• mahesh_kale_1250by200.jpg
12 Jan 2018

Pune : पुण्यात एक लाखाचे ब्राउन शुगर जप्त





एमपीसी न्यूज - पुण्यातील वानवडी परिसरातून 95 हजार रुपयांची 19 ग्रॅम ब्राउन शुगर जप्त करण्यात आली. या प्रकरणी एकाला अटक करण्यात आली आहे. ही कारवाई अमली पदार्थ विरोधी पथकाने केली.


महादेव मधुकर हुंबरे (रा. रामटेकडी, पुणे) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.

अमली पदार्थ विरोधी पथकाने हुंबरे याला ताब्यात घेऊन त्याची अंगझडती घेतली. त्यावेळी त्याच्याकडे 95 हजार रुपयांचे 19 ग्रॅम ब्राउन शुगर मिळाली. त्याला अटक करुन पुढील तपासासाठी वानवडी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

Read 85 times Last modified on Friday, 12 January 2018 04:31

Like what you see?

Close

Hit the buttons below to follow us

0
Shares