• 123.jpg
  • IMG-20170812-WA0103.jpg
  • mpc.jpg
  • mpc1.jpg
  • MPC_news.JPG
18 Jun 2017

चिंचवड रेल्वे स्थानकाजवळ रेल्वे अपघातात अज्ञात इसमाचा मृत्यू

एमपीसी न्यूज- चिंचवड रेल्वे स्थानकाजवळ पुण्याकडे जाणाऱ्या रेल्वे रुळावर एका अज्ञात इसमाचा रेल्वेच्या धडकेने मृत्यू झाला आहे. ही घटना आज सकाळी साडेसहा वाजता उघडकीस आली.

रेल्वे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, इसमाचे अंदाजे वय 45 आहे. धडकेमध्ये डोक्याचे दोन भाग झाल्याने त्याची ओळख पटू शकलेली नाही. या इसमाची उंची 5 फूट 3 इंच असून रंग गहू वर्ण आहे. डाव्या हाताच्या पोटरीवर बदाम व बदनामध्ये अंबिका नाव कोरले आहे.अंगावर आकाशी रंगाचा व पांढऱ्या रेघा असलेला हाफ शर्ट व राखाडी पॅन्ट घातलेली आहे.ही घटना रात्री उशिरा घडली असून भरधाव रेल्वेच्या धडकेत त्याचा मृत्यू झाल्याचा पोलिसांचा अंदाज आहे.

Read 146 times Last modified on Sunday, 18 June 2017 06:51
Facebook Google Plus Twitter LinkedIn
Open Chat
1
Close chat
Hello! Thanks for visiting us. Please press Start button to chat with our support :)

Start