• IMG-20170812-WA0103.jpg
  • IMG-20171012-WA0071.jpg
  • IMG-20171013-WA0075.jpg
  • MPC_news.JPG
  • TVS.jpg
13 Sep 2017

Pune : दुचाकीवरून पडल्याने तरुणाचा मृत्यू

एमपीसी न्यूज - कात्रज देहूरोड बाह्यवळण मार्गावरील चांदणी चौक ते डुक्कर खिंड दरम्यान भरधाव वेगातील दुचाकीवरून खाली पडल्याने डोक्याला गंभीर दुखापत होऊन दुचाकी चालकाचा मृत्यू झाला. नामदेव शिवानंद कापसे (वय. 26 रा. भूगाव, पौड रोड, पुणे) असे मृत्युमुखी पडलेल्या दुचाकी चालकाचे नाव आहे. याबाबत वारजे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, वारजे पोलीस तपास करत आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नामदेव कापसे हा आपल्या दुचाकीने काल (12 सप्टेंबर) रोजी दुपारी दीडच्या सुमारास वारजेवरून चांदणी चौक, भूगावच्या दिशेने निघाला होता. यावेळी त्याची गाडी आरएमडी कॉलेजच्या पुढे चढावर असताना तो चालत्या दुचाकीवरून खाली कोसळला आणि गंभीर जखमी झाल्याने त्याचा मृत्यू झाला. याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक नदाफ अधिक तपास करीत आहेत.

Read 125 times Last modified on Wednesday, 13 September 2017 14:54
Facebook Google Plus Twitter LinkedIn