आरोपीशी ओळख झाल्यानंतर आरोपीने आपण पोलीस असून लग्नही करणार असल्याचे आमिष तिला दाखवले. मात्र, पीडित महिलेला वेळोवेळी धमकी देऊन तिच्याशी शारीरिक संबंध ठेवले व तिच्याकडे असलेली रोख रक्कम 2 लाख 15 हजार रुपये ही देण्यास सांगितले.

या प्रकरणी महिलेने दिलेल्या फिर्यादीनुसार, आरोपीवर फसवणूक व बलात्काराचा गुन्हा दाखल केला असून निगडी पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. आज त्याला न्यायालयात हजर केले असता चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

14 Aug 2017

चार आरोपी आळंदी पोलिसांच्या ताब्यात
एमपीसी न्यूज - आळंदी परिसरातील सराईत गुन्हेगार संग्राम अर्जून आघाव (वय. 26 रा आळंदी) याचा एका टोळक्याने दगड व विटांनी ठेचून खून केला. ही घटना शनिवारी (दि.12) रात्री साडेनऊच्या सुमारास केळगाव ( ता.खेड) येथे हनुमान वाडी परिसरात घडली.

याप्रकरणी विकास मारुती वहिले, सत्यपाल शेषराव हरेल, सुधीर बबन वहिले,संतोष दामोदर वहिले ( सर्व रा.केळगाव,ता.खेड ) या चार आरोपींना आळंदी पोलिसांनी अटक केली असून आणखी एक आरोपी विजय वीरकर हा फरार आहे.

आघाव हा आळंदी येथील कोयता गँगचा सक्रीय गुन्हेगार होता. त्याने दोन वर्षापूर्वी कोळगावचे माजी सरपंच अमोल विरकर यांच्यावर जीवघेणा हल्ला केला होता. तसेच त्याच्यावर इतरही गंभीर गुन्हे दाखल होते.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार शनिवारी रात्री साडेनऊच्या सुमारास केळगाव ( ता.खेड) येथे हनुमान वाडी परिसरात ही घटना घडली आहे.आरोपीनी दगड वीट,लाकडी दांडक्याने आघावच्या डोक्यावर जबर मारहाण केली. या मारहाणीत तो जबर जखमी झाला. त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले असता उपचारा पूर्वीच त्याचा मृत्यू झाला. मृत्यूपूर्व जबानीत त्याने पोलिसांना सदर आरोपींची नावे सांगितली. 

याप्रकरणी चारही आरोपींविरोधात खुनाचा गुन्हा दाखल झाला असून आळंदी पोलीस या प्रकरणी अधिक तपास करत आहेत.

14 Aug 2017

एमपीसी न्यूज- एका अनोळखी इसमाने एका 20 वर्षीय तरुणीचा पाठलाग करून तिचा विनयभंग केल्याचा प्रकार नुकताच पुण्यात घडला. कोरेगावपार्क पोलिसांनी अनोळखी इसमाच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एका अनोळखी इसमानेपीडित तरुणीचा पाठलाग करून तिचा मित्र राहत असलेल्या सोसायटीमध्ये तरुणीचे तोंड दाबून तिच्यावर प्रेम करतो असे सांगून तिच्या इच्छेविरुद्ध जवळीक साधण्याचा प्रयत्न केला. तिच्याकडे शारीरिक सुखाची मागणी करून पोलिसात तक्रार केल्यास जीवे मारण्याची धमकी दिली.

पीडित तरुणीच्या तक्रारीवरून अनोळखी इसमाविरुद्ध कोरेगाव पार्क पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस पुढील तपास करीत आहेत.

14 Aug 2017

एमपीसी न्यूज- स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी शहरात कडेकोट बंदोबस्त तैनात केला आहे. गर्दीची ठिकाणे, लॉज, हॉटेल्स यांची तपासणी करण्यात येत असून, शहरांच्या प्रवेशाच्या ठिकाणी नाकाबंदी करून वाहनांची तपासणी केली जात आहे. 

शहरात मंगळवारी स्वातंत्रदिन उत्साहात साजरा करण्यासाठी शाळा, महाविद्यालये, सरकारी कार्यालयांमध्ये जय्यत तयारी सुरू आहे. दरम्यान पुण्याला दहशतवादी कारवायांचा धोका व घातपाताची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे पोलिसांकडून स्वातंत्र्यदिन शांततेने आणि सुरक्षितपणे साजरा व्हावा यासाठी पोलिसांकडून चोख बंदोबस्त तैनात केला आहे. स्वातंत्र्यदिनाच्या दोन ते तीन दिवस आधीपासून शहरातील लॉज, हॉटेल यांची तपासणी सुरू केली आहे. बस स्थानक, रेल्वेस्टेशन येथील तपासणी केली आहे. सर्व पोलीस ठाण्याच्या हद्दीतील संवेदनशील ठिकाणांची पहाणी करून बंदोबस्त तैनात केला आहे.

Page 1 of 64
Open Chat
1
Close chat
Hello! Thanks for visiting us. Please press Start button to chat with our support :)

Start