• IMG-20170812-WA0103.jpg
  • MPC_news.JPG
19 Jun 2017

केवळ चापट मारल्याच्या कारणावरून केला खून

भारती विद्यापीठ परिसरातील युवकाच्या हत्येचे गुढ उकलले

एमपीसी न्यूज - सच्चाई माता चढाच्या रस्त्यालगत असलेल्या काशी विश्‍वेश्‍वर मंदिरासमोरील जुन्या पाण्याच्या टाकीजवळ धारदार शस्रांनी वार करून करणार्‍या तरुणाला अटक करण्यात आली आहे. भारती विद्यापीठ पोलिसांनी तरुणाला अटक केली असून त्याने केवळ चापट मारल्याच्या कारणावरून हा खून केल्याचे समोर आले आहे.

दीपक अंकुश लोणके (वय 25, दत्तनगर पुणे ), असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. शानू छमन्ना खान (वय 32, संतोषनगर, कात्रज), असे मयताचे नाव आहे. तर त्याचा भाऊ शारिक छमन्न खान (वय 28) याने भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञातांविरोधात भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

भारती विद्यापीठ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सच्चाई माता मंदिराच्या चढावरील काशी विश्‍वेश्‍वर मंदिरासमोरील मोकळ्या जागेत असलेल्या जुन्या पाण्याच्या टाकीजवळ एका तरुणाचा मृतदेह शुक्रवारी सकाळी रक्ताच्या थारोळ्यात आढळून आला. पोलिसांनी तपास सुरू केला. त्यानंतर काहीही धागादोरा पोलिसांच्या हाती लागला नाही. मात्र, तो गुरुवारी दिवसभर दीपक लोणके याच्यासोबत होता, अशी माहिती मिळाली.

त्यानंतर पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले आणि चौकशी केली. शानू खान व तो दारू पित असताना शानू याने दीपक लोणके याला दारुच्या नशेत शिवीगाळ करून चापट मारली होती. तो राग सहन न झाल्याने त्याने शानू खानला गुरुवारी दिवसभर सोबत घेऊन फिरला रात्री दारू पिण्यासाठी विश्‍वेश्‍वर मंदिरासमोर नेऊन त्याच्याजवळील धारदार चाकूने वार करत खून करून तेथून पसार झाला.

Read 232 times Last modified on Monday, 19 June 2017 15:06