• 123.jpg
  • IMG-20170812-WA0103.jpg
  • mpc.jpg
  • mpc1.jpg
  • MPC_news.JPG
19 Jun 2017

शिंदवणे घाटातील 'त्या' महिलेवरील सामूहिक बलात्कार बनाव असल्याचे उघड

एमपीसी न्यूज - नारायणगाव येथून देवदर्शन करुन घरी परतणा-या महिलेवर शिंदवणे घाटाट दोन दिवसांपूर्वी फॉर्चुनर गाडीतून आलेल्या दोघांनी सामुहिक बलात्कार केल्याचा प्रकार उघडकीस आला होता. मात्र, हा सगळा प्रकार वैयक्तित भांडणातून दोन तरुणांना केडगाव येथील महिलेच्या मदतीने तुरुंगात पाठविण्याचा असल्याचा समोर आला असून महिलेच्या मदतीने नारायणगव्हण येथील दोघांनी हा बनाव रचल्याचे समोर आले आहे. 

नारायणगव्हाण परिसरातील दादा गव्हाण व संदीप जगदाळे या गुडांनी पूर्ववैमनस्यातून आपल्याच गावातील प्रकाश चव्हाण व अजय नवले यांना तुरुंगात पाठविण्यासाठी केडगाव (ता. दौड) परिसरातील महिलेला हाताशी धरून बलात्काराचा कट रचल्याचे तपासात उघड झाले आहे. फॉर्च्युनर मोटारीतून आलेल्या दोघांनी महिलेवर बलात्कार केल्याची साक्ष देणारे दोन तरुणही गव्हाण व जगदाळे यांनी पैसे देऊन उभे केले असून संबंधित महिलेनेही गव्हाण व जगदाळे यांच्या सांगण्यावरून खोटी फिर्याद दिल्याची कबुली दिली आहे.

घटनेनंतर संबंधित महिलेने गाडीचा नंबर पाहिलेले दोन साक्षीदारही उभे केले होते. त्यानंतर तपासासाठी वेगवेगळी पथके रवाना करण्यात आली होती. दरम्यान, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा व स्थानिक पोलिसांच्या तपासानंतर हा कट प्रकाश चव्हाण व अजय नवले यांना तुरुंगात पाठविण्यासाठी रचल्याचे निष्पन्न झाले आहे.

Read 489 times Last modified on Monday, 19 June 2017 05:15
Facebook Google Plus Twitter LinkedIn
Open Chat
1
Close chat
Hello! Thanks for visiting us. Please press Start button to chat with our support :)

Start