• mahesh_kale_1250by200.jpg
12 Jan 2018

Pune : पाणी आणण्यासाठी आईसोबत गेलेल्या चिमुरडीचा पाण्याच्या टाकीत बुडून मुत्यू
एमपीसी न्यूज - पाणी आणण्यासाठी आईसोबत गेलेल्या दोन वर्षीय चिमुरडीचा महापालिकेच्या पाण्याच्या टाकीत बुडून मृत्यू झाला. ही दुर्घटना वडगावशेरी येथील महापालिकेच्या विरंगुळा केंद्रावर गुरुवारी (11 जानेवारी) दुपारच्या सुमारास घडली. दशमी लोखंडे (रा. लेबर कॅम्प, वडगावशेरी, मूळ अमरावती), असे चिमुरडीचे नाव आहे. 

या प्रकरणी अधिक माहिती अशी की, वडगावशेरीतील एका बांधकाम प्रकल्पावर लोखंडे कुटूंबीय काम करतात. या ठिकाणी काम करणारे कामगार विरंगुळा केंद्रासमोरील रस्त्यावर राहतात. दरम्यान, गुरुवारी दशमीची आई पाणी आणण्यासाठी विरंगुळा केंद्रावर गेली असता दशमीही तिच्या पाठीमागे गेली होती. पाणी घेऊन दशमीची आई निघून गेली. त्यानंतर काही वेळाने दशमी मागेच राहिल्याचे लक्षात आल्यानंतर शोधाशोध केली असता पाण्याच्या टाकीत दशमी मृतावस्थेत आढळली. येरवडा पोलिसांनी याप्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे.

Read 58 times Last modified on Friday, 12 January 2018 06:26

Like what you see?

Close

Hit the buttons below to follow us

0
Shares