• mahesh_kale_1250by200.jpg
13 Jan 2018

Pune : अंमली पदार्थ विक्री करणारी टोळी जेरबंद, हेरॉईन आणि चरससह बारा लाखाचा मुद्देमाल जप्त
एमपीसी न्यूज - अंमली पदार्थ विक्रीप्रकरणी पुण्यातील खडक, पिंपरी आणि वानवडी पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल असलेल्या आरती मिसाळ टोळीतील सात जणांना अंमली पदार्थ विरोधी पथकाच्या गुन्हे शाखेने जेरबंद केले. त्यांच्या ताब्यातून 102 ग्रॅम हेरॉईन, 250 ग्रॅम चरससह सोन्याचे दागिने आणि कार, दुचाकी असा बारा लाख 81 हजाराचा मुद्देमाल जप्त केला. 

आरती महादेव मिसाळ, पूजा महादेव मिसाळ, निलोफर हयात शेख, रॉकिसिंग जालिंदरसिंग कल्याणी (सर्व राहणार, रामटेकडी, हडपसर, पुणे), आयेशा उर्फ आशाबाई पापा शेख, जुलैखाबी पापा शेख (रा.सांताक्रुझ, मुंबई) आणि अजहर उर्फ चुहा हयात शेख (रा.हरकानगर, पुणे) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. 

अंमली पदार्थांची तस्करी केल्याप्रकरणी खडक पोलिसांनी 18 डिसेंबर रोजी अजहर उर्फ चुहा हयात शेख याला अटक केली होती. उर्वरीत आरोपींचा शोध सुरू असताना पोलीस कर्मचारी केकान व शिंदे यांना सदर आरोपी नगर रोड-वाघोली भागात स्विफ्ट गाडीतून फिरत असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी सदर भागातून त्यांना अटक केली. पोलिसांनी चौकशी करून त्यांच्या ताब्यातून हेरॉईन आणि चरस जप्त केले. आरोपींना आज न्यायालयात हजर केले असता सर्वांना 15 जानेवारीपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश न्यायालयाने दिला आहे. 

ही कारवाई खडक पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र मोकाशी, गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संभाजी शिर्के, तपास पथकाचे पोलीस उपनिरीक्षक संजय गायकवाड, अनंता व्यवहारे, कर्मचारी सागर केकाण, विशाल शिंदे, सर्फराज शेख, विश्वनाथ शिंदे, राकेश क्षीरसागर, संदीप कांबळे, गणेश माळी, इम्रान नदाफ, अनिकेत बाबर, आशिष चव्हाण, हेमा ढोबे, रेखा बांडे, राजश्री अंबिकेस गौरी राजगुरू यांच्या पथकाने केली.

Read 90 times

Like what you see?

Close

Hit the buttons below to follow us

0
Shares