• 123.jpg
  • IMG-20170812-WA0103.jpg
  • mpc.jpg
  • mpc1.jpg
  • MPC_news.JPG
17 Jun 2017

जुन्या पुणे-मुंबई राष्ट्रीय महामार्गावर कारची दुचाकीला धडक; दोन जण गंभीर जखमी

एमपीसी न्यूज - जुन्या पुणे-मुंबई राष्ट्रीय महामार्गावर एलएनटीच्या कार्यालयाजवळ एका अज्ञात कारने स्पोर्टबाईकला मागून जोरात धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. ही धडक इतकी जोरात होती की या धडकेत मोटारसायकल जवळपास 80 फूट लांब नजीकच्या रेल्वे ट्रॅकवर पडली होती. सुदैवाने या दरम्यान कोणतीही रेल्वेगाडी आली नव्हती. शनिवारी सकाळी अकरा वाजता हा अपघात झाला.

प्रवीण इंद्रमल सिंग (वय - 28), श्रीदेवी वाडकर (वय- 26, रा. कांजूर मार्ग, मुंबई), असे अपघातात गंभीर जखमी झालेल्यांची नावे आहे.

लोणावळा शहर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रवीण व श्रीदेवी हे दोघे त्यांच्या केटीएम स्पोर्ट मोटर सायकलने (एमएच-03/ सीक्यू- 1341) मुंबईहून लोणावळ्याला येत होते. लोणावळा व खंडाळ्याच्या दरम्यान असलेल्या निरा टपरी समोर भरधाव वेगात ओव्हरटेक करणाऱ्या एका अज्ञात ऑडी कारने पुढे जात असलेल्या केटीएम स्पोर्ट मोटारसायकलला मागून जोरात धडक दिली. या भीषण धडकेत स्पोर्ट मोटारसायकल सुमारे 80 फुटांपेक्षा अधिक दूरवर फेकली जाऊन नजीकच असलेल्या रेल्वेट्रॅकवर जाऊन पडली.

या भीषण अपघातात प्रवीणचा एक पाय तुटून मार्गाजवळ पडला होता. तर श्रीदेवी मार्गावर जोरात आदळल्याने गंभीर जखमी झाले आहे. अपघातानंतर या दोघांना अनिमल अॅम्ब्युलन्सने उपचारासाठी लोणावळ्यातील एका खाजगी रुग्णालयात दाखल केले, तेथे प्राथमिक उपचार करून पुढील उपचाराकरिता त्यांना पुण्यातील एका खासगी रुग्णालयात दाखल केले असून, तेथे त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरु आहे. या घटनेचा पुढील तपास लोणावळा शहर पोलीस करीत आहे.

Read 142 times
Facebook Google Plus Twitter LinkedIn
Open Chat
1
Close chat
Hello! Thanks for visiting us. Please press Start button to chat with our support :)

Start