• IMG-20170812-WA0103.jpg
  • MPC_news.JPG
13 Sep 2017

Pune : गायछाप चोरांची टोळी गजाआड, 14 लाखाचा मुद्देमाल जप्त

एमपीसी न्यूज - गायछाप घेऊन जाणा-या कंटेनरसमोर स्कॉर्पिओ आडवी लावून त्यातील गायछाप तंबाखू आणि मशेरी असा 10 लाखाचा मुद्देमाल चोरणा-यांच्या मुसक्या ग्रामीण पोलिसांनी आवळल्या. हा प्रकार 8 ऑक्टोबरच्या पहाटे 2.30 वाजता जुन्नर तालुक्यातील आणे घाटात घडला होता.

अहमदनगर ते कल्याण महामार्गावरील आणे घाटातून हा कंटेनर जात असताना अनोळखी चोरट्यांनी स्कॉर्पिओमध्ये येऊन कंटेनरला आडवी मारून कंटेनर चालकास पिस्तूलच्या धाकाने स्कॉर्पिओ डांबले आणि कंटेनरमधील गायछाप तंबाखू व मशेरी असा किंमत रु. 14 लाख 42 हजार 682 रुपयांचा माल चोरून नेला होता. याप्रकरणी आळेफाटा पो.स्टे. गु.र.नं. 140/17 भादंवि 395 आर्म अॅक्ट 325 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता.

या गुन्ह्याचा तपास करत असताना ग्रामीण पोलिसांना मिळालेल्या माहितीच्या आधारे खालुंब्रे येथील महादेव ट्रेडींग कंपनीच्या मालकाला अटक केली. त्याच्याकडे केलेल्या अधिक चौकशीत त्याने अकरा साथीदारासह गुन्हा केल्याची कबुली दिली. यातील 9 आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्यांनी गुन्हा केल्याची कबुली दिली आहे.

त्यांच्या ताब्यातून पोलिसांनी गुन्ह्यात वापरलेली 1 स्कार्पिओ गाडी व 1 दुचाकी, रोख रक्कम रुपये 4 लाख (आरोपींनी चोरलेला काही माल विकून आलेली रक्कम) आणि गुन्ह्यातील चोरीस गेलेला 10 लाख 42 हजार रुपये किमतीचा माल अशा रितीने गुन्ह्यातील संपूर्ण माल हस्तगत केला आहे.

Read 171 times