• 123.jpg
  • IMG-20170812-WA0103.jpg
  • mpc.jpg
  • mpc1.jpg
  • MPC_news.JPG
19 Jun 2017

दुचाकी चालवत असताना चक्कर आल्याने दुचाकी दुभाजकावर आदळली, युवकाचा मृत्यू


एमपीसी न्यूज - दुचाकीवर मित्रालासोबत घेऊन जाणाऱ्या दुचाकी चालकाला चक्कर आल्याने दुचाकी रस्ता दुभाजकावरवर धडकली. यामध्ये गंभीर जखमी झाल्याने 26 वर्षीय युवकाचा मृत्यू झाला. ही घटना रविवारी (18 जून) दुपारी 3.00 वाजता हडपसर येथील लक्ष्मीबाई मगर शाळेसमोर घडली.

प्रतुल ओमप्रकाश गौतम (वय- 26, रा. आयरिश सोसायटी, मगरपट्टा सिटी, हडपसर, पुणे), असे मयत युवकाचे नाव आहे.

याप्रकरणी अधिक माहिती अशी की, प्रतुल हा मित्र नितीन थेरकर यास पाठीमागे बसवून भरधाव वेगाने दुचाकी चालवत होता. दरम्यान, अचानक चक्कर आल्याने तो रस्त्यामध्ये असलेल्या दुभाजकावर धडकला. यामध्ये गंभीर जखमी झालेल्या प्रतुलचा मृत्यू झाला.

Read 288 times Last modified on Monday, 19 June 2017 11:34
Facebook Google Plus Twitter LinkedIn
Open Chat
1
Close chat
Hello! Thanks for visiting us. Please press Start button to chat with our support :)

Start