• 123.jpg
  • IMG-20170812-WA0103.jpg
  • mpc.jpg
  • mpc1.jpg
  • MPC_news.JPG
19 Jun 2017

माउलींच्या पालखी सोहळ्यातून भाविकांचे साडे बावीस तोळे सोने चोरीला; दोन संशयित महिला ताब्यात


एमपीसी न्यूज - ज्ञानेश्वर महाराजांची पालखी आळंदी रोड येथील मॅगेझीन चौकात आली असता येथून 7 जणांचे सुमारे साडे बावीस तोळे सोने चोरीला गेले. या प्रकरणी दिघी पोलिसांनी दोन महिलांना अटक केली आहे. ही घटना काल (रविवारी) सकाळी साडेनऊ वाजता घडली.

राधाबाई कांबळे (वय 45 रा. देगुलुकर, नांदेड), अनिता गायकवाड (वय 42 रा.सोलापूर), अशी अटक केलेल्या दोन संशयीत महिला आरोपींची नावे आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी (दि.18) ज्ञानेश्वर माऊलींची पालखी दिघीच्या मॅगेझीन चौकात आली असता सुमारे सात जणांच्या गळ्यातील दागिन्यावर चोरट्यांनी डल्ला मारला. यामध्ये 2 लाख 25 हजार किमतीचे साडेबावीस तोळ्याचे दागिने चोरीला गेले आहेत. यामध्ये पुरुषांच्या गळ्यातील साखळ्या, महिलांचे मंगळसूत्र, गंठण आदीचा समावेश आहे.  याप्रकरणी पोलिसांनी वरील दोन महिलांना संशयावरून ताब्यात घेतले आहे. त्यांना आज पोलिसांनी शिवाजीनगर सत्र न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने शुक्रवारपर्यत (दि. 23) पोलीस कोठडी सुनावली आहे.

याप्रकरणी चोरीला गेलेले अद्याप कोणतेच सोने पोलिसांना मिळाले नसून दिघी पोलीस अधिक तपास करत आहेत. देहू येथेही चोरट्यांनी शनिवारी (दि.17)  संत तुकोबा रायांच्या पालखी सोहळ्यात दर्शनास आलेल्या भाविकांच्या 27 तोळे सोन्यावर डल्ला मारला होता. त्यामुळे नागरिकांनीही आपल्या मौल्यवान वस्तूंची काळजी घ्यावी व  दर्शनाला जाताना भरगोस दागिने घालू नयेत, असे आवाहनही पोलिसांनी केले आहे.

Read 121 times Last modified on Monday, 19 June 2017 12:46
Facebook Google Plus Twitter LinkedIn
Open Chat
1
Close chat
Hello! Thanks for visiting us. Please press Start button to chat with our support :)

Start