Bhosari : शिवी दिली म्हणून बियरची बाटली डोक्यात फोडली bear bottle
16 Apr 2018

Bhosari : शिवी दिली म्हणून बियरची बाटली डोक्यात फोडली
एमपीसी न्यूज - शिवी दिल्याच्या कारणावरून एका मित्राने दुस-या मित्राच्या डोक्यात बियरची बाटली फोडली. हा प्रकार शनिवारी (दि. 14) रात्री अकराच्या सुमारास कासारवाडी येथे घडला. 

जयकुमार त्रिंबके (वय 29, रा. सविता कुंजच्या मागे, कासारवाडी) यांनी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार समीर सुर्यगंध (पूर्ण नाव माहित नाही) याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जयकुमार यांच्या मामाच्या मुलाचा 14 एप्रिल रोजी वाढदिवस होता. त्यानिमित्त कासारवाडी येथील द्वारकानगर या इमारतीच्या टेरेसवर पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. त्या पार्टीसाठी समीर देखील आला होता. जयकुमार आणि समीर हे दोघेही एकमेकांचे मित्र आहेत. पार्टी सुरु असताना दोघांमध्ये शाब्दिक चकमक उडाली. त्यामध्ये जयकुमार याने समीरला शिवी दिली. त्यावरून समीरने जवळच असलेली बियरची बाटली जयकुमारच्या डोक्यात फोडली. यामध्ये जयकुमारच्या डोक्याला गंभीर जखम झाली असून त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. यावरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भोसरी पोलीस तपास करीत आहेत.

Read 200 times
Tagged under

Like what you see?

Close

Hit the buttons below to follow us

0
Shares