• mahesh_kale_1250by200.jpg
12 Jan 2018

​Pune : जप्त केलेले साडेतीन किलो सोन्याचे दागीने पोलिसांनी नागरिकांना परत दिले

एमपीसी न्यूज - पुणे पोलीस आयुक्तालयांच्या हद्दीतील पोलीस स्टेशनमध्ये दाखल असणा-या जबरी चोरी, घरफोडी अशा 73 गुन्ह्यातील जप्त केलेला एक करोड 1 लाख रुपये किमतीचा मुद्देमाल पोलीस आयुक्त रश्मी शुक्ला यांच्या हस्ते त्यांच्या मुळ मालकांना परत करण्यात आला. शिवाजीनगर पोलीस मुख्यालयातील आर.एस.पी.शेड मध्ये पार पडलेल्या या कार्यक्रमात 3 किलो 562 ग्रॅम वजनाचे हिरे आणि सोन्या चांदीचे दागीने त्यांच्या मुळ मालकांच्या ताब्यात सोपवण्यात आले.

यावेळी पोलीस सह आयुक्त रविंद्र कदम, अप्पर पोलीस आयुक्त प्रदीप देशपांडे, दक्षिण प्रादेशिक विभागाचे अपर पोलीस आयुक्त रविंद्र सेनगावकर, प्रशासन विभागाचे अपर पोलीस आयुक्त साहेबराव पाटील, पोलीस उप आयुक्त, सहायक पोलीस आयुक्त, गुन्हे शाखाचे पोलीस निरीक्षक आणि पुणे शहर पोलीस स्टेशनमधील वरिष्ठ पोलीस निरीक्षक उपस्थित होते. 

मागील वर्षी (2017) मुद्देमाल वाटपाचे एकुण 4 कार्यक्रम पार पडले असून त्याद्वारे 257 नागरिकांना तीन करोड 64 लाख 84 हजार रुपये किंमतीचा चोरीला गेलेला मुद्देमाल त्यांना परत करण्यात आला होता. 

WhatsApp Image 2018 01 12 at 5.34.27 PM

Read 86 times

Like what you see?

Close

Hit the buttons below to follow us

0
Shares