• mahesh_kale_1250by200.jpg
12 Jan 2018

Pune : घरात घुसून केलेल्या मारहाणीत ज्येष्ठ नागरिकाचा मृत्यू
एमपीसी न्यूज - सराईत गुंडाने घरात घुसून मारहाण केल्याने जखमी झालेल्या ज्येष्ठ नागरिकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. नरेशदास गुप्ता (वय-72, रा.गुरुद्वारा कॉलनी, लोहगाव), असे मृत्युमुखी पडलेल्या ज्येष्ठ नागरिकाचे नाव आहे. पोलिसांनी याप्रकरणी मनोज रवी साळवी उर्फ चोरमन्या (वय-26, ओव्हाळवस्ती, लोहगाव) या आरोपीला अटक केली आहे.  

याप्रकरणी अधिक माहिती अशी की, आरोपीने रविवारी दारूच्या नरेशदास यांच्या घरात जबरदस्तीने प्रवेश करत त्यांना प्लास्टिक पाईप आणि लाकडाने मारहाण केली होती. यामध्ये गंभीर जखमी झाल्याने त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू होते. मयताची पत्नी इंदुबाई गुप्ता यांनी दिलेल्या फिर्यादनुसार विमानतळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.  

दरम्यान, उपचार सुरू असताना बुधवारी सकाळी नरेशदास गुप्ता यांचा मृत्यू झाला. विमानतळ पोलिसांनी याप्रकरणी आरोपीवर खुनाचा गुन्हा दाखल करत त्याला थेऊर फाटा नायगाव येथून ताब्यात घेतले. याप्रकरणी अधिक तपास सहायक पोलीस निरीक्षक प्रताप कोलते करीत आहेत.

Read 48 times

Like what you see?

Close

Hit the buttons below to follow us

0
Shares