• 123.jpg
  • IMG-20170812-WA0103.jpg
  • mpc.jpg
  • mpc1.jpg
  • MPC_news.JPG
18 Jun 2017

दापोडी येथे भरदिवसा 2 लाखांची घरफोडी

एमपीसी न्यूज -  दापोडी येथे दुपारी तीनच्या सुमारास बंद घराचे कुलुप उचकटून घरातील दागिने व रोख रक्कम, असा सुमारे दोन लाखांचा ऐवज चोरटयांनी लंपास केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दापोडी येथील विनीयार्ड चर्च शेजारी गणेश हाऊसिंग सोसासयटीमध्ये राहणा-या अजय ओव्हाळ (वय 37) यांच्या घरी काल दुपारी 3 ते 6 या कालावधीत बंद घराचे कुलूप कशाच्या तरी सहाय्याने उचकटून घरातील कपाटातील रोख 50 हजार रुपये व दागिने असा 1 लाख 90 हजार रुपयांचा ऐवज चोरीला गेला आहे.

याप्रकरणी भोसरी पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल केला असून भोसरी पोलीस अधिक तपास करत आहेत.

Read 117 times Last modified on Sunday, 18 June 2017 09:44
Facebook Google Plus Twitter LinkedIn
Open Chat
1
Close chat
Hello! Thanks for visiting us. Please press Start button to chat with our support :)

Start