• 123.jpg
  • IMG-20170812-WA0103.jpg
  • mpc.jpg
  • mpc1.jpg
  • MPC_news.JPG
19 Jun 2017

माउलीच्या पालखीत घुसखोरी प्रकरणी संभाजी भिडे गुरुजींवर गुन्हा दाखल


एमपीसी न्यूज - पुण्यातील गुडलक चौकात संत ज्ञानेश्वर महाराज पालखी मार्गात बेकायदेशीर जमाव जमवून घोषणाबाजी केल्या प्रकरणी शिवप्रतिष्ठानचे संभाजी भिडे गुरुजी, संजय जठार, पराशर मोने, रावसाहेब देसाई यांच्यासह सुमारे एक हजार जणांवर डेक्कन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

काय आहे प्रकरण

माउलींची पालखी गुडलक चौकात आली असता संभाजी भिडे गुरुजींच्या शिवप्रतिष्ठान संघटनेच्या संबंधित वारकरी धारकरी नावाच्या गटातील लोक तलवारीसह पालखीत घुसले होते, पालखीत चालण्याच्या नावाखाली या लोकांनी घुसखोरी करत घोषणा बाजी केली. यामुळे वारकऱ्यांमध्ये प्रचंड असंतोष निर्माण झाला. हेच लोक गेल्या चार-पाच वर्षांपासून हा प्रकार करत असल्याची तक्रार याआधी ही करण्यात आली होती. मात्र, पोलीस प्रशासनाने कारवाई केली नव्हती. रविवारी रात्री ( दि.17) पुन्हा एकदा असाच प्रकार घडला. त्यामुळे वारकऱ्यांनी संबंधित लोकांवर कारवाईची मागणी करत माऊलींची पालखी जागेवरच थांबवून ठेवली होती. अखेर आज (दि. 19) संभाजी भिडे गुरुजी आणि त्यांच्याशी संबंधित एक हजार लोकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Read 301 times Last modified on Monday, 19 June 2017 16:12
Facebook Google Plus Twitter LinkedIn
Open Chat
1
Close chat
Hello! Thanks for visiting us. Please press Start button to chat with our support :)

Start