• IMG-20170812-WA0103.jpg
  • IMG-20171012-WA0071.jpg
  • IMG-20171013-WA0075.jpg
  • MPC_news.JPG
  • TVS.jpg
12 Sep 2017

Pune : रागाच्या भरात आठ वर्षाच्या सावत्र भावाचा खून

लोहगाव परिसरातील घटना

एमपीसी न्यूज - रागाच्या भरात अचानक जवळ बसलेल्या आठ वर्षीय सावत्र भावाच्या डोक्यात घातक शस्त्राने वारकरून खून केल्याचा खळबळजनक प्रकार उघडकीस आला आहे. लोहगाव परिसरात एअर फोर्स ऑफिसर मॅरीड क्वार्टरमध्ये मंगळवारी सकाळी ही घटना घडली.

रघुनाथ पांडुरंग वरळे (वय ८, रा. एअर फोर्स, ऑफिसर मॅरीड क्वार्टर, लोहगाव, मुळ, नांदेड) असे खून झालेल्या मुलाचे नाव आहे. याप्रकरणी सावत्र भाऊ ज्ञानेश्‍वर वरळे (वय ३०) याला पोलीसांनी ताब्यात घेतले आहे. याप्रकरणी वडिल पांडुरंग वरळे (वय ७८) यांनी फिर्याद दिली आहे.

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, पांडुरंग वरळे यांच्या दहा वर्षापुर्वी दुसरा विवाह झाला असून, दुसर्‍या पत्नीचा मयत रघुनाथ वरळे हा मुलगा आहे. तर, आरोपी ज्ञानेश्‍वर हा पहिल्या पत्नीचा मुलगा आहे. पांडुरंग वरळे हे एअर फोर्स ऑफिसर मॅरीड क्वार्टरमध्ये राहण्यास आहेत. तेथील कामे पती-पत्नी करतात.

दरम्यान मंगळवारी सकाळी साडे नऊ वाजण्याच्या सुमारास ज्ञानेश्‍वर यांने रागाच्या भरात मयत रघुनाथ याच्या डोक्यात वाकस या शस्त्राने गंभीर वार केला. आवाज आल्याने फिर्यादी पांडुरंग हे पळत आले. त्यांनी तात्काळ रघुनाथला घेऊन रुग्णालय गाठले. तसेच पोलीसांना घटनेची माहिती दिली. विमानतळ पोलीसांनी घटनास्थळी धाव घेऊन घटनेची माहिती घेतली. याप्रकरणी खूनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. दरम्यान याघटनेत रघुनाथ गंभीर जखमी झाला होता. त्याच्यावर ससून रुग्णालयात उपचार सुरु होते. मात्र, सायंकाळी उपचारादरम्यान रघुनाथ याचा मृत्यू झाला. त्यानंतर याप्रकरणी खूनाच्या (कलम ३०२) गुन्ह्यात वाढ करण्याचे काम रात्री उशीरापर्यंत सुरु होते. याप्रकरणी अधिक तपास उपनिरीक्षक जाधव हे करत आहेत.

Read 287 times Last modified on Tuesday, 12 September 2017 16:15
Facebook Google Plus Twitter LinkedIn