• IMG-20170812-WA0103.jpg
  • IMG-20171012-WA0071.jpg
  • IMG-20171013-WA0075.jpg
  • MPC_news.JPG
  • TVS.jpg
13 Sep 2017

Wakad : वाकड येथे पाच वर्षाच्या चिमुरडीवर सुरक्षारक्षकांकडूनच अत्याचार

आरोपींना  सहा दिवसाची पोलीस कोठडी

एमपीसी न्यूज - वाकड येथील एका गृहप्रकल्पाच्या पार्किंगमध्ये खेळणा-या पाच वर्षाच्या चिमुरडीला लिफ्टच्या बाजूला नेऊन  दोन सुरक्षारक्षकांनीच आत्याचार केल्याची घटना उघडकीस आली. ही घटना सहा ते सात दिवसांपूर्वीची आहे.

संजीत रंजीत चासा (वय 20) आणि मंगल शुकला वैद्य (वय 23) दोघांचेही मूळगाव, करीमगंज आसाम अशी दोन नराधमांची नावे आहेत. वाकड पोलिसांनी दोघांना अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पाच वर्षांची चिमुरडी तिच्या मित्रांसोबत खेळत असताना आरोपींनी तिला बाजूला बोलावून घेतले व तिला लिफ्टच्या कोप-यात नेऊन तिच्यावर अत्याचार केला. हा सारा प्रकार चिमुरडीच्या मित्रानेही पाहिला होता. त्याने तो त्याच्या पालकांना सांगितला व त्याच्या पालकांनी पीडित मुलीच्या पालकांना मुलीची वागणूक व शेजा-यांनी सांगितलेली घटना ऐकताच मुलीच्या आईने वाकड पोलीस ठाण्यात धाव घेतली व आरोपींविरोधात तक्रार दिली.

वाकड पोलिसांनी कारवाई करत दोन्ही आरोपींना अटक केले व आज त्यांना शिवाजीनगर न्यायालयात हजर केले असता दोन्ही आरोपींना 19 सप्टेंबरपर्यंत म्हणजे सहा दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे.

संबंधीत आरोपी काही महिन्यापूर्वीच या सोसायटीमध्ये कामाला लागले होते असे त्यांना नेमणारी संस्था, त्यांची पार्श्वभूमी याचा तपास पोलीस घेत आहेत. तसेच नागरिकांना सुरक्षारक्षक किंवा कोणताही कर्मचारी नेमत असताना त्यांची पार्श्वभूमी तसेच त्यांची इतर माहिती घेऊनच त्यांना नोकरीवर नेमावे, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.

Read 169 times Last modified on Wednesday, 13 September 2017 13:34
Facebook Google Plus Twitter LinkedIn