• mahesh_kale_1250by200.jpg
12 Jan 2018

Pune : अंथरुणाची झडती घेणा-या तुरुंग अधिका-यास कैद्यांची मारहाण
येरवडा तुरुंगातील प्रकार 
 
एमपीसी न्यूज - अंथरुणाची झडती घेणा-या तुरुंग अधिकारी आणि कारागृह रक्षकास कैद्यांनी मिळून मारहाण केल्याचा प्रकार येरवडा तुरुंगात बुधवारी (दि.10) सायंकाळी 6 वाजता घडला. तुरुंग अधिकारी नागनाथ जगताप (वय-35) यांनी फिर्याद दिली असून तुषार नामदेव हंबीर, किरण अक्षय दत्तात्रय भालेराव, अक्षय लक्ष्णम इंगुळकर आणि निवृत्ती पवार या कैद्यांवर येरवडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. 
 
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे येरवडा तुरूंगात तुरुंग अधिकारी पदावर कार्यरत आहेत. बुधवारी ते नेहमीप्रमाणे कारागृह रक्षक रमेश पिसोळे यांच्यासह तुरुंगातील कैद्यांच्या अंथरुणाची झाडाझडती घेत असताना कैदी तुषार हंबीर याने अंथरूण जोरात झटकले. यावर कारागृह रक्षक रमेश पिसोळे यांनी अंगावर धूळ उडत असल्याने हळू झटकण्यास सांगितले. 
 
याचाच राग आल्याने वर नमूद केलेल्या आरोपींनी एकत्र येत पिसोळे यांना मारहाण करण्यास सुरुवात केली. नागनाथ जगताप यांनी मध्यस्थी करत पिसोळे यांना सोडविण्याचा प्रयत्न केला असता आरोपींनी शिवीगाळ करत त्यांनाही मारहाण केली आणि सरकारी कामात अडथळा निर्माण केला. याप्रकरणी येरवडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस उपनिरीक्षक प्रवीण देशमुख अधिक तपास करत आहेत.
Read 125 times

Like what you see?

Close

Hit the buttons below to follow us

0
Shares