• 123.jpg
  • IMG-20170812-WA0103.jpg
  • mpc.jpg
  • mpc1.jpg
  • MPC_news.JPG
22 Aug 2017


एमपीसी न्यूज - पुणे शहरातील बहुचर्चित 24 तास पाणीपुरवठा योजनेसाठी घेतलेले 200 कोटींचे कर्जरोखे फरतफेड करणे आणि त्यांचे व्याज भरणे यासाठी दरमहा 3 कोटी 19 लाख रुपयांची बॅक किंवा सार्वजनिक क्षेत्रातील वित्तीय संस्थेत गुंतवणुक करण्याच्या प्रस्तावाला आज स्थायी समितीने मंजुरी दिली आहे.

शहरात तब्बल तीन हजार कोटी रुपये खर्चून 24 तास पाणीपुरवठा योजना राबविण्यात येणार आहे. या योजनेच्या अंमलबजावणीसाठी कर्जरोखे घेण्याचा निर्णय सत्ताधारी भाजपने घेतला. मात्र या योजनेअंतर्गत जलवाहिन्या आणि पाणी मीटर बसविण्याची वादग्रस्त वाढीव दराची निविदा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे या योजनेसाठी कर्जरोख्यांच्या माध्यमातून उभारलेले 200 कोटी रुपये बँकेत एफडी करून गुंतविण्याचा निर्णय स्थायी समितीने घेतला. त्यामुळे सत्ताधारी आणि पालिका प्रशासनावर नामुष्की आली आहेत. आधी कर्जरोखे नंतर एफडी असा पालिकेचा उल्टा कारभार सुरू आहे. या सर्व पाश्र्वभुमीवर आयुक्त कुणाल कुमार यांनी स्थायी समिती समोर हा प्रस्ताव ठेवला होता.

या योजनेसाठी घेतलेले 200 कोटीचे कर्जरोखे फरतफेड करण्याची मुदत 10 वर्ष आहे. त्यामुळे दहा वर्षानंतर ही रक्कम एकदम भरण्यासाठी पालिकेवर आर्थिक ताण पडणार आहे. त्यामुळे 200 कोटीच्या मुददल रक्कमेची परतफेड करण्यासाठी दरमहा 1 कोटी 67 लाख रुपयांची गुंतवणुक करणे आवश्यक आहे. 200 कोटीच्या कर्जरोख्याच्या व्याजाची रक्कम पालिकेला सहा महिन्याला दयावी लागणार आहे. त्यासाठी व्याजाच्या रक्कमेपोटी दरमहा 1 कोटी 52 लाख रुपयांची गुंतवणुक करणे आवश्यक आहे. त्यामुळे 200 कोटीचे कर्जरोखे फरतफेड करणे आणि त्यांचे व्याज भरणे यासाठी दरमहा 3 कोटी 19 लाख रुपयांची बॅक किंवा सार्वजनिक क्षेत्रातील वित्तीय संस्थेत गुंतवणुक करण्याच्या प्रस्तावाला स्थायीने मान्यता दिली आहे.

22 Aug 2017


एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड महापालिकेची सारथी हेल्पलाईन सोपी व सुलभ असल्याने ही प्रणाली यशस्वी झाली. सारथी प्रणाली हि लोकोपयोगी असून इतरांनीही उपयुक्त ठरेल असे मत, महापौर नितीन काळजे यांनी व्यक्त केले. तसेच इतर शहरांनीदेखील सारथी हेल्पलाईन प्रणाली उपयोगात आणावी व त्याकरिता पालिकेकडून सर्व मदत करण्यात येईल असेही, ते म्हणाले.

पिंपरी-चिंचवड पालिकेच्या माहिती व तंत्रज्ञान विभागाच्या वतीने माहित व तंत्रज्ञान विषयक राज्यस्तरीय कार्यशाळेचे उद्घघाटन आज (मंगळवारी) चिंचवड येथील ऑटोक्लस्टर सभागृहात महापौरांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी उपमहापौर शैलजा मोरे, पक्षनेते एकनाथ पवार, आयुक्त श्रावण हर्डीकर, नगरसद्स्या अनुराधा गोरखे, अतिरिक्त आयुक्त अच्युत हांगे, सह आयुक्त दिलीप गावडे, उपसंचालक नगररचना विभाग प्रशांत ठाकूर, सह शहर अभियंता आयुब पठाण, रविंद्र दुधेकर, सहाय्यक आयुक्त अण्णा बोदडे, कार्यकरी अभियंता संजय कांबळे, जयंत बरशेट्टी यांच्यासह जळगाव, सांगली, धुळे, लातूर, गोंदिया, सांगली-मिरज,कल्याण- डोंबिवली, उल्हासनगर, बार्शी, सातारा, उदगीर, चंद्रपूर, यवतमाळ, नवी मुंबई, पुणे इ. महानगरपालिका व नगरपालिकांचे 44 अधिकारी उपस्थित होते.

पक्षनेते एकनाथ पवार म्हणाले, सारथी हेल्पलाईन प्रणाली हि सर्वसामान्य नागरीकांपर्यंत पोहचण्यासाठी महाराष्ट्रातच नव्हे तर देशभरात तिचा प्रसार झाला पाहिजे. नागरिकांमध्ये सारथी हेल्पलाईन प्रणालीची विश्वास अर्हता वाढली पाहिजे.

आयुक्त श्रावण हर्डीकर म्हणाले, सारथी या शब्दाचा अर्थ दिशादर्शक म्हणजेच योग्य दिशा दाखवणारा असा होतो. शहरातील लोकप्रतिनिधींना ब-याच वेळा नागरिकांच्या सर्व समस्या सोडविण्यास अडचण होत असते. अशा वेळी सारथी प्रणालीमार्फत कष्टकरी वर्गाचा वेळ वाया जाऊ नये म्हणून सारथी हेल्पलाईन उदयाला आली आहे. अवघ्या काही क्षणातच नागरिक आपल्या समस्या सारथी हेल्पलाईनला कळवू शकतो.

शासनाच्या अनेक अश्या योजना आहेत त्या योजनांची सर्व सर्वसामान्य नागरिकांना माहिती अथवा जाणीव नसते आणि या योजनांचा लाभ पदरी पाडून घेणे त्यांना शक्य नसते. अशा वेळी या सारथी हेल्पलाईन च्या माध्यमातून त्यांना इत्थंभूत माहिती मिळण्यास मदत होते. जग झपाट्याने तांत्रिक दृष्ट्या पुढे जात आहे. स्वतःच्या शहराला स्वतंत्र एक अँप असावे, असेही ते म्हणाले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्य माहिती व तंत्रज्ञान अधिकारी नीलकंठ पोमण यांनी केले. माहिती व जनसंपर्कचे रमेश भोसले यांनी सूत्रसंचालन केले.

22 Aug 2017


एमपीसी न्यूज : पुण्यातील सार्वजनिक गणेशोत्सवाचे यंदाचे 125 वर्षे आहे. या निमित्त पुणे महापालिकेच्या वतीने पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्यावर भर देण्यात येत आहे. यासाठी महापालिकेने येत्या 24 तारखेला तीन हजार शाडूच्या मूर्ती बनविण्याचा उपक्रम हाती घेतला आहे, या मूर्त्या 116 शाळांतील विद्यार्थी साकारणार आहेत. याची नोंद गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रिकॉर्ड्समध्ये होणार असल्याचे महापौर मुक्त टिळक यांनी पत्रकार परिषदेमध्ये सांगितले.

पुणे महापालिका यंदा शतकोत्तर रौप्यमहोत्सवी वर्ष साजरा करतोय. या निमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे या संदर्भात माहिती देण्यासाठी महापौर कार्यालयात पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी महापौर मुक्त टिळक, उपमहापौर सिद्धार्थ धेंडे, स्थायी समिती अध्यक्ष मुरलीधर मोहळ, सभागृह नेते श्रीनाथ भिमाले आदी उपस्थित होते.

यंदाच्या गणेशउस्तवातील विविध उपक्रमांपैकी दोन उपक्रमांची नोंद थेट 'गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड' मध्ये होणार आहे. त्यातील एक उपक्रम म्हणजे शाडू मातीचे पर्यावरणपूरक गणपती, 116 शाळातील विध्यार्थ्यांना कडून 3000 मूर्ती एकाच वेळेस बनविले आहेत. याची नोंद गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड'मध्ये करण्याचा महापालिकेचा मानस आहे. याच बरोबर विविध क्षेत्रातील 125 नामवंत कलाकारांच्या हस्ते गुरुवार दिनांक 24 रोजी सायंकाळी 5 वाजता पुण्याचं ग्रामदैवत श्री कसबा गणपतीची महाआरती आणि श्री अथर्वशीर्षाचे पठण होणार आहे. यामध्ये पुणे शहरातील चित्रपट, नाट्य, कला, साहित्य आणि संगीत क्षेत्रातील अभिनेते-अभिनेत्री, गायक, वादक, नर्तक,रंगभूमीवरील रंगकर्मी, तंत्रज्ञ, निवेदक आणि सांस्कृतिक क्षेत्रातील संयोजक-आयोजक आणि व्यावसायिक भाग घेणार आहेत. हे सर्वजण श्री गजाननाला येणारा गणेशोत्सव शांततेत, निर्विघ्नपणे, एकोप्याने आणि सुरक्षितपणे पार पडावा म्हणून एकत्रितपणे साकडं घालवणार आहे.

यासाठी कलाकारांसह अनेक संस्था सुद्धा पुढे आल्या आहेत. अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद -पुणे आणि कोथरूड शाखा, महाराष्ट्र साहित्य परिषद, एकपात्री कलाकार पुणे, शाहीर परिषद, m.a.p पुणे, बालगंधर्व परिवार, लोककला -लावणी निर्माता व कलावंत संघ, नाट्य निर्माता संघ, ऑर्केस्ट्रा निर्माता संघ, रंग भूमी सेवक संघ, नृत्य परिषद, साउंड लाईट जनरेटर संस्था या संस्थांचे पदाधिकारी आणि सभासद या महाआरतीमध्ये सहभागी होणार असल्याचे टिळक यांनी सांगितले

22 Aug 2017


एमपीसी न्यूज - मंगलमूर्ती मोरयाच्या नामघोषात, टाळ व मृदंगाच्या गजरात आज (मंगळवारी) दुपारी बारा वाजता चिंचवडच्या मंगलमूर्ती वाड्यातून पालखीचे मोरगावच्या दिशेने प्रस्थान झाले. पालखी प्रस्थानाबरोबरच मोरया गोसावी भाद्रपदी यात्रेला सुरुवात झाली.

मोरया गोसावी मंदिरात पालखीची पूजा करण्यात आली. सायंकाळी पुण्यात पोहचल्यानंतर दगडू शेठ गणपतीच्या दर्शनानंतर ती सासवड, जेजुरी येथून दोन दिवसानंतर मोरगावला पोहोचणार आहे. गणेश चतुर्थीच्या पूजेनंतर ती मोरगावातून पुन्हा चिंचवडकडे प्रस्थान करेल.

माघ व भाद्रपद या दोन महिन्यात यात्रेचे आयोजन केले जाते. ही सुमारे पाचशे वर्षांपूर्वीची परंपरा आहे जी आजही तेवढ्याच भक्तिभावाने चालवली जाते. सुमारे पाचशे वर्षांपूर्वी संत मोरया गोसावी यांना मोरगावातील क-हा नदीकाठी गणेश कुंडात मयुरेश्वरानी स्वप्नात दृष्टांत दिला. त्यानुसार त्यांना गणेशाची तांदळा मूर्ती मिळाली. ती त्यांनी चिंचवडमध्ये स्थापित केली. तेव्हापासून मोरया गोसावी हे माघ व भाद्रपद महिन्यात मयुरेश्वराच्या दर्शनाला मोरगावला पायी जात. हीच परंपरा कायम राखून आजही ही पालखी पायी मोरगावला जाते. यामध्ये भाविक आनंदाने सहभागी होतात.
morya gosavi

22 Aug 2017


एमपीसी न्यूज - पुणे महापालिका यंदा शतकोत्तर रौप्य महोत्सवी वर्ष साजरा करण्यात येत आहे. या निमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यासाठी महापालिकेकडून पैशांची उधळ पट्टी करण्यात येत आल्याचा आरोप करत शिवसेनेने आज झालेल्या मुख्यसभेत अंदोलन केले. मात्र यावेळी सत्ताधारी भाजपने देखील पुढे येत परस्पर विरोधी घोषणाबाजी केली. त्यामुळे संख्येने कमी असलेल्या शिवसेनेच्या आंदोलनांचा सत्ताधरी भाजपच्या घोषणांच्या आवाज पुढे आवाज दाबला गेला.

पुणे महापालिका यंदाचा गणेशोत्सव भव्यदिव्य साजरा करणार आहे. त्यासाठी दोन कोटींची तरतूद अंदाजपत्रकात करण्यात अली आहे. मात्र महापालिकेकडून खर्चाच्या स्वरूपात उधळ पट्टी करण्यात येत असल्याचा आरोप करत शिवसेने आंदोलन केले. मात्र याला विरोध करत भाजपने आक्रमक होत पुढे येऊन शिवसेनेचा धिक्कार असो अशा घोषणा देण्यास सुरवात करण्यात अली. तर शिवसेनेकडून या सत्ताधा-यांना सद्भुद्दी दे अशा परस्पर विरोधी घोषणा बाजी करण्यात आली. प्रत्येक वेळी आंदोलनाला पाठिंबा देणारे विरोधीपक्ष कॉग्रेस आणि राष्ट्रवादीने मात्र तटस्थ राहणे पसंत केले. त्यामुळे कुठे तरी शिवसेना या आंदोलनात एकाकी पडल्याचे दिसून आले.


Andolan 1

22 Aug 2017

राष्ट्रीय ज्येष्ठ नागरिक दिन निगडित उत्साहात साजरा

एमपीसी न्यूज - मानसिक व्याधीतून शारीरिक समस्या उद्भवतात. मानसिक व्याधीतून शारीरिक समस्या उद्भवतात. त्यामुळे योग्य आहार घेऊन नियमित व्यायाम केला पाहिजे. असा सल्ला लोकमान्य रुग्णालयाचे सांधेरोपण तज्ञ डॉ. नरेंद्र वैद्य यांनी ज्येष्ठ नागरिकांना दिला.

21 ऑगस्ट रोजी राष्ट्रीय ज्येष्ठ नागरिक दिन म्हणून सर्वत्र साजरा केला जातो. राष्ट्रीय ज्येष्ठ नागरिक दिनानिमित्त दुर्गेश्वर मित्र मंडळ आणि नगरसेवक अमित गावडे यांच्यातर्फे निगडी प्राधिकरण भागातील ज्येष्ठ नागरिकांकरिता व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमात ज्येष्ठ नागरिकांना सांधेदुखी आणि अत्याधुनिक उपचार या विषयावर डॉ. नरेंद्र वैद्य मार्गदर्शन करीत होते. यावेळी निवृत्त प्रशासकीय अधिकारी चंद्रकांत निंबाळकर, प्राधिकरण ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष मंगेश वर्टीकर, शिरीष सेबेस्टीयन, नगरसेवक अमित गावडे, बाळासाहेब परब, अनिल भावसार आणि निगडी प्राधिकरण परिसरातील ज्येष्ठ नागरिक उपस्थित होते. कार्यक्रमात वृद्धांसाठी कार्य करणा-या डॉ. श्रीकृष्ण जोशी, डॉ. धर्मेश गांधी आणि डॉ. जयेश क्षीरसागर यांना ज्येष्ठ मित्र पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.

डॉ. नरेंद्र वैद्य म्हणाले की, वजनावर नियंत्रण ठेवता आले पाहिजे. कोवळ्या उन्हातून शरीराला ड जीवनसत्व मिळते, यासाठी दररोज सकाळच्या उन्हात फेरफटका मारला पाहिजे. भारतीय लोक हाडांकडून भरपूर काम करून घेतात. त्यामुळे त्यांची काळजी देखील चांगल्या प्रकारे घ्यायला हवी. गुडघे व सांधेरोपण क्षेत्रात भारताने अदभुत संशोधन करत नवीन तंत्रज्ञान विकसित केले आहे. याचा लाभ प्रत्येक सांधेदुखीने पीडित असलेल्या व्यक्तीने घेतला पाहिजे. सांधेदुखीची कारणे सांगत त्यांनी त्यावरील उपाय देखील सांगितले.

चंद्रकांत निंबाळकर म्हणाले की, माणसाने नेहमी मनाने तरुण राहायला हवे. आयुष्याची सेकंड इनिंग प्रसन्नपणे घालवली पाहिजे. या दुस-या इनिंग मध्ये घरातल्या सदस्यांनी विचारलं तरच सल्ला द्यावा. तसेच आनंद वाटता-वाटता तोच आनंद लुटता देखील आला पाहिजे. वृद्धापकाळात घरातील अन्य बाबींकडे लक्ष न घालवता नात्यांमध्ये सामंजस्य वाढवून आपल्या आरोग्याला प्राथमिकता दिली पाहिजे. तसेच सदगुरु वामनराव पै यांचे विचार निंबाळकर यांनी अत्यंत मार्मिक शब्दात उदाहरणासहित उपस्थितांना सांगितले.

शिरीष सॅबेस्टीयन यांनी उत्तम आरोग्याच्या टिप्स दिल्या. चांगल्या सवयी लागण्यासाठी चांगल्या विचारांची गरज असते असेही शिरीष यांनी सांगितले. 
प्रास्ताविक नगरसेवक अमित गावडे यांनी केले. सूत्रसंचालन चंद्रशेखर जोशी यांनी केले.
Rashtriy Jeshth nagarik Din Amit Gawade 0
22 Aug 2017

 

एमपीसी न्यूज - अवघ्या तीन दिवसांवर येवून ठेपलेल्या गणेश उत्सावाची तयारी सर्व पातळ्यांवर जोरदार सुरु आहे. आपल्या लाडक्या बाप्पांचे धुमधडाक्यात स्वागत करण्यासाठी सगळ्यांची लगबग सुरु आहे. बाजारपेठांमध्ये गणरायाच्या आकर्षक मुर्त्यां आल्या आहेत.

पिंपरी, चिंचवड, भोसरी, निगडी, आकुर्डी, पिंपळे सौदागर, वाकड, रहाटणी, मोशी परिसरात मोठ्या प्रमाणात गणेश मुर्त्यांचे स्टॉल लागले आहेत. घरगुती, तसेच सार्वजनिक मंडळांमध्ये उत्सवाची लगबग सुरू झाली आहे. अनेक घरांत आतापासूनच मूर्ती सजवून लावण्यात आल्याने तयार झालेल्या गणेशमूर्ती बुकिंग करण्यासाठी ग्राहकांचीही लगबग वाढली आहे.

मागील काही महिन्यांपासून गणेशमूर्ती तयार करण्यासाठी व्यस्त असलेल्या मूर्तिकारांची आता गणरायाला सजवण्यासाठी लागभग जोरात सुरु आहे. रंगांच्या छटा, मोत्यांच्या माळा आणि आकर्षक अलंकाराची रचना करून मूर्ती बाजारात आल्या आहेत. 20 रुपयांपासून ते काही हजारांपर्यंत किमती बघायला मिळत आहेत. आणि त्या मूर्ती खरेदी करण्यासाठी गणेशभक्तांनी बाजारपेठांमध्ये एकच गर्दी केली आहे.

केवळ गणेशमूर्तीच नाही तर अन्य सजावटीच्या साहित्यांनी देखील बाजारपेठ भरली आहे. थर्माकॉल, प्लास्टिक फुले, तोरणे, लाईट, सिंहासन, रंगबिरंगी पेपर आणि बरेच साहित्य बाजारात आले आहे. मखरांमध्ये विविध प्रकार पाहायला मिळत आहेत. 
ganapati Sajavat Sahitya 01
ganapati Sajavat Sahitya 0
ganapati Sajavat Sahitya 02
ganapati Sajavat Sahitya 03
Makhar
Makhar 0
Makhar 02
Makhar 03
Makhar 05

22 Aug 2017


एमपीसी न्यूज - सार्वजनिक गणेश उत्सवाची सुरुवात भाऊसाहेब रंगारी यांनी केली कि लोकमान्य टिळक यांनी याचा वाद सुरु असतानाच भाऊ रंगारी गणेश मंडळाला धमकीचे पत्र मिळाले आहे. हे पत्र कोणी पाठवले हे अद्या समजू शकले नाही.

भाऊ रंगारी गणेश मंडळाला पाठवण्यात आलेल्या धमकी पत्रात म्हटले आहे कि, तुम्ही ज्या मागण्या करत आहेत त्या फालतू आहे. कोण भाऊ रंगारी त्याला कोणी ओळखत नाही. इतिहास पुनर मांडणी नाही तुमच्या घरच्यांना आता तुम्हची पुनर मांडणी करावी लागेन. तुम्हाला ठेचण्याची गरज आहे. तुम्ही तुमच्या सीमा पार केल्या आहेत. तुमचे कुठले हि पुरावे आम्हाला अमान्य आहेत. उपोषण केले तर भुकेनेच मेला तर बरे होईल नाहीतर आम्ही बघू. तसेच फालतू गोष्टीमध्ये पडू नका नाही तर सशस्त्र क्रांती काय असते ते तुम्हाला येत्या वीस दिवसांत दाखवू. अशा अशयाचे धमकीचे पत्र मंडळाला मिळाले आहे.

या संदर्भात मंडळाचे विश्वस्त सुरज रेणुसे एमपीसी न्यूजशी बोलताना ते म्हणाले, अशा प्राकरचे धकमीचे पत्र मागील वर्षी देखील आले होते. परंतु यंदाही धमकीचे पत्र मंडळास मिळाले आहे. प्रत्येक वर्षी असे पत्र येत असल्याने आता आम्ही शांत बसणार नाही. या विरोधात विश्रामबाग पोलीस ठाण्यात आज तक्रार दाखल करणार आहे.
IMG 20170822 WA0013

22 Aug 2017


एमपीसी न्यूज- पिंपरी-चिंचवड शहरातील नऊ रोटरी क्लबच्या वतीने चिंचवड येथील 'झेप' या संस्थेतील विशेष मुलांना खेळताना जमिनीवर पडल्यावर कोणत्याही प्रकारची दुखापत होऊ नये यासाठी 12 मॅट भेट देण्यात आले.

चिंचवड, पवनानगर येथे 'झेप' ही संस्था कार्यरत आहे. आज (मंगळवारी) या संस्थेतील विशेष मुलांना खेळण्यासाठी रोटरीतर्फे मॅट भेट देण्यात आले.

यावेळी रोटरी क्लब ऑफ पिंपरी टाऊनच्या अध्यक्षा वर्षा पांगारे, रोटरी क्लब ऑफ वाल्हेकरवाडीचे प्रदीप वाल्हेकर, रोटरी क्लब  ऑफ पिंपरीचे पंढरीनाथ जांभळकर, रोटरी क्लब ऑफ निगडी-पुणेचे हेमंत कुलकर्णी, रोटरी क्लब ऑफ चिंचवड मोरयाचे संजय सोंडेकर, रोटरी क्लब ऑफ पिंपळेसौदागरचे शाकुर सय्यद, रोटरी क्लब  ऑफ आकुर्डीच्या उज्ज्वला जोशी, रोटरी क्लब  ऑफ प्राधिकरणाचे विलास गावडे, रोटरी क्लब  ऑफ चिंचवडच्या अनघा रत्नपारखी, झेप संस्थेच्या संचालिका नेत्रा पाठकर, मनिषा मोहळकर तसेच रो. सविता राजापुरकर, रो. संजय देवधर, रो. शंकुतला बन्संल, रो. वसंत ढवळे, रो. भुपेंदरसिंग जंगी, रो. राजेंद्र शितोळे, रो. दक्षेस पांचाळ, रो. संजीव दाते आदी उपस्थित होते.

चिंचवड, पवनानर येथे झेप पुनर्वसन केंद्र ही संस्था गेल्या अनेक दिवसांपासून कार्यरत आहे. या संस्थेत विशेष मुलांचा सांभाळ केला जातो. त्यांना प्रशिक्षण दिले जाते. मुले खेळताना पडतात. पडल्यानंतर त्यांना कोणत्याही प्रकारची दुखापत होऊ नये यासाठी रोटरीतर्फे 12 मॅट भेट देण्यात आले आहेत.

पिंपरी-चिंचवड शहरात नऊ रोटरी क्लब कार्यरत आहेत. आजवर सगळेच रोटरी क्लब  स्वतंत्र उपक्रम, कार्यक्रम घेत होते. परंतु, सर्व रोटरी क्लबच्या पदाधिका-यांनी एकत्र येऊन संयुक्तरित्या हा उपक्रम घेतला आहे. पुण्यामध्ये सर्व रोटरी क्लब एकत्र येऊन विविध कार्यक्रम, उपक्रम राबवितात. पुण्याप्रमाणेच पिंपरी-चिंचवड शहरातील ही सर्व रोटरी क्लब एकत्र येऊन पुढील काळात उपक्रम, कार्यक्रम घेणार आहेत. 

22 Aug 2017

पालकमंत्री, महापौर, आयुक्तांची उपस्थिती

एमपीसी न्यूज- नाशिकमधील गोदापार्कच्या धर्तीवर पुण्यातील मुळा मुठा रिव्हरफ्रंट डेव्हलपमेंट आणि बालगंधर्व रंगमंदिराच्या विकास संकल्पनेचे सादरीकरण आज राज ठाकरे यांनी केले.
यावेळी पालकमंत्री गिरीश बापट, महापौर मुक्ता टिळक, स्थायी समिती अध्यक्ष मुरलीधर मोहोळ, सभागृहनेते श्रीनाथ भिमाले, विरोधी पक्षनेते चेतन तुपे, महापालिका आयुक्त कुणाल कुमार उपस्थित होते.

यावेळी राज ठाकरे म्हणाले, मुळा मुठा नदीपात्र बालगंधर्व ते म्हात्रे पूलापर्यंत नदीपात्र विकसनाचा आराखडा तयार करण्यात आला आहे. त्यासाठी राज्यातील कंपन्यांकडून सीएसआर योजनेतून पैसे उभे करता येतील. नदीपात्र विकसनाचा हा प्रकल्प तब्बल 840 कोटींचा असून त्यातून दरवर्षी तीन कोटींचा महसूल मिळणार आहे. यामध्ये फुलराणी, आखीवरेखीव संभाजी बाग, नदीपात्रात सोडले जाणारे मैलापाणी रोखणे आदी उपाययोजना करता येतील.

चित्रपटांप्रमाणे नाटकांसाठीही मल्टिप्लेक्स उभे करण्याचा मानस आहे. त्यामध्ये बालगंधर्व रंगमंदिरात प्रत्येकी हजार क्षमतेचे पाच नाट्यगृह, 5000 आसनक्षमतेचे एक ओपन थिएटर, 100 ते 200 आसनक्षमतेचे प्रायोगिक रंगकर्मींसाठी थिएटर अशा अद्ययावत सुविधा असतील.

यासाठी पुणे मुंबईतील अनेक उद्योजक सहकार्यास तयार आहेत. या आराखड्याची अंमलबजावणी करण्यासाठी महापालिकेने ट्रस्ट स्थापन करून त्यामध्ये पुण्यातील तज्ञ लोकांचा समावेश करावा, असे आवाहनही राज यांनी केले.

Page 3 of 296
Open Chat
1
Close chat
Hello! Thanks for visiting us. Please press Start button to chat with our support :)

Start