• IMG-20170812-WA0103.jpg
  • IMG-20171012-WA0071.jpg
  • IMG-20171013-WA0075.jpg
  • MPC_news.JPG
  • TVS.jpg
13 Sep 2017

Pune : मारहाण केल्याप्रकरणी एकास पोलीस कोठडी

एमपीसी न्यूज - पोलीस केस केल्याच्या कारणावरून एकास मारहाण करून गंभीर जखमी केल्याप्रकरणी आणखी एकास अटक करण्यात आली आहे. न्यायालयाने त्याला 14 सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहे.

गणेश विलास वांजळे (वय 24, रा. रामनगर, वारजे) असे कोठडी देण्यात आलेल्याचे नाव आहे. 

याप्रकरणी नितीन गेणुभाऊ सांगळे (वय 30, रा. बापुजी बुवा चौक, वारजे) यांनी फिर्याद दिली आहे. मारहाणीचा हा प्रकार 30 जुलै 2017 रोजी रात्री साडेआठ वाजता फिर्यादी यांच्या रामनगर येथील सलून बाहेर घडला. याप्रकरणात यापूर्वी चौघांना अटक करण्यात आली आहे. तर तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Read 93 times
Facebook Google Plus Twitter LinkedIn