• 123.jpg
  • IMG-20170812-WA0103.jpg
  • mpc.jpg
  • mpc1.jpg
  • MPC_news.JPG
19 Jun 2017

विठ्ठलनगर येथील मजुराचा इमारतीच्या 5 व्या मजल्यावरून पडून मृत्यू


एमपीसी न्यूज - पिंपरीतील विठ्ठलनगर येथील 45 वर्षीय मजुराचा इमारतीच्या पाचव्या मजल्यावरून पडून मृत्यू झाला आहे. ही घटना आज (सोमवारी) पाचच्या सुमारास घडली.

मल्लीक भीमराव आडागळे (वय 45 रा. विठ्ठलनगर झोनिपू प्रकल्प, पिंपरी) असे मयत मजुराचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मल्लीक हा दारुच्या नशेत होता. त्याच नशेत त्याने ही उडी घेतली असावी, असा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला. जयश्री हनुमान सोसायटी येथे राहणा-या त्याच्या बहिणीच्या घरी तो आला होता. अद्याप त्याच्या मृत्यूचे कारण कळालेले नाही. मल्लीक याचा मृतदेह पिंपरीच्या वायसीएम रुग्णालयात शवविच्छेदनासाठी आणला असून पिंपरी पोलीस याबाबत अधिक तपास करत आहेत.

Read 124 times Last modified on Monday, 19 June 2017 13:10
Facebook Google Plus Twitter LinkedIn
Open Chat
1
Close chat
Hello! Thanks for visiting us. Please press Start button to chat with our support :)

Start