• mahesh_kale_1250by200.jpg
12 Jan 2018

Bhosari : भोसरी एमआयडीसीतील कंपनीला आग

एमपीसी न्यूज - भोसरी एमआयडीसीमधील एका कंपनीला आज (शुक्रवार) पहाटे चारच्या सुमारास आग लागल्याची घटना घडली. सुदैवाने या आगीत कोणीही जखमी झाले नसले तरी ही आग कशामुळे लागली हे समजू शकले नाही.

भोसरी एमआयडीसीमधील टी ब्लॉकमध्ये असलेल्या भोसरी एमआयडीसीतील टी ब्लॉकमध्ये असलेल्या हायटेक मेटल प्रोसेसर या कंपनीत आज सकाळी चारच्या सुमारास आग लागली. आगी घटना समजताच भोसरी अग्निशमन आणि पिंपरी अग्निशमन दलाच्या दोन गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. परंतु आग मोठ्या प्रमाणात असल्याने आणखी एका बंबाला याठीकाणी पाचारण करण्यात आले.

दोन तासांच्या प्रयत्नानंतर अग्निशमन दलाच्या जवानांना आगीवर नियंत्रण मिळवता आले. सध्या या ठिकाणी कुलींगचे काम सरु आहे.

Read 169 times Last modified on Friday, 12 January 2018 04:53

Like what you see?

Close

Hit the buttons below to follow us

0
Shares