• 123.jpg
  • IMG-20170812-WA0103.jpg
  • mpc.jpg
  • mpc1.jpg
  • MPC_news.JPG
22 Aug 2017

कायदा करण्याचे केंद्र सरकारला आदेश

एमपीसी न्यूज- तिहेरी तलाक हा असंवैधानिक असून ही प्रथा त्वरित बंद करण्याचा निर्णय आज सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. या संदर्भात सहा महिन्यात कायदा करण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने  केंद्र सरकारला दिले आहेत. या निर्णयामुळे मुस्लिम महिलांची तिहेरी तलाकच्या जोखडातून मुक्तता झाली असून या महिलांनी या निर्णयाचे स्वागत केले आहे.

अनेक महिन्यांपासून तिहेरी तलाकचा मुद्दा चर्चेत होता. या प्रकरणावर आज सर्वोच्च न्यायालयाच्या पाच न्यायाधीशांच्या खंडपीठाने ऐतिहासिक निर्णय दिला. केंद्र सरकारने तिहेरी तलाकसंबंधी संसदेत कायदा करावा, असे आदेश देतानाच यात थेट हस्तक्षेप करण्यास नकार दिला. तोंडी तलाक हा घटनाबाह्य असल्याचा आरोप करत शायरा बानो या मुस्लिम महिलेने याबाबत सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. मुस्लिमांमधील या प्रथेचा दुरुपयोग केला जातो याकडे शायर बानोने लक्ष वेधले होते.

या सुनावणीत मुस्लिम पर्सनल लॉ बोर्ड, मुस्लिम पर्सनल वीमेन लॉ बोर्ड, केंद्र सरकार आदींना पक्षकार करण्यात आले होते. सरन्यायाधीश जे. एस. केहर यांच्या नेतृत्वाखालील घटनापीठामध्ये न्यायमूर्ती कुरियन जोसेफ, आर. एफ. नरिमन, यू. यू. ललित आणि एस. अब्दुल नझीर हे सदस्य होते. निकाल देताना खंडपीठातील न्यायाधीशांमध्येच एकमत होऊ शकले नाही. तिहेरी तलाक प्रथा घटनाबाह्य असल्याचे मत न्यायाधीश ललित, नरिमन आणि कुरियन यांनी मांडले. तर या प्रथेमुळे घटनेतील कलम 14, 15, 21 आणि 25 चे उल्लंघन होत नसल्याचे मत सरन्यायाधीश खेहर आणि नाझीर यांनी मांडले. त्यामुळे बहुमतानुसार तिहेरी तलाकवर बंदी घालण्याचा निर्णय देण्यात आला

22 Aug 2017

एमपीसी न्यूज -लोणावळ्याजवळील कुलस्वामीनी एकविरा देवीच्या कार्ला गडावर सोमवारी सायंकाळी चार ते साडेचार वाजण्याच्या दरम्यान मोठ्या प्रमाणात दरड कोसळली. सुदैवाने ज्या ठिकाणी हे दगड व माती पडली त्याठिकाणी कोणीही भाविक वा पुजारी नसल्याने मोठी दुर्घटना ठळली. लोणावळा परिसरात दोन दिवस पावसाची संततधार सुरु होती. पावसामुळे ही दरड पडली आहे.

एकविरा देवीच्या मंदिराशेजारी ट्रस्टच्या खोलीला लागूनच ही दरड पडली. डोंगर कपारीमधील एक मोठा दगड डोंगराच्या पायर्‍यांवर व समोर आछांदन केलेल्या जाळीवर पडले. यामध्ये पायर्‍या तुटल्या असून आछांदन केलेली जाळीचा काही भाग देखिल तुटली आहे. सुदैवाने दरड पडली तेथे कोणीही नव्हते अन्यथा मोठी दुर्घटना घडली असती. मागील काही दिवसांपासून पावसामुळे या भागात दगड व माती ठिसूळ झाल्याने मंदिरा‍च्या वरील भागातील डोंगरातून दरड पडण्याच्या घटना वारंवार घडत आहेत.

दोन वर्षापासून गडावर दरड तसेच लहान मोठे दगड पडणे, भराव व संरक्षण भिंतीचे दगड कोसळण्याचे प्रकार वारंवार घडत असताना ते रोखण्यासाठी भारतीय पुरातत्व विभाग व वन विभाग यांच्याकडून कोणतेही प्रयत्न होताना दिसत नाही.

22 Aug 2017

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड शहरात पालिकेच्या वतीने करण्यात आलेल्या सर्वेक्षणात एकूण 105 बेघर आढळून आलेले आहेत. त्यांची पिंपरी भाजी मंडई येथील रात्रनिवारा केंद्रात राहण्याची सोय केली जाणार आहे. त्यांना दिवसाचाही निवारा दिला जाणार आहे. शहरात बेघरांना येण्यापासून रोखता येत नसल्याचा दावा महापालिकेचे आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी महासभेत केला.

राज्य सरकारच्या 28 ऑगस्ट 2014 च्या आदेशानुसार राज्यातील पिंपरी-चिंचवडसह 53 शहरामध्ये राष्ट्रीय नागरी उपजिविका अभियानाची अंमलबजावणी करण्यात येत आहे. या अभियान अंतर्गत शहरी बेघरांना निवार्‍याची सोय करण्याची तरतूद आहे. राज्य शासनाच्या नगरविकास विभागाच्या 14 जुलै 2011 च्या निर्णयानुसार रात्रनिवारा कार्यान्वित करून त्यांचे संचलन आणि देखभाल करण्याचे निर्देश शासनाने दिले आहेत.

पिंपरी-चिंचवड महापालिने शहरात 10 मार्च 2017 ला प्रभागनिहाय शहरी बेघरांचे सर्वेक्षण केले. त्यात केवळ 105 बेघर आढळून आलेले आहेत. त्यासाठी पिंपरी भाजी मंडई येथील महापालिकेमार्फत चालविण्यात येत असलेला रात्रनिवार्‍याचे नूतनीकरण केले जाणार आहे. तेथे या 105 बेघरांना निवार्‍याची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. रात्रनिवारा केंद्रात नव्याने स्थापत्य व विद्युतविषयक कामे केली जाणार आहेत. सुरक्षेसाठी 'सीसीटीव्ही' कॅमेरे बसविण्यात येणार आहेत. या करीता एकूण 50 लाख 27 हजार 975 रूपये खर्च अपेक्षित आहे. सदर खर्च केंद्र शासन पुरस्कृत राष्ट्रीय नागरी उपजिविका अभियान अंतर्गत शहरी बेघरांना निवारा योजनेतून करण्यात येणार आहे. तसा प्रस्ताव वरील मुंबई येथील प्रशासन संचालनालयास पाठविला जाणार आहे. या प्रस्तावाला शनिवारी (दि.19) झालेल्यास सर्वधारण सभेत मान्यता देण्यात आली.

या संदर्भात नगरसेवकांनी विचारलेल्या प्रश्‍नांवर आयुक्त हर्डीकर यांनी सभागृहात खुलासा केला. ते म्हणाले की, ही योजना केंद्राच्या आदेशानुसार त्यांच्या निधीतून चालविली जाते. मार्च महिन्यात केलेल्या सर्वेक्षणात 105 बेघरांचा आकडा निश्‍चित झाला आहे. त्या दृष्टिने सध्या नियोजन केले जात आहे. शहरात येणार्‍यांची संख्या निरंतर सुरू राहते. त्याला बंधन घालता येत नाही. ही संख्या कमी जास्त होऊ शकते.

शहरात 105 बेघर आहेत. ही संख्या मर्यादीत ठेवली जाणार का. प्रत्येक माणसी 50 हजार खर्च आहे. त्यामुळे ही संख्या भविष्यात वाढण्याची शक्यता आहे. सुविधा मिळतात म्हणून शहरात संख्या वाढण्याची भिती माजी महापौर व नगरसेविका वैशाली घोडेकर यांनी व्यक्त केली. माजी महापौर व नगरसेविका मंगला कदम म्हणाल्या की, 105 बेघरांची संख्या कोठून आणली. निगडी पुलाखाली असंख्य बेघर राहतात. त्यांचे रात्रनिवारा केंद्रात स्थंलातर करा. नगरसेवक पंकज भालेराव म्हणाले की, शहरात येणार्‍या बेघरांसाठी असलेल्या रात्रनिवारा केंद्रात चांगल्या सुविधा मिळत नाहीत. त्यात सुधारणा केली गेली पाहिजे.

22 Aug 2017

एमपीसी न्यूज- सार्वजनिक गणेशोत्सवाचे जनक भाऊ रंगारी की लोकमान्य टिळक हा वाद सध्या पुण्यामध्ये रंगत आहे. हा वाद आता उच्च न्यायालयात पोचला असून या संदर्भात भाऊ रंगारी मंडळाकडून सोमवारी उशिरा याचिका दाखल करण्यात ली आहे. या वादावर समिती नेमण्याची मागणी करण्यात ली असून या याचिकेवर बुधवारी सुनावणी होणार आहे.

22 Aug 2017

खासदार वंदना चव्हाण यांच्या खासदार निधीतून सुविधा उपलब्ध
एमपीसी न्यूज- रुग्णाला तातडीने एका ठिकाणाहून दुसरीकडे हलविण्यासाठी ससून रुग्णालयात बॅटरीवर चालणार्‍या दोन गाड्या उपलब्ध करण्यात आल्या आहेत. ही सुविधा खासदार वंदना चव्हाण यांच्या खासदार निधीतून उपलब्ध करून देण्यात आली आहे.

या गाड्यांचे उदघाटन वंदना चव्हाण यांच्या हस्ते स्वातंत्र्यदिनानिमित्त (15 ऑगस्ट) रोजी करण्यात आले. यावेळी इक्बाल शेख, राकेश कामठे, भोलासिंग अरोरा, ऋषी परदेशी, रुपाली चाकणकर, मनाली भिलारे, बी. जे. वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. अजय चंदनवाले, वैद्यकीय अधीक्षक डॉ.अजय तावरे, ससून रुग्णालयातील अधिकारी, डॉक्टर, परिचारिका, कर्मचारी, रुग्णांचे नातेवाईक उपस्थित होते.

या गाड्यांविषयी माहिती देताना वंदना चव्हाण म्हणाल्या, ‘रुग्णाला तातडीने एका ठिकाणाहून दुसरीकडे हलविण्यासाठी ससून रुग्णालयात ही बॅटरीवर चालणारी गाडी सुरु करण्यात आली आहे. त्यामुळे सिटी स्कॅन, एक्स रे काढण्यासाठी रुग्णांची होणारी गैरसोय कमी होणार आहे. तसेच गर्भवतींनाही त्रास न होता प्रसूती कक्षापर्यंत घेऊन जाता येणार आहे.’

ससून रुग्णालयात दररोज 1200 ते 1300 रुग्ण दाखल होत असतात. रुग्णालयातील काही वॉर्ड लांब आहेत. रुग्णांना तपासण्या करण्यासाठी वॉर्डमधून तपासणी केंद्रावर घेऊन जावे लागते. त्यासाठी व्हिलचेअर, स्टेचरचा वापर केला जातो. परंतु ज्या रुग्णांना तपासण्यासाठी चालत किंवा स्ट्रेचरवरून घेऊन जाणे शक्य नाही. अशा वेळी बॅटरीवरील गाडी निश्‍चित उपयुक्त ठरेल. तसेच रुग्णांच्या नातेवाईकांचा हा त्रास कमी करून रुग्णसेवेचा दर्जा उंचाविण्यासाठी बॅटरीवर चालणारी गाडी विकसित करण्यात आली आहे. अजून अशा दोन गाड्या देण्याचा मानस आहे असे चव्हाण म्हणाल्या.

22 Aug 2017

एमपीसी न्यूज - बीआरटी विषयक अधिक माहिती जाणून घेण्यासाठी पिंपरी-चिंचवड महापालिकेतील पदाधिकारी, सर्व नगरसेवक आणि अधिकारी तीन टप्प्यांमध्ये अहमदाबादमध्ये अभ्यास दौरा करणार आहेत. अहमदाबादमध्ये होणा-या अडीच दिवसाच्या कार्यशाळेसाठी पदाधिका-यांची शाही बडदास्त ठेवली जाणार आहे. तारांकित हॉटेलमध्ये निवास व भोजनाची सोय आणि विमान प्रवास राहणार आहे. या दौ-याच्या खर्च 'जीईफ' फंडातून केला जाणार आहे. त्याला मंजुरी देण्यासाठीचा विषय आगामी स्थायी समितीच्या सभेसमोर ठेवला आहे. दरम्यान, या अभ्यास दौ-यासाठी किती खर्च येणार ? याची आकडेवारी बीआरटीएस विभागाने गुलदस्त्यात ठेवली आहे.

वाढती लोकसंख्या आणि वाहनांची वाढती संख्या विचारात घेता पिंपरी-चिंचवड महापालिकेने 10 रस्त्यांवर बीआरटीएस वाहतूक सेवा सुरु करण्याचे नियोजन केले आहे. तथापी, हे नियोजन कागदोपत्री राहत असून केवळ दोन रस्त्यांवर बीआरटीएस सेवा सुरु आहे. रेंगाळलेले बीआरटीचे मार्ग सुरु करण्यासाठी प्रशासनाच्या अद्याप कोणत्याच हालचाली सुरु नसल्याचे दिसून येते.

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या बीआटीएस विभागातर्फे केंद्राच्या शहरी विकास विभागाच्या सूचनेवरून जागतिक बँक व एसयुटीपी यांच्या संयुक्‍त विद्यमानाने राष्ट्रीय बीआरटीएस गोलमेज परिषद घेण्यात आली होती. या परिषदेला महापौर, उपमहापौर, स्थायी समिती अध्यक्षांसह पदाधिकारी उपस्थित होते. महापालिका पदाधिका-यांना बीआरटीची अधिक माहिती मिळावी, म्हणून पालिका पदाधिका-यांचा अहमदाबाद अभ्यास दौ-यांचे आयोजन केले आहे. त्यानूसार सार्वजनिक वाहतूक यावर अहमदाबादचे शिवानंद स्वामी यांनी अडीच दिवसाची कार्यशाळेचे नियोजन केले आहे. या अभ्यास दौ-यांसाठी महापालिका महापौर, उपमहापौर, स्थायी समिती सभापती, सर्व नगरसेवक, नगरसेविका व पालिका अधिका-यांचा समावेश राहणार आहे.

या कार्यशाळेत विकास योजना, गमनशीलता योजना, नगर नियोजन योजना, स्थानिक पुनर्विकास योजना, नदी विकास योजना, वर्तुळाकर रस्ते, मेट्रो वाहतूक प्रणाली, बीआरटीएस वाहतूक प्रणालीचे सादरीकरण केले जाणार आहे. तसेच अहमदाबाद शहरातील सांस्कृतिक स्थळांना भेटी, सांस्कृतिक, ऐतिहासिक स्थळांना भेटी देण्यात येणार आहेत.

या कार्यशाळेस तीन टप्प्यात पाठविण्यात येणार असून, पदाधिका-यांची निवास व भोजनाची सोय थ्री, फोर स्टार तारांकित हॉटेलमध्ये करण्यात येणार आहे. तर सर्वांना पुणे-अहमदाबाद-पुणे असा विमान प्रवासाने येण्या-जाण्याची सोय करण्यात आली आहे. या अभ्यास दौ-यांच्या प्रत्यक्ष येणा-यां खर्चास मान्यतेसाठी स्थायी समितीसमोर प्रस्ताव सादर केला असून, या दौ-यांचा खर्च 'जीईएफ' फंडातून केला जाणार आहे. मात्र, या अभ्यास दौ-यासाठी किती खर्च येणार ? याची आकडेवारी बीआरटीएस विभागाने गुलदस्त्यात ठेवली आहे.

21 Aug 2017

अनधिकृत बांधकाम केल्याचा त्यांच्यावर आरोप

एमपीसी न्यूज- पुणे महापालिकेचे नगरसेवक विजय शेवाळे यांनी गांजवे चौकात अनधिकृत बांधकाम केल्याचा आरोप करीत शेवाळे यांचे नगरसेवकपद रदद करावे अशी मागणी पीएमटीचे माजी अध्यक्ष सुधीर काळे यांनी पालिका आयुक्त कुणाल कुमार यांच्याकडे केली आहे.

याबाबत दिलेल्या निवेदनात त्यांनी म्हटले आहे की, अलीकडेच झालेल्या पुणे महापालिकेच्या निवडणुकीत विजय शेवाळे हे औंध -बोपोडी या प्रभागातुन निवडून आलेले आहेत. त्यांनी नवीपेठेतील गांजवे चौकात घरांक ३४३/ ३४४ येथे अनधिकृत बांधकाम केले आहे. त्या ठिकाणी हॉटेल पुष्पविजय आणि शेवाळे मुलीचे होस्टेल सुरु करण्यात आले आहे. हे बांधकाम पूर्णतः अनधिकृत असून  त्यासंदर्भात पालिकेच्या बांधकाम विभागाकडे वेळोवेळी तक्रार करण्यात आली आहे. त्यावर बांधकाम विभागानेही त्यांना याबाबत वारंवार नोटीस बजावली आहे.

याठिकाणी विनापरवाना मुलीचे होस्टेल सुरु करण्यात आले असून त्याबाबतचा अहवाल तत्कालीन अतिरिक्त आयुक्त राजेंद्र जगताप यांना दिला आहे. पण अदयाप या बाधकांमावर कारवाई करण्यात आलेली नाही. त्यामुळे या अनधिकृत बांधकामावर कारवाई न करणाऱ्या  अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची तसेच अनधिकृत बांधकाम करुन पालिकेची फसवणूक करणाऱ्या विजय शेवाळे यांचे नगरसेवकपद दि महाराष्ट्र म्युनिसिपल कॉर्पारेशन अ‍ॅक्ट सेक्शन १० या कलमानुसार रदद करावे अशी मागणी सुधीर काळे यांनी केली आहे.

दरम्यान, गांजवे चौकातील संबंधित मिळकत भाड्याने दिली असून भाडेकरूने परस्पर ती मुलींना राहण्यासाठी आणि खानावळीसाठी दिली आहे. यासंदर्भात तक्रार झाल्याचे निदर्शनास आल्यानंतर महापालिकेने मिळकतीला लावलेला व्यावसायिक करही भरला आहे. तसेच महापालिकेने मिळकतीला बजावलेल्या नोटीसेला पालिकेच्या दिवाणी न्यायालयात स्थगिती मिळाली आहे, असे स्पष्टीकरण विजय शेवाळे यांनी दिले आहे.   
21 Aug 2017

एमपीसी न्यूज - गणेशोत्सवाच्या निमित्ताने स्वच्छ भारत अभियाना अंतर्गत पिंपरी-चिंचवड महापालिका विशेष स्वच्छता मोहीम अभियान राबवित आहे. या अभियानात शहरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन, महापौर नितीन काळजे व आयुक्त श्रावण हार्डीकर यांनी केले आहे.

शहराच्या विविध भागात पालिकेच्या वतीने स्वच्छता अभियान राबविण्यात आले. यामध्ये एकूण 153 कर्मचारी सहभागी झाले होते. परिसरात राबविण्यात आलेल्या या मोहिमे अंतर्गत सुमारे 1930 किलो कचरा उचलण्यात आला.

'अ' क्षेत्रीय कार्यालय परिसरातील प्र. क्र. 15 मधील विनरवील चौक, प्राधिकरण येथे स्वच्छता अभियान राबविण्यात आले. यावेळी उपमहापौर शैलजा मोरे, नगरसदस्या शर्मिला बाबर, सह आयुक्त दिलीप गावडे, मुख्य आरोग्य निरीक्षक  बापुसाहेब गायकवाड आरोग्य कर्मचा-यांसह सहभागी झाले होते. राबविण्यात आलेल्या या मोहिमे अंतर्गत सुमारे दोन टन कचरा उचलण्यात आला.

'ब' क्षेत्रीय कार्यालय परिसरात प्रभाग क्र. 16 मधील आकुर्डी येथील डॉ. डी. पाटील कॉलेज मागील मोकळे मैदान, कासनगर, एम. बी कॅम्प मुख्य रस्ता येथे झालेल्या या अभियानामध्ये नगरसदस्य मोरेश्वर भोंडवे, बाळासाहेब ओव्हाळ, प्रज्ञा खानोलकर, संगिता भोंडवे, क्षेत्रीय अधिकारी. एस. डी. खोत, सहा. आरोग्याधिकारी के. डी. दरवडे, मुख्य आरोग्य निरीक्षक  के. बी. पारोल, आरोग्य निरीक्षक  उमेश कांबळे उपस्थित होते.

प्रभाग क्र. 17 मधील बिजलीनगर येथील संपूर्ण गिरीराज हौसिंग सोसायटी व भोवताल परिसरात झालेल्या स्वच्छ अभियानामध्ये नगरसदस्य नामदेव ढाके, क्षेत्रीय अधिकारी एस. डी. खोत,सहा. आरोग्याधिकारी  के. डी. दरवडे, मुख्य आरोग्य निरीक्षक के. बी. पारोल, आरोग्य निरिक्षक राजेंद्र उजिनवाल, प्रभाग क्र. 18 चिंचवड येथील संपूर्ण माणिक कॉलनी व भोवताल परिसरात नगरसदस्य राजेंद्र गावडे, सुरेश भोईर, क्षेत्रीय अधिकारी एस. डी. खोत, सहाय्यक  आरोग्याधिकारी  के. डी. दरवडे, मुख्य आरोग्य निरीक्षक के. बी. पारोल आदी उपस्थित होते.

प्रभाग क्र. 22 मधील आदर्शनगरमधील स्मशान भूमी काळेवाडी परिसरात झालेल्या स्वच्छ भारत अभियामामध्ये नगरसदस्या उषा काळे, नगरसदस्य विनोद नढे, क्षेत्रीय अधिकारी एस. डी. खोत, सहाय्यक आरोग्याधिकारी के. डी. दरवडे, मुख्य आरोग्य निरीक्षक के. बी. पारोल, आरोग्य निरीक्षक  वसंत सरवदे, आरोग्य निरीक्षक  कांचन इंदलकर आदी उपस्थित होते.

'क' क्षेत्रीय कार्यालयांतर्गत प्रभाग क्र. दोन जाधववाडी, चिखली येथे झालेल्या स्वच्छता मोहिमेत प्रभाग अध्यक्ष अश्विनी जाधव, नगरसदस्य राहुल  जाधव, क्षेत्रीय अधिकारी अण्णा बोदडे, सहाय्यक आरोग्याधिकारी बी. बी. कांबळे, मुख्य आरोग्य निरीक्षक  आर. एम. भोसले, आर. एम. बेद, बी. आर. कांबळे, विजय दवाळे, अंकुश झिटे, डी. एन. वाधवानी, एस. डी. जाधव सहभागी झाले होते. यामध्ये एकूण 153 कर्मचारी सहभागी झाले होते.

प्रभाग क्र. 9 खराळवाडी, मासुळकर कॉलनी व नेहरूनगर परिसरासह राबविण्यात आलेल्या या मोहिमे अंतर्गत सुमारे 7.7 टन कचरा उचलण्यात आला. 'ड' क्षेत्रीय कार्यालयांतर्गत प्रभाग क्र. 25 ताथवडे विसर्जन घाट, वाकड विसर्जन घाट, प्रभाग क्र. 26  चोंधे लॉन विसर्जन घाट, प्रभाग क्र. 28 दत्त मंदिर विसर्जन घाट पिंपळे सौदागर, प्रभाग क्र. 29  तुळजा भवानी माता विसर्जन घाट पिंपळे गुरव येथे झालेल्या स्वच्छता मोहिमेत नगरसदस्या आरती चोंधे, शीतल काटे, चंदा लोखंडे, नगरसदस्य सागर आंघोळकर सहभागी झाले होते. यामध्ये एकूण 78 कर्मचारी सहभागी झाले होते. परिसरात राबविण्यात आलेल्या या मोहिमे अंतर्गत सुमारे 3250 किलो कचरा उचलण्यात आला.

'इ' क्षेत्रीय कार्यालयांतर्गत प्रभाग क्र. पाच, प्रभाग क्र. सात गवळीनगर, गव्हाणेवस्ती, च-होली भाजी मंडई येथे झालेल्या स्वच्छता मोहिमेत सहाय्यक आरोग्याधिकारी पी. आर. तावरे, आरोग्य निरीक्षक आर. आर. साबळे, सी. आर. रोकडे, एस. पी. घाटे, आरोग्य कर्मचा-यांसह सहभागी झाले होते. परिसरात राबविण्यात आलेल्या या मोहिमे अंतर्गत सुमारे 300 किलो कचरा उचलण्यात आला. 'ग' क्षेत्रीय कार्यालयांतर्गत प्रभाग क्र. 21 डेअरी फार्म रोड, प्रभाग क्र. 23 जगतापनगर, प्रभाग क्र. 24  भगवती रॉयल मैदान खिंवसरा पाटील, प्रभाग क्र. 27  तापकीरनगर येथे झालेल्या स्वच्छता मोहिमेत अपक्ष आघाडी गटनेते कैलास बारणे, नगरसदस्या झामाबाई बारणे, आरोग्य निरीक्षक सतीश पाटील, सदाशित पुजारी, सुरेश चन्नाल, धनश्री भत्ते सहभागी झाले होते.
21 Aug 2017
 
एमपीसी न्यूज  - पिंपरी-चिंचवड शहरातील रहिवाशी अजित गुप्ते यांची डेन्मार्क देशाचे भारताचे राजदूत (Ambasassador) म्हणून नुकतीच नेमणुक झाली आहे. त्यानिमित्त पिंपरी-चिंचवड पालिकेतर्फे त्यांचा आज (सोमवारी) सत्कार करण्यात आला.

पिंपरी पालिकेच्या स्थायी समितीच्या कार्यालयात झालेल्या या कार्यक्रमाला स्थायी समितीच्या अध्यक्षा सीमा सावळे,  महिला व बालकल्याण समिती सभापती सुनीता  तापकीर, जैवविविधता व्यवस्थापन समिती सभापती उषा मुंढे, नगरसेविका आरती चोंधे, माई ढोरे, सारंग कामतेकर आदी उपस्थित होते.

अजित गुप्ते हे पिंपरी-चिंचवड शहरातील रहिवाशी आहेत. त्यांची नुकतीच डेन्मार्क देशाचे भारताचे राजदूत म्हणून नेमणुक झाली. शहरासाठी ही अभिमानाची बाब आहे.
21 Aug 2017

एमपीसी न्यूज- यंदाचा गणेशोत्सव निर्विघ्नपणे पार पडावा या उद्देशाने पुणे महापालिकेतर्फे  गणेश मंडळांना काही खबरदारीच्या सूचना केल्या आहेत. या सूचनांचे काटेकोरपणे पालन करून गणेशोत्सव आनंदात साजरा करावा असे आवाहन करण्यात आले आहे. 


मांडव उभारताना रस्त्यावरील विजेच्या खांबांचा आधार घेऊ नये, मांडव उभारताना विजेचे खांब मांडवामध्ये येणार नाहीत याची खबरदारी घ्यावी. रस्त्यांवरील दिव्यांचा खांब आणि मांडव यामध्ये सुरक्षित अंतर ठेवावे.

मांडव उभारताना रस्त्यावरील विजेच्या तारांना अडथळा येणार नाही किंवा या तारा मांडवात येणार नाहीत याची दक्षता घ्यावी. रस्त्यावरील दिव्यांच्या खांबावरील जंक्‍शन बॉक्‍समधून विद्युत पुरवठा घेण्यात येऊ नये. विद्युत रोषणाईसाठी स्वतंत्र वीज मीटर घेण्यात यावा, महापालिकेच्या वीजमीटरमधून अनधिकृतपणे वीजपुरवठा घेऊ नये. 

मोठ्या प्रमाणात विद्युत रोषणाई करावयाची असल्यास राज्याच्या सार्वजनिक बांधकाम विभागातील विद्युत निरीक्षक यांच्याकडून ते काम करून घ्यावे. मांडवांमध्ये करण्याच्या विद्युत विषयक कामासाठी परवानाधारक वायरमनची नेमणूक करावी. मांडवांमध्ये विद्युत विषयक कामे करताना कोणत्याही परिस्थितीत लाइव्ह विद्युत वायर्स मांडवाच्या आसपास असणार नाहीत याची दक्षता घ्यावी. मांडवामध्ये केलेल्या विद्युत रोषणाईसाठी महापालिकेचे रस्त्यावरील दिवे बंद करण्याची गरज भासल्यास परस्पर ते दिवे बंद न करता, संबंधित महापालिका सहाय्यक आयुक्त कार्यालयाकडे संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे. 
Page 4 of 296
Open Chat
1
Close chat
Hello! Thanks for visiting us. Please press Start button to chat with our support :)

Start