• IMG-20170812-WA0103.jpg
  • IMG-20171012-WA0071.jpg
  • IMG-20171013-WA0075.jpg
  • MPC_news.JPG
  • TVS.jpg
10 Sep 2017


एमपीसी न्यूज - फुकटचा चहा अती उत्तम लागतो # असो, बाकी सगळ ठिक आहे पण मिसळपाववर जीएसटी लागली तर दंगल होईल सांगून ठेवतोय # असो. आता  तुम्ही म्हणाल हे # असो काय आहे. तर मंडळी हा आहे कॅफे चायपाणीचा हॅश टॅग. नवी सांगवीतील साई चौकातील छोटा पण सा-यांचा लाडका कॅफे.


कॅफेची बैठक व्यवस्था जेवढी भारी आहे तेवढाच इथला मेनु पण बर का... चहा, बनमस्का, पोहे, मिसळ, मोमोज,  ऑमलेट, कॉफी, सॅन्डवीच जे तुम्हाला एखाद्या कट्ट्यावर हवे ते सारे पदार्थ तुम्हाला मिळतील.

कट्टा म्हटले की गप्पा, कटींग, टाईमपास करण्यासाठी मिळणारा वेळ आणि त्याला साजेसे वातावरण. असे कट्टे पुण्यात मिळतील पण पिंपरी-चिंचवड परिसरात खचितच. काही कॅफेनी आवर्जून आता कट्टा संकृती अवलंबण्यास सुरुवात केली आहे. त्यातीलच हा एक चाय पाणी. या कट्ट्याचे वैशिष्ट्य म्हणजे येथे असणा-या 'असो' च्या पाट्या. तिचा स्वभाव पण चहा सारखाच असतो गरम केल्याशिवाय प्यायला मजा येत नाही असो, चहापाणी करत व पोहे खात आपण एका तासात आयुष्यभरासाठी साथीदार निवडतो असो, अशा भन्नाट पाट्यांसोबत अद्रकाचा व स्पेशल चहा पिण्यात मजाच काही और आहे. अगदी मनातले विचार येथे तुम्हाला पाट्यांवर पाहायला मिळतील.

अगदी वर्षभरापूर्वीच अनिकेत बलकवडे या तरुणाने हा कॅफे सुरू केला. मात्र, तो आता सांगवी पोलीस, परिसरातील डॉक्टर, जोडपी, तरुणाचे फेंड सर्कल, बच्चे कंपनी व फिरायला येणारे आज्जी-आजोबा देखील येथे आवर्जून थांबतात. येथील चहा आणि मिसळ याचं कौतुक तर त्यांनी तोंडभरून केलं.

अनिकेत याविषयी बोलताना सांगतात की गेल्या काही वर्षातच मी मी हॉटेल मॅनेजमेंटच शिक्षण पूर्ण केलं, त्यानंतर मी ब-याच ठिकाणी बाहेर केटरिंगसाठीही जायचो पण इतरांच्या इथे 20-20 तास काम करत बसण्यापेक्षा स्वतःचेच काही सुरू केले तर म्हणून मी 18 सप्टेंबर 2016 ला हे चाय पाणी सुरू केले. आज वर्षभरात सर्वांनी भरभरून प्रेम दिले. त्यामुळे मी खास ग्राहकांसाठी चहा बरोबरच हे # असो सुरु केले. झी युवा वरील बन मस्का या मालिकेतून मला ही कल्पना सुचली व मी ती माझ्या कॅफेच्या सजावटीसाठी वापरली. सर्वांनाच आवडली. लोक आता आवर्जून त्याचे फोटो फेसबुक, इन्स्टाग्राम वर टाकत आहेत.

त्यामुळे निवांत पणा हवाय तो ही आपल्याच शहरात तर या # असोच्या कॅफे चाय पाणी भन्नाट कट्टयाला नक्की भेट द्या.  

TEa 6

TEa 7

TEa 8

TEa 1

TEa 2

TEa 3

TEa 4

TEa 5

TEa 9

03 Aug 2017

(स्मिता जोशी)
एमपीसी न्यूज- श्रावण महिना म्हणजे सण-समारंभ, व्रतवैकल्यांची रेलचेल असणारा महिना. त्यातच बाहेर पडत असणारा पाऊस, उन्हाळ्याची तलखी कमी होऊन वातावरणात आलेला सुखद गारवा. मग भूक तर कडकडून लागते. आणि काहीतरी चमचमीत खावेसे वाटू लागते. त्यातच येणारे विविध सण, त्यानिमित्त केले जाणारे गोडधोड. अशावेळी बाहेर कुठेतरी जाऊन खास महाराष्ट्रीयन चवीचे मस्त भोजन मिळाले तर मग काय पर्वणीच. हेच सणांचे औचित्य साधून चिंचवड स्टेशन येथे नव्याने सुरु झालेल्या हॉटेल रागा प्युअर व्हेजमध्ये रक्षाबंधन स्पेशल अमर्यादित थाळीचा आस्वाद आपण घेऊ शकता.

येत्या 5, 6 व 7 ऑगस्ट रोजी चिंचवडस्टेशन येथे नुकत्याच सुरु झालेल्या हॉटेल रागामध्ये खास रक्षाबंधनाच्या निमित्ताने फेस्टिव्हलचे आयोजन करण्यात आले आहे. हॉटेलमध्ये शिरल्याशिरल्याच तेथे लावलेली महाराष्ट्रातील गड किल्ल्यांची, प्रेक्षणीय स्थळांची छायाचित्रे आपले लक्ष वेधून घेतात. त्यातून दिसणारा महाराष्ट्राचा संपन्न वारसा आपल्या मनावर मोहिनी घालतो. त्यानंतर समोर आलेल्या खास थाळीमुळे आपले मन प्रसन्न होऊन जाते. खास बनवून घेतलेली स्टीलची मोठ्ठी थाळी, त्यात वेगळ्या धाटणीच्या कलात्मकतेने मांडलेल्या वाट्या आपले मन वेधून घेतात. दररोजचा वेगळा मेन्यू ही इथली खासीयत. हा मात्र आपला सर्वांचा एक लाडका महाराष्ट्रीयन पदार्थ इथे रोज असतो बरं का... गणरायांचा आवडता मोदक इथे दररोज आपले मन तृप्त करण्यासाठी थाळीत असतोच. काही बिगरमराठी, चोखंदळ ग्राहक खास मोदक खाण्यासाठी येथे आवर्जून येतात.

रक्षाबंधन फेस्टिव्हलनिमित्त खास मेन्यू तयार करण्यात आला असून यात भरली भेंडी, बटाटा रस्सा, भरली वांगी, अळू भाजी, मटकी उसळ, पिठलं, ज्वारी, बाजरीची भाकरी, पोळी, सुरळी वडी, कोथिंबिर वडी, खमंग काकडी, भजी, मसाला भात, थालिपीठ, ठेचा, तूप घातलेले गोडे वरण यासारख्या खास महाराष्ट्रीय पदार्थांची रेलचेल येथे आहे. आजकाल सर्वत्र पंजाबी, दाक्षिणात्य, गुजराती खाद्यपदार्थ थाळीमध्ये मिळतात. पण स्पेशल मराठी पदार्थ तेसुद्धा पूर्णपणे शाकाहारी आणि महाराष्ट्रातील विशिष्ट चवीचे मिळणे मुश्कील झाले आहे. त्यामुळे येथे तुम्हाला खास मराठी चवीची ओळख करुन देणारे विविध पदार्थ उपलब्ध आहेत.

मुख्य जेवणानंतर स्वीट डिश म्हणून मोदक, ओल्या नारळाच्या करंज्या, बासुंदी, जिलेबी, श्रीखंड, आम्रखंडदेखील येथे मिळू शकते. थाळीत एका वेळी दोन गोडाचे पदार्थ उपलब्ध आहेत. अशी माहिती हॉटेल रागाचे राहुल गावडे यांनी दिली. आणि येथील सर्वसमावेशक थाळीची चव चाखण्यासाठी येथे आवर्जून भेट द्यायलाच हवी असे येथील व्यवस्थापक वैभव शिर्के यांनी सांगितले. त्यामुळे ख-या खवय्यांची येथे नक्कीच चंगळ आहे. याशिवाय येथे घरगुती समारंभासाठी देखील ऑर्डर घेतल्या जातात.

रक्षाबंधनानंतर येणा-या स्वातंत्र्यदिनानिमित्त देखील येथे खास फेस्टिव्हल आयेजित करण्यात येणार आहे. त्यावेळी ओल्या पावट्याची उसळ, मुगाची उसळ, टॉमेटो सार,अळू भाजी, मसाला भात, आम्रखंड यासारख्या स्पेशल पदार्थांचा समावेश थाळीत केला आहे. बाकीचे नेहमीचे पदार्थ तर असणारच आहेत. याशिवाय शेव रस्सा, शेंगोळे, पाटवडी यासारखे पदार्थ एरवी उपलब्ध असतातच. दोन भाज्या, पिठलं, ठेचा, भाकरी, चपाती, सुरळी वडी, कोथिंबीर वडी, भजी, पापड, मसाला भात, साधा भात, आमटी, साधे वरण, दोन गोडाचे पदार्थ यात एक मोदक असणारच असा भरगच्च मेन्यू असणारी हॉटेल रागा येथील स्पेशल थाळी खायची असेल तर पोटात भरपूर भूक ठेवूनच या म्हणजे मग येथील सुग्रास अन्नब्रह्माला पुरेपूर न्याय दिल्यासारखे होईल आणि जेवून तृप्त झालेला प्रत्येकजण अन्नदाता सुखी भव आणि आजच्यासारखे उद्या मिळो असे निश्चितच म्हणेल.

पत्ता - हॉटेल रागा, प्युअर व्हेज
202, गावडे इस्टेट, जुना पुणे - मुंबई रस्ता,
राका गॅस एजन्सीजवळ,
चिंचवडस्टेशन, पुणे - 19

फोनवरुन ऑर्डर बुकींगसाठी संपर्क साधा-
88883 77799
020-27457799

Raga

Raga 2

Page 1 of 3