• 123.jpg
  • IMG-20170812-WA0103.jpg
  • mpc.jpg
  • mpc1.jpg
  • MPC_news.JPG
23 Aug 2017

एमपीसी न्यूज - अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी एका तरुणाला विशेष न्यायाधीश के. के. जहागीरदार यांनी तीन वर्षे सक्तमजुरी आणि सात हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली आहे. हा सर्व प्रकार 13 नोव्हेंबर 2015 रोजी दुपारी तीनच्या सुमारास थेरगाव येथे घडला होता. पीडित मुलीच्या आईने याप्रकरणी वाकड पोलिसांत फिर्याद दाखल केली होती.

शंकर जिवारामजी प्रजापती (वय 26, रा. थेरगाव) असे शिक्षा सुनावलेल्या तरुणाचे नाव आहे. घटनेच्या दिवशी पीडित मुलगी पेन आणण्यासाठी आरोपीच्या दुकानात गेली होती. त्यावेळी त्याने तिच्यावर बलात्कार केला. याप्रकरणी अतिरीक्त सरकारी वकील जावेद खान यांनी सहा साक्षीदार तपासले. त्यानुसार प्रजापती याला तीन वर्ष सक्तमजुरी आणि सात हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावण्यात आली.

23 Aug 2017

एमपीसी न्यूज - बहीण स्वयंपाक करत असताना झालेल्या भांडणात मेहुण्याने बहिणाला मारहाण केली. याचा राग आल्याने भावानेच मेहुण्यावर कु-हाडीने वार केल्याची घटना चिंचवडच्या दळवीनगर परिसरात घडली आहे. ही घटना काल (मंगळवारी) रात्री दहा वाजता घडली.

भावड्या उर्फ आकाश भारत कुदळे (रा. दळवीनगर, चिंचवड) असे आरोपीचे नाव असून आज दुपारी चिंचवड पोलिसांनी त्याला अटक केली आहे. शंकर भारत धुमाळ (वय 35) असे या घटनेमध्ये जखमी झालेल्या मेहुण्याच्या नाव असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. याप्रकरणी जखमीचा भाऊ मंगल सोनवणे याने चिंचवड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीची बहीण मोनाली धुमाळ घरी स्वयंपाक करत असताना तिचा नवरा शंकर भारत धुमाळ (वय 35) याने तिला स्वयंपाक झाला का असे विचारले असता मोनालीने हो स्वयंपाकच करतेय असे म्हटल्यानंतर शंकर व मोनाली यांच्यात भांडणे झाली. यात शंकरने मोनालीला मारहाण केली. बहिणाला केलेल्या मारहाणीचा राग आल्याने आकाश याने कु-हाडीने शंकर याच्या डोक्यावर व मानेवर वार केले. यात शंकर जखमी झाला.

पोलिसांनी आज आकाश याला अटक केली असून त्याच्यावर मेहुण्याला जिवे मारण्याचा प्रयत्न केल्या बद्दल गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास चिंचवड पोलीस करत आहेत.

23 Aug 2017

एमपीसी न्यूज - गणपतीची वर्गणी न दिल्याने कार्यालयात घुसून धक्काबुक्की करत जिवे मारण्याची धमकी दिल्याचा प्रकार डेक्कन परिसरात मंगळवार (22 ऑगस्ट) रोजी घडला.

याप्रकरणी एका व्यक्तीने डेक्कन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून उद्दलसिंग दुधाणी (रा. रामटेकडी, हडपसर,पुणे) आणि मलक्यासिंग दुधाणी यांच्यासह अन्य एकावर गुन्हा दाखल केला.

याप्रकरणी अधिक माहिती अशी की, फिर्यादी हे शिवाजीनगर परिसरातील नाईकनवरे डेव्हलपर्सच्या कार्यालयात असिस्टंट कन्सलटंट व सिक्युरिटी अधिकारी म्हणून काम करतात. मंगळवारी वर नमूद केलेल्या आरोपींनी सकाळी साडेअकराच्या सुमारास कार्यालयात येऊन त्यांच्याकडे 11 हजार रुपये गणपतीची वर्गणी मागितली. ती न दिल्यास जिवे मारण्याची धमकी देत त्यांना धक्काबुक्की केली. याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक खरात अधिक तपास करीत आहेत.

23 Aug 2017
एमपीसीन्यूज - पुण्यातील कात्रज परिसरातील नव्याने बांधकाम होणा-या बिल्डींग साईटवर काम करणा-या कामगाराचा नवव्या मजल्यावरून पडून जागीच मृत्यू झाला. ही घटना 19 ऑगस्ट रोजी सकाळी 9.45 वाजता घडली. याप्रकरणी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
 
राजेश गोविंद साहू (वय-23, रा.गोकुळनगर, कात्रज. पुणे) असे मयताचे नाव आहे. याप्रकरणी सितेंदरसिंग शिवजी सिंग (वय-40, रा.कात्रज. पुणे) या ठेकेदारावर गुन्हा दाखल करण्यात आला.
मयत राजेश साहु हा कात्रजच्या शिवशंभो नगर येथील यशवंत विहार या बांधकाम साईटवर काम करत होता. या दरम्यान ठेकेदाराने सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातून आवश्यक साधनसामुग्री पुरवली नाही. दरम्यान राजेश शाहू हा नवव्या मजल्यावर काम करत असताना तोल जाऊन खाली पडला. यामध्ये त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्याचा मृत्यू झाला.
23 Aug 2017

एमपीसी न्यूज - पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर कामशेत जवळील पवना पोलीस चौकीसमोर ट्रकने कारला धडक दिल्याने झालेल्या अपघातात कारमधील दोन जण जखमी झाले. पहाटे 2.30 वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला.

महामार्ग पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुंबईहून पुण्याच्या दिशेने जाणारी हुंडाई कार क्र. (M H04/HN 4923) या गाडीचा पुढील बाजूचा डावीकडील टायर फुटल्याने चालक गाडी रोडच्या कडेला घेत असताना मागून आलेली ट्रक (MH 09/L 858) ची कारला जोरात धडक बसल्याने कारमधील सौरब कुमार (रा. पुणे) हे गंभीर जखमी झाले असून कारचालक किरकोळ जखमी झाला आहे.

अपघाताची माहिती समजल्यानंतर अपघातस्थळी आलेले महामार्ग पोलीस व आयआरबीच्या कर्मचार्‍य‍ांनी दोन्ही जखमींना रुग्णवाहिकेतून लोकमान्य हॉस्पिटल निगडी येथे पाठविण्यात आले असून अपघातग्रस्त वाहने रस्त्यावरून बाजूला करत वाहतूक सुरळीत करण्यात आली आहे.

tempo

23 Aug 2017

एमपीसी न्यूज - नगर-कल्याण महामार्गावर स्विफ्ट डिझायर कारने पेट घेतल्याने आगीत होरपळून तिघांचा मृत्यू झाला. ही दुर्घटना जुन्नर तालुक्यातील वडगाव आनंद गावाजवळील सातकर मळा येथे रात्री दीडच्या सुमारास घडली.

दिलीप चंद्रराव नवले (वय 45 वर्षे रा. बाभुळवाडी, ता. पारनेर जि. नगर), नरेश सखाराम वाघ (वय 42 वर्षे रा. पिंपळवंडी, ता. जुन्नर), प्रशांत सुरेश चासकर (वय 23 वर्ष रा. चासकर मळा, वडगाव आनंद ता. जुन्नर) अशी या घटनेत मृत्युमुखी पडलेल्यांची नावे आहेत.

पोलसांनी दिलेल्या माहितीनुसार, स्विफ्ट डिझायर कारमधून तिघेजण जात असताना नगर कल्याण रस्त्यावर वडगाव आनंद गावाजवळील सातकर मळा येथून जात असताना रस्त्याच्या कडेला धडकून गाडीने अचानक पेट घेतला. ही घटना आळेफाटा पोलीस ठाण्याच्या हद्दीत रात्री दीडच्या सुमारास घडली. गाडीला आग लागल्याची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. आसपासच्या नागरिकांच्या मदतीने मदतीने पाणी टाकून आग विझवण्याचा प्रयत्न केला. मात्र, तोपर्यंत आग मोठ्या प्रमाणात भडकली होती. यात अडकलेल्या तिघांचाही आग विझवेपर्यंत जागीच होरपळून मृत्यू झाला. 

पोलिसांनी अकस्मात मृत्यू अशी नोंद केली आहे. पुढील तपास चालू आहे.

Fire

22 Aug 2017


आठ गाड्यांच्या काचा फोडल्या

एमपीसी न्यूज - काळेवाडी ते पिंपरीगाव येथील बीआरटीएस मार्गावर उभ्या केलेल्या चारचाकी वाहनांच्या काचा फोडून त्यातील कार टेप चोरणा-या सहा आरोपींना वाकड पोलिसांनी अटक केली आहे. ही घटाना आज (सोमवारी) पहाटे सव्वा एक वाजता घडली होती.

ईरफान जमशेर शेख (वय.24 रा. जय मल्हार नगर, थेरगाव), संदिप सुरेश गंभीरे (वय.21 रा.गणराज कॉलनी, थेरगाव), प्रसाद रोहिदास भापकर (वय.19 रा.रहाटणी), अविनाश विष्णुदास भुरे (वय.22 रा.काळेवाडी), राहूल शहादेव झेंडे (वय.20, रा. जय मल्हार नगर, थेरगाव), आकाश सुरेश गेजगे (वय.20 रा. गणराज कॉलनी, थेरगाव) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. शिवाजी बोईनवाड व इतर नागरिकांनी याविषयी वाकड पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. 

आज पहाटे सव्वा एक वाजता काऴेवाडी फाटा ते पिंपरी गाव या बंद असलेल्या बीआरटीएस मार्गावर पार्कींगसाठी लावेलेल्या आठ चार चाकी गाड्यांची तोडफोड करत त्यातील दोन कारटेप आरोपींनी चोरले होते. यामध्ये 10 हजार रुपयांचे दोन कारटेप व गाड्यांचे अंदाजे 30 हजार रुपयांचे नुकसान करण्यात आले होते. पोलिसांनी या घटनेचा तपास लावून सहा आरोपींना अटक केली.

आरोपींना आज मोरवाडी न्यायालयात हजर केले असता आरोपींना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. पुढील तपास वाकड पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक अभिजीत जाधव करत आहेत.

22 Aug 2017


एमपीसी न्यूज - पुण्यातील कसबा पेठेतील क्विक सर्व्हिसेस कुरियरच्या कार्यालावर भरदिवसा तीन चोरट्यांनी बंदुकीचा धाक दाखत दोन लाखांची जबरी चोरी केली. ही घटना आज (मंगळवारी) दुपारी घडली.

मिळालेल्या माहितीनुसार, दुपारी दुचाकीवरुन तीनजण आले व त्यांनी कर्मचा-यांना बंदूक दाखवून कार्यालयातील दोन लाख रुपये व तीन मोबाईल चोरुन नेले. मध्यवस्तीत भरदिवसा झालेल्या घटनेमुळे नागरिक व व्यापा-यांमध्ये भितीचे वातावरण आहे.

घटनेची माहिती मिळताच गुन्हे शाखेचे पथक व फरसखाना पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून प्रत्यक्षदर्शी व सीसीटीव्ही फुटेजद्वारे तपास करत आहेत.

22 Aug 2017


पुणे ग्रामीण पोलिसांची कामगिरी; तीन कोटींचा माल आरोपींकडून जप्त

एमपीसी न्यूज - प्राप्तिकर विभागाचे अधिकारी असल्याचा बनाव करीत पुण्याहून निपाणीकडे कारमधून निघालेल्या सराफाला बंदुकीचा धाक दाखवून त्याच्याकडील सुमारे तीन कोटीचे दागिने लुबाडणाऱ्या तिघांना पुणे ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने अटक केली आहे. ही घटना शनिवारी (दि. 19) घडली. खंबाटकी घाटात सराफाची गाडी आडवून त्याला भोर ते महाडच्या दरम्यान वरंधा घाटात नेऊन बंदुकीचा धाक दाखवून लुटण्यात आले होते.


शंतनू नितीन डांगे (वय.32 रा. सदिच्छा अपार्टमेंट, नवसाह्याद्री कर्वेनगर पुणे), संदीप ज्ञानेश्वर राजीवडे (वय.32 रा. ढोणे अपार्टमेंट वारजे माळवाडी दांगट इस्टेट पुणे मूळ रा.कर्णावट, भोर), राहुल बाळकृष्ण धवले (वय. 28 रा.ढोणे अपार्टमेंट वारजे माळवाडी) यांना अटक करण्यात आली आहे. तर महेश साळुंखे (वय.30 रा. कात्रज) हा फरार आहे.

वरील आरोपींनी खंबाटकी घाटात सराफाला प्राप्तिकर खात्याचे अधिकारी असल्याचे भासवून त्याला चौकशीसाठी नेणार असल्याचे सांगितले. मात्र काही अंतर पुढे गेल्यानंतर वरंधा घाटात त्यांनी गाडी बाजूला घेवून बंदुकीचा धाक दाखवून 2 कोटी 90 लाख रुपयांचे 43 किलो सोने लुटले. याप्रकरणी सातारा येथील खंडाळा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

तपासादरम्यान आरोपीच्या गाडीचा नंबर खेड शिवापूर टोल नाक्यावरून घेऊन मालकाचा शोध घेतला असता ती कार पुण्यातील गॅरेज मध्ये सर्व्हिसींगला दिली असल्याची माहिती मिळाली. त्यावरून डांगे याची ओळख पटली त्याला ताब्यात घेवून केलेल्या चौकशीत इतर तीन आरोपींची माहिती मिळाली. यातील एक जण फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.

डांगे याच्याकडे गुन्ह्यातील मालाबाबत चौकशी केली असता त्याने सांगितले, भोर ते महाड या रस्त्याने माल घेऊन जात असताना वरंधा घाटाच्या खाली रायगड पोलिसांची नाकाबंदी दिसली तेथून आरोपीनी त्यांच्याकडील कार न थांबवता तशीच पुढे नेली परंतु याच्यापुढेही नाकाबंदी असेल आणि तेथे पोलीस गाडी पकडतील म्हणून त्यांनी कार एका कच्च्या रस्त्याने आत नेऊन त्या रस्त्यावर उभ्या असलेल्या जुन्या, भंगार व मोडकळीस आलेल्या ट्रकमध्ये सर्व ज्वेलरी असलेल्या बॅग्स टाकल्या आणि पळून गेले अशी माहिती सांगितली. त्यावरून त्या ठिकाणी जाऊन भोर आणि खंडाळा पोलिसांच्या मदतीने गुन्ह्यातील चोरीस गेलेली 33 किलो घाऊक व 10 किलो निव्वळ वजनाचे सोन्याचे दागिने जप्त केले.

पुणे ग्रामीण पोलिसांनी हे तिन्ही आरोपी खंडाळा पोलिसांच्या ताब्यात दिले असून खंडाळा पोलीस पुढील तपास करत आहेत.

22 Aug 2017


एमपीसी न्यूज - रावेत येथील 33 वर्षीय युवकाचे मास्टर क्रेडिट कार्ड वरुन अज्ञाताने दीड लाख रुपये भारतीय चलनातून विदेशी चलनात रुपांतर करुन स्वतःच्या खात्यात घेऊन फसवणूक केली.

योगेश वासुदेव बोरले (वय.33 रा. श्रावणी सोसायटी, रावेत) यांनी याप्रकरणी देहुरोड पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

बोरले यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, त्यांना एका अनोळखी क्रमांकावरुन अज्ञात व्यक्तीचा फोन आला व त्याने बोरले यांना तुमच्या क्रेडिट कार्डवरुन मल्टीपल ट्रॅन्झॅक्शन होत आहेत का असे विचारले. त्यावेळी बोरले यांनी अशा प्रकारचे ट्रॅन्झॅक्शन होत नसल्याचे सांगितले. मात्र काही वेळानंतर अज्ञाताने त्यांच्या मास्टर क्रेडिट कार्डवरुन भारतीय चलनातील 1 लाख 29 हजार 180 रुपये विदेशी चलनात ट्रॅन्झॅक्शन करुन ती रक्कम स्वत:च्या जमा करुन घेतली.

याप्रकरणी देहुरोड पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरुद्ध आर्थिक फसवणुकीचा गुन्हा दाखल केला असून पोलीस अधिक तपास करत आहेत.

22 Aug 2017


एमपीसी न्यूज - तुम्ही दुचाकीवरुन जाताय अन अचानक तुमच्या पाठीमागून गाडीवर येणारे सदगृहस्थ तुम्हाला तुमच्या गाडीच्या चाकातील हवा कमी असल्याचे सांगत असतील तर सावधान कारण ते सदगृहस्त त्या रॅकेटचाच एक भाग आहेत. कारण तुम्हाला गाडी चालवताना जाणवत नाही पण त्यांना तुमच्या गाडीतील हवा कमी झालेली दिसते. पुढे जवळच्याच त्यांच्याच पंक्चर वाल्याकडून हजारो रुपये उकळायचे. हे रॅकेट खऱे तर एका महाविद्यालयीन मुलांच्या ग्रुपने त्यांच्या हुशारीने उघड पाडले.

प्रसंग खडकी येथील शुक्रवारी (दि.18) एक तरुण त्याच्या बुलेटवरुन रात्रीच्यावेळी खडकी येथून दापोडीकडे चालला होता. तेवढ्यात त्याला पाठीमागून गाडीवर येणा-या मुलाने तुमच्या पाठीमागच्या चाकातील हवा कमी झाली आहे, असे सांगितले. त्याला खरे तर जाणावले नाही पण त्याने उगीच शंका नको म्हणून जवळच्याच एका पंक्चरच्या दुकानाजवळ गाडी थांबवून त्याला हवा भरण्यास सांगितली. दुकानदारही तत्परतेने पुढे आला त्याने बोलत बोलत हवा भरत असताना त्या तरुणाला त्याच्या गाडीच्या चाकाला एक नाही दोन नाही तर तब्बल 6 पंक्चर असल्याचे सांगितले. त्याच्या मनात शंकेची पाल चुकचुकली की एवढी गाडी पंक्चर असताना मला का नाही जाणवली आणि दिवसभर तर गाडी ठिक होती, अचानक कसे काय? बर पंक्चरवाला तेवढ्यावर थांबतो कसला त्याने तरुणाला चक्क पंक्चरचा दिड ते दोन हजार रुपयांचा खर्च सांगितला.

त्याने माझ्याजवळ तेवढे पैसे नाहीत असे सांगितले व मित्राला बोलावून घेतले. हा ..हा. म्हणता त्याचे चार ते पाच मित्र आले परिस्थीती पाहून मित्रांनाही पंक्चरवाल्याची शंका आली व त्यांनी थेट खडकी पोलीस ठाणे गाठले व पंक्चरवाल्यांचे हे रॅकेटच येथे काम करत असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आणून दिले. त्यानुसार या रॅकेट विरोधात खडकी पोलीस ठाण्यात अदखलपात्र तक्रार अर्ज दाखल करण्यात आली आहे. याआधीही या परिसरात अशा घटना घडल्या असून अगदी पैसै नसतील तर घरी जा पैसे आणा व मग गाडी घेवून जा इथपर्यंत या रॅकेटची मुजोरी चालल्याचेही काहींनी सांगितले. तसेच खेवळ खडकी नाही तर शहरात इतर ठिकाणीही असे अनेकांना अनुभव आले आहेत.

याप्रकरणी पोलीस घटनास्थळी पोहचेपर्यंत संबंधीत मुलगा पळून गेला. मात्र पोलिसांनी परिसरात चौकशी केली असून एक गाडी व कॉम्प्रेसर ताब्यात घेतला आहे. तसेच असे कोणते खरेच रॅकेट आहे का याचा तपास ही पोलीस घेत आहे. दरम्यान परिसरात पंक्चर काढून देणारी अनेक अनधिकृत दुकाने आहेत. त्यामुळे या भागातून प्रवास करणा-या नागरिकांवर, असा प्रसंग ओढावलाच तर त्यांनी ओळखीच्या पंक्चरवाल्याकडे जाऊन आधी हवा चेक करावी व खात्री पटल्यानंतरच पंक्चर काढून घ्यावे आणि आपली फसवणूक टाळावी, असे आवाहन पोलिसांतर्फे करण्यात आले आहे.
IMG 20170822 WA0033

22 Aug 2017

पुण्याच्या हडपसर परिसरातील घटना

एमपीसी न्यूज -  पत्नीसोबत झालेल्या कडाक्याच्या भांडणानंतर पतीने तिचा ओढणीने गळा आवळून खून केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या सर्व प्रकारानंतर पतीने घराला कुलूप लावून हडपसर पोलीस ठाण्यात जाऊन पोलिसांना सर्व प्रकार सांगितला. ही घटना सोमवारी (दि.21)  मध्यरात्री साडे बारा वाजता  घडली.

माधुरी आकाश चव्हाण (वय 22, रा. हडपसर, पुणे) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. पोलिसांनी याप्रकरणी तिचा पती आकाश चव्हाण(वय-27) याला अटक केली आहे.

मिळालेल्या प्राथमिक  माहितीनुसार,  आकाश आणि माधुरी यांच्यात सोमवारी रात्री कडाक्याचे भांडण झाले. आई आणि वडीलांना पत्नी सांभाळत नाही. घरात छोट्या मोठ्या कारणावरुन भांडत असते. याचा राग आल्यामुळे आकाशने ओढणीने माधुरीचा गळा आवळला आणि तिचे तोंड उशीने दाबून खून केला. त्यानंतर आकाश घराला कुलूप लावून लहान मुलीला घेऊन आईकडे गेला. मुलीला तेथे ठेवले आणि थेट पोलीस  ठाणे गाठले. पोलिसांना सर्व घटना सांगितली. त्यानंतर पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतल्यानंतर हा प्रकार समोर आला.

21 Aug 2017

एमपीसी न्यूज- कौटुंबिक वादातून आपल्याच भाचीच्या पाच महिन्याच्या मुलीचे अपहरण करून पलायन करणाऱ्या महिलेला विश्रांतवाडी पोलिसांनी अवघ्या काही तासातच सोलापूर रेल्वे स्थानकावरून जेरबंद केले. शुक्रवारी (१८ आॅगस्ट)  हा प्रकार घडला.

रत्ना मरोळ (वय ३५, रा. मूळ आंध्रप्रदेश) असे अटक केलेल्या महिलेचे नाव आहे. या प्रकरणी अमृता आखाडे (वय २० रा. धानोरी) यांनी तक्रार दाखल केली आहे. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी रत्ना ही फिर्यादी अमृता यांची मावशी आहे. रत्नाचा अमृताच्या पतीसोबत वाद होता त्या वादातून रत्ना हिने पहाटे साडेपाचच्या सुमारास सर्वजण झोपेत असताना अमृताच्या पाच महिन्याच्या मुलीचे अपहरण करून घरातून पलायन केले. सकाळी अमृताच्या कुटुंबियांनी मोबाइलवर तिच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता आरोपीने कोणताही प्रतिसाद दिला नाही. त्यामुळे घाबरलेल्या अमृता आणि तिच्या  कुटुंबियांनी विश्रांतवाडी पोलिसांत धाव घेत रत्नाविरोधात तक्रार दाखल केली.

विश्रांतवाडी पोलीस ठाण्यातील वरिष्ठ पोलीस निरीक्षक संगीता पाटील यांच्या नेतृत्वाखाली उपनिरीक्षक अभिजीत चौगुले,कर्मचारी दिनकर लोखंडे, सुनील  खंडागळे, विनायक रामाणे, प्रवीण  भालचिम, सुभाष आव्हाड, योगेश चांगण, ज्योती खरात, रूचिका जमदाडे यांच्या पथकाने रत्नाचा शोध सुरू केला. तिच्या  मोबाईल लोकेशननुसार तपास केला असता ती लोणावळा येथे असल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर रात्री साडेआठ वाजता तिच्या मोबाईलचे लोकेशन खडकी  असल्याची माहिती पोलिसांना समजली. रत्ना ही आंध्रप्रदेशमधील आपल्या मूळ गावी जात असावी असा संशय व्यक्त करीत पुणे तसेच सोलापूर रेल्वे पोलिसांना आरोपी महिला आणि तिच्या जवळ असलेल्या लहान मुलीचे फोटो व्हॉटसअप वरून पाठवीत रेल्वेमध्ये तिचा शोध घेण्यास सुरूवात केली. दरम्यान, चेन्नई एक्सप्रेसमधून रात्री बारा वाजता सोलापूर रेल्वे स्थानकावरून रत्ना आणि मुलीस सुखरूप ताब्यात घेतले.
21 Aug 2017

मुंबईकडे जाणारी वाहतूक काहीकाळ खोळंबली 

एमपीसी न्यूज - पुणे-मुंबई द्रुतगतीमार्गावर आडोशी जवळ मुंबईकडे जाणारा ट्रक अचानक उलटल्याने मुंबईकडे जाणारी वाहतूक काही काळ खोळंबली होती. ही घटना आज (सोमवारी) सायंकाळी सहाच्या सुमारास घडली. 

पुण्याहून मुंबईकडे पिओपीचे साहित्य घेऊन जाणारा ट्रक आडोशी गावाजवळ चालकाचे नियंत्रण सुटल्यामुळे उलटला. या अपघातात ट्रकमधील सर्व साहित्य रस्त्यावर पसरल्याने मुंबईकडे जाणारी वाहतूक काहीकाळ खोळंबली होती.यामध्ये चालक जखमी झाला असून त्याला जवळच्या खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

यावेळी आयआरबी  पेट्रोलिंग, देवदूत, बोरघाट पोलीस, सनी डेल्टा फोर्सच्या कर्मचाऱ्यांनी क्रेनच्या साहाय्याने ट्रक व रसत्यावरील साहित्य हटवले असून मुंबईकडे जाणारी वाहतूक पूर्ववत झाली आहे.

acci 2
acci 3
 
21 Aug 2017

पैशाच्या वादातून वेटरनेच केली हॉटेल मालकाची हत्या ; निगडी पोलिसांकडून दोन दिवसात आरोपी अटक 

एमपीसी न्यूज- दोन दिवसांपूर्वी निगडीच्या उड्डाणपुलावर हॉटेल मालक शंकर झेंडे यांचा डोक्याला मार लागलेल्या अवस्थेत मृतदेह आढळला. पोलिसांनी केलेल्या कसून तपासात झेंडे यांचा मृत्यू अपघातामुळे नव्हे, तर त्यांचा खून झाल्याचे निष्पन्न झाले. हा खून त्यांच्याच हॉटेलमधील वेटरने पैशाच्या वादातून केल्याचे तपासात उघडकीस आले.

या प्रकरणी आझाद शेखलाल मुलाणी (वय 26 रा. ताम्हणी वस्ती चिखली), सहदेव मारुती सोळंकी (वय 26 रा.त्रिवेणी नगर )अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.

चिंचवड स्टेशन जवळील एका हॉटेलचे मालक शंकर झेंडे (वय 39) यांचा मृतदेह डोक्याला मार लागलेल्या अवस्थेत शुक्रवारी ( १८ ऑगस्ट) पहाटे दोनच्या सुमारास आढळून आला होता. प्रथमदर्शनी हा अपघात असल्याचे पोलिसांनी सांगितले होते. मात्र त्यानंतरच्या तपासात काही गोष्टी संशयास्पद गोष्टी आढळल्या.  शंकर झेंडे यांच्या आई आणि भावाने हा अपघात नसून खून झाला असल्याची तक्रार दिल्यानंतर तपासाची चक्रे फिरली. निगडी पोलिसांनी दोन दिवसात खुनाचा छडा लावून दोन आरोपीना अटक केली. 

आझाद मुलाणी याच्याशी शंकर याचे पैशावरुन खटके उडत होते. तसेच झेंड याच्याकडे वेटरचे काम  करणारा सोळंकी हा मुलाणीकडे काम करत होता. त्याला झेंडे यांनी पगाराची सुमारे 40 हजार रुपयांची रक्कम थकवून त्याला कामावरुन काढून टाकल्याचे तपासात समोर आले. त्याचा राग मनात धरून  पोलिसांनी केलेल्या चौकशीमध्ये आरोपींची झेंडे यांचा खून केल्याची कबुली दिली.

आरोपी सोळंकी व मुलाणी यांनी 18 ऑगस्ट रोजी पवळे उड्डाणपुलाजवळ स्वीफ्ट गाडीमध्ये बसून झेंडे यांचयवर पाळत ठेवली.  झेंडे दुचाकीवरून जाताना दिसताच त्याचा पाठलाग करुन पाठीमागून त्याच्या दुचाकीला जोरात धडक  दिली. ते  खाली पडताच गाडीतून उतरुन आरोपींनी गाडीतील लोखंडी रॉडने झेंडे याच्या डोक्यावर मारले. यामध्येच झेंडे याचा मृत्यू झाला. 

त्यामुळे सुरुवातीला अपघात वाटणारी घटना नंतर खून असल्याचे पोलिसांच्या तपासात निष्पन्न झाले. याप्रकरणी दोन्ही आरोपींना मोरवाडी न्यायालयाने सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावली  असून या गुन्ह्याचा पुढील तपास निगडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ  पोलीस निरीक्षक विजयकुमार पळसुले करत आहेत.

ही कारवाई निगडी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजयकुमार पळसुले, गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक शंकर आवताडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक खारगे,  देवेंद्र चव्हाण, मच्छिद्र घनवट, मंगेश गायकवाड, बाबा चव्हाण, नितीन बहिरट, जमीर तांबोळी, पोलीस नाईक फारुख मुल्ला यांनी केली.
21 Aug 2017

एमपीसी न्यूज- पुणे शहरात विविध ठिकाणी भरदिवसा घरफोडी करून पोलिसांना गुंगारा देणाऱ्या एका 'बंटी आणि बबली'ला त्यांच्या एका साथीदारांसह गुन्हे शाखा युनिट १ ने केलेल्या कारवाईत पोलिसांच्या जाळ्यात अडकले. त्यांच्या अटकेमुळे पुणे शहरात विविध ठिकाणी केलेल्या घरफोडीचे अनेक गुन्हे उघडकीस आले आहेत.

पुणे शहरात मागील काही दिवसांपासून घरफोडीच्या घटनांमध्ये वाढ झाली होती. पुणे शहर गुन्हे शाखा युनिट १ ने या घटनांचा शोध घेण्यासाठी मोहीम हाती घेतली होती. दरम्यान, घरफोडीच्या गुन्ह्यातील एक सराईत आकाश हेमराज परदेशी (वय २५ रा. येरवडा, पुणे) हा येरवडा येथील साईबाबा मंदिराजवळ उभा असल्याची माहिती पोलीस कर्मचारी गजानन सोनुने आणि अशोक माने याना त्यांच्या खबऱ्यामार्फत मिळाली. त्यानुसार याठिकाणी सापळा रचून आकाश हेमराज परदेशी याच्यासह अनिल काशिनाथ लष्करे (वय २८, रा. वडारवाडी, विश्रांतवाडी) आणि उषा राम कांबळे (वय २५ रा. येरवडा) या 'बंटी बबली' जोडीला अटक केली.

पोलिसांनी केलेल्या चौकशीत या आरोपींनी अलंकार, कोथरूड, वारजे माळवाडी, विश्रामबाग, विश्रांतवाडी, निगडी, विमानतळ पोलीस ठाण्याच्या हद्दीत एकूण १० घरफोडीचे गुन्हे केल्याचे निष्पन्न झाले. त्यांच्याकडून १६० ग्राम सोन्याचे दागिने, ५९० ग्राम चांदीच्या वस्तू, एक एलईडी टीवी, रुपये २१०० रोख आणि गुन्ह्यात वापरलेली मोटारसायकल असा पाच लाख ८३ हजार २० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. 

या आरोपींपैकी आकाश परदेशी याच्या विरोधात विविध पोलीस ठाण्यात २४ गुन्हे दाखल असून अनिल लष्करे आणि उषा कांबळे यांच्यावर अनुक्रमे ८ आणि १६ गुन्हे दाखल आहेत. यांच्याकडून आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे.

सदरची कारवाई गुन्हे शाखेचे अप्पर पोलीस आयुक्त प्रदीप देशपांडे, पोलीस उपयुक्त पंकज डहाणे आणि सहाय्य्क पोलीस आयुक्त सुरेश भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन भोसले पाटील, सहाय्यक पोलीस निरीक्षक धनंजय कापरे, पोलीस उपनिरीक्षक दिनेश पाटील, हर्षल कदम, पोलीस कर्मचारी गजानन सोनुने, अशोक माने, प्रकाश लोखंडे, राजू पवार, राजाराम सुर्वे, कैलास गिरी, विजयसिंह वसावे, प्रशांत गायकवाड, मोहन येलपले, मेहबूब मोकाशी, रिजवान जिनेडी, उमेश काटे, सुभाष पिंगळे, सुरेंद्र आढाव, सुधाकर माने, तुषार खडके, श्रीकांत वाघवाले, इरफान मोमीन आणि इम्रान शेख यांनी केली.   
21 Aug 2017

एमआयडीसी भोसरी पोलिसांकडून दरोडयातील फरार आरोपी अटक

आरोपींकडून चार गुन्ह्यांची उकल 

एमपीसी न्यूज - एमआयडीसी भोसरी पोलिसांनी कारवाई करत 2016 मध्ये  टेल्को कंपनीच्या कर्मचाऱ्यांच्या बसवर दरोडा टाकणा-या टोळीतील फरार आरोपीसह आणखी एका सराईत गुन्हेगारास पोलिसांनी अटक केली आहे.

दरोड्यातील फरारी आरोपी पवन बंडू शिरसाठ (वय.20 रा बालाजीनगर झोपडपट्टी, एमआयडीसी भोसरी),  व आमीर हुसेन  शेख (वय.22 रा. पत्राशेड,पिंपरी) असे अटक आरोपींची नाव नावे आहेत.

शिरसाठ व त्याच्या पाच सहका-यानी 2016 मध्ये टेल्को कंपनीच्या बसवर दरोडा टाकला होता. यातील इतर पाच आरोपीना यापूर्वीच अटक केली असून शिरसाठ हा फरार झाला होता. आमिर शेख हा देखील सराईत आरोपी आहे.

संबंधित आरोपी बालाजीनगर येथील संत निरंकारी बाबा मठाजवळ बसले असल्याची खबर पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचत दोघांना अटक केली. यावेळी त्यांच्याकडून  एसएस व एमएस स्टीलच्या  पट्ट्या, 25 वॉल तसेच एक अॅक्टीवा गाडी असा दोन लाख 18 हजार 863 रुपयांचा माल जप्त करण्यात आला. पोलिसांनी केलेल्या तपासात एमआयडीसी भोसरी येथील तीन तर निगडी पोलीस ठाण्यातील एक गुन्हा असल्याचे उघड झाले आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक रावसाहेब बांबळे करत आहेत.

ही कारवाई वरिष्ठ पोलीस निरीक्षक भीमराव शिंगाडे, पोलीस निरीक्षक (गुन्हे) राजेंद्र विभांडीक, तपास पथकातील पोलीस उपनिरीक्षक रावसाहेब बांबळे, पोलीस हवालदार रवींद्र तिटकारे, पोलीस  नाईक किरण काटकर, पोलीस शिपाई विजय दौंडकर, नवनाथ पोटे, करण विश्वासे, विशाल काळे, यांनी केली. 
21 Aug 2017

एमपीसी न्यूज - गणेशोत्सव अवघ्या चार दिवसांवर येऊन ठेपला असून गणेश मंडळाचे कार्यकर्ते उत्सवाच्या तयारीला लागले आहेत. आगामी गणेशोत्सवात  कायदा आणि सुव्यवस्था राखली जावी या दृष्टीने पोलीस यंत्रणा देखील कामाला लागली आहे. पिंपरीतील नेहरुनगर येथे आज (सोमवारी) दुपारी दोनच्या सुमारास पोलिसांनी मॉकड्रील करून गणेशोत्सवासाठी सज्ज असल्याचे दाखवून दिले.

यामध्ये पोलीस नियंत्रण कक्षातून कॉल आल्यानंतर घटनास्थळी जाऊन दंगलीवर नियंत्रण मिळवणे, जखमींना तातडीने रुग्णालयात पोहचवणे, आग लागली असता अग्निशामक दलाला वेळेते पाचारण करणे, बाँम्ब सदृश्य वस्तू आढळल्यास बाँम्ब निकामी करणारी यंत्रणा पाचारण करुन तेथील परिस्थितीवर नियंत्रण मिळवणे अशा प्रकारचे सराव यावेळी करण्यात आले.

यामध्ये परिमंडळ तीनचे  पोलीस उपायुक्त गणेश शिंदे, सहायक आयुक्त राम मांडुरके तसेच पिंपरी पोलीस ठाण्याचे सात अधिकारी 120 पोलीस कर्मचारी सहभागी झाले होते. यामध्ये गणेश उत्सवात कंट्रोल रुमवरुन दंगलीचा कॉल आल्यानंतरच्या कारवाईचा पोलीसांनी यावेळी सराव केला. या मॉकड्रिलमुळे नागरिकांमध्ये काही काळ अफवा पसरल्या. मात्र पोलिसांनी नागरिकांना विश्वासात घेऊन हा सराव असल्याचे सांगितले. 
Page 1 of 65
Open Chat
1
Close chat
Hello! Thanks for visiting us. Please press Start button to chat with our support :)

Start