• IMG-20170812-WA0103.jpg
  • MPC_news.JPG
13 Sep 2017

Pimple Gurav : क्लासच्या शिक्षिकेकडून तीन वर्षाच्या मुलाला अमानुष मारहाण

पोलिसांनी तक्रार घेण्यास टाळाटाळ केल्याचा नातेवाईकांचा आरोप

एमपीसी न्यूज - लाकडी पट्टीने शिक्षिकेने तीन वर्षाच्या मुलाला लाकडी पट्टीने हातावर, डोक्यावर व पाठीवर मारहाण केली आहे. हा मार एवढा जोरात होता की त्या चिमुकल्याचे अक्षरशः डोळे सुजले आहेत. याप्रकरणी मुलाच्या आईने पोलीस तक्रार घेत नसल्याचा आरोप केला आहे.

देव कश्यप असे त्या चिमुकल्याचे नाव असून या मारामुळे या चिमुकल्याच्या डोळ्यांना सूज आली आहे. मात्र, तरीही पोलिसांनी संबंधित प्रकरणाची तक्रार घेण्यास नकार केल्याचा आरोप पालकांनी केला आहे.

तर पोलिसांनी आमच्याकडे तक्रार आलीच नसल्याचे सांगत कानावर हात ठेवले आहेत.

Read 95 times Last modified on Wednesday, 13 September 2017 16:29