• 123.jpg
  • IMG-20170812-WA0103.jpg
  • mpc.jpg
  • mpc1.jpg
  • MPC_news.JPG
19 Jun 2017

पेट्रोल विक्री चीप घोटाळा ! हडपसर परिसरातील पेट्रोलपंपावर गुन्हे शाखेचा छापा

एमपीसी न्यूज - हडपसर परिसरातील वैदुवाडी येथे शनिवारी रात्री एका एचपी कंपनीच्या पेट्रोल पंपावर ठाणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने छापा टाकला. यावेळी तेथील मशिनची तपासणी करण्यात आली असून एका मशिनमधील काही माहिती पोलिसांनी घेतल्याचे सुत्रांनी सांगितले. मात्र, हा पेट्रोल पंप सुरु असून, तो सील करण्यात आलेला नाही. याबाबत हडपसर पोलिसांना काही माहिती कळवण्यात आली नसल्याचे हडपसर पोलीस ठाण्यातील वरिष्ठ निरीक्षक विष्णू पवार यांनी सांगितले.

दरम्यान, काही दिवसांपूर्वी ठाणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने मानपाडा येथील एका पेट्रोलपंप मशीनमध्ये छेडछाडकरुन लाखो नागरिकांची फसवणूक करणार्‍या टोळीचा पर्दाफाश केला. त्यानंतर राज्यासह देशभरात हे प्रकरण गाजले असून, राज्यातील अनेक शहरांमध्ये छापे सत्र सुरु केले आहे. याटोळीकडून पुणे, नाशिक तसेच औरंगाबाद यासह महत्वाच्या शहरामधील पेट्रोल पंप मशिमध्ये छेडछाड केल्याचे उघडकीस आले होते. त्यानंतर ठाणे पोलिसांच्या गुन्हे शाखेची पंधरा पथकांनी राज्यातील पेट्रोल पंपावर धाड सत्र सुरु केले होते.

Read 190 times Last modified on Monday, 19 June 2017 07:43
Facebook Google Plus Twitter LinkedIn
Open Chat
1
Close chat
Hello! Thanks for visiting us. Please press Start button to chat with our support :)

Start