• IMG-20170812-WA0103.jpg
  • MPC_news.JPG
13 Sep 2017

Kalewadi : जमिनीच्या वादातून नवऱ्याने केले पत्नी व सासूवर वार





पती पोलिसांच्या ताब्यात

एमपीसी न्यूज- तुझ्या नावावरील 5 एकर जमीन माझ्या नावावर करून दे म्हणत नवऱ्यानेच पत्नी व सासूवर वार केले आहेत. ही घटना आज(बुधवारी) दुपारी घडली. 

रवींद्र कमलाकर तुपेकर (वय 51 रा. काळेवाडी), असे आरोपीचे नाव असून त्याला अटक केली आहे. अनुसया तुपेकर वय 45 काळेवाडी पत्नी सासू सुजराबाई कोल्हे वय 65 या दोघी जखमी असून पत्नीच्या पाठीवर व पोटावर चाकूने वार करण्यात आले आहेत. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अनुसया यांचे माहेर लातूरचे असून तेथे त्यांची 5 एकर जमीन आहे. अनुसया यांना भाऊ नसल्याने रवींद्र यांनी ही जमीन आपल्या नावार करून दे असा ससेमिरा दोघींच्याही पाठीशी लावला होता. मात्र त्यांच्या नावावर जमीन करण्यास नकार दिल्याने रागातून रवींद्र याने पत्नी अनुसया व सासू सुजराबाई यांच्यावर वार केले. 

या प्रकरणी वाकड पोलीस गुन्हा दाखल करून घेण्याचे काम करत आहेत.

Read 154 times