• 123.jpg
  • IMG-20170812-WA0103.jpg
  • mpc.jpg
  • mpc1.jpg
  • MPC_news.JPG
19 Jun 2017

कुदळवाडी येथे आढळला अज्ञात इसमाचा मृतदेह


एमपीसी न्यूज - कुदळवाडी येथे एका अज्ञात इसमाचा मृतदेह आढळला आहे. ही घटना आज (सोमवारी) उघडकीस आली.

याबाबत निगडीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजयकुमार पळसुले यांनी एमपीसी न्यूजला दिलेल्या माहितीनुसार, इसमाचे वय अंदाजे 50 वर्ष आहे. त्याच्या अंगावर शर्ट व हाफ पॅन्ट होती. त्याचा मृत्यू दोन दिवसापूर्वी झाल्याचा अंदाज आहे. मात्र, त्याच्या अंगावर कोणत्याच जखमा नाहीत. त्यामुळे मृत्यूचे कारण अद्याप कळाले नाही.

मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला आहे. त्यानंतरच मृत्यूचे कारण कळेल. तसेच अद्याप इसमाची ओळख पटली नसून  तपास चालू आहे, असेही पळसूले यांनी सांगितले.

Read 202 times Last modified on Monday, 19 June 2017 13:45
Facebook Google Plus Twitter LinkedIn
Open Chat
1
Close chat
Hello! Thanks for visiting us. Please press Start button to chat with our support :)

Start