• 1250-x200.jpg
  • Advt-Baba-Tripbhun.jpg
  • Advt-Laxman-saste.jpg
  • Advt-Nitin-Kalje.jpg
  • IMG-20171212-WA0093.jpg
  • Vaishali-Kalbhor.jpg
  • Vishal-Kalbhor.jpg
07 Dec 2017

Dehugaon: भर रस्त्यात नातेवाईकासमोरच तरुणाकडून तरुणीचा विनयभंग
एमपीसी न्यूज - नातेवाईकासोबत दुचाकी वरुन जाणा-या मुलीला रस्त्यात अडवून माझ्याशी लग्न कर असे म्हणून शिवीगाळ करत तरुणाने 25 वर्षीय तरुणीचा विनयभंग केला आहे. ही घटना बुधवारी (दि.6) सायंकाळी पाच वाजता घडली.

याप्रकरणी पिडीतेने अझिम मिर्झा (वय 27 रा. अमरावती) याच्या विरोधात देहुरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पिडीता ही तिच्या मामाच्या मुलासोबत दुचाकीवरून देहुगाव येथील पीएमटी बसस्टॉपजवळून जात असताना तरुणाने तिला अडवले व लग्न कर असे म्हणत तरुणीला भररस्त्यात शिवीगाळ करीत विनयभंग केला. त्यामुळे पीडित तरुणीने देहुरोड पोलीस ठाण्यात संबंधित तरुणाच्या विरोधात विनयभंगाची तक्रार दिली आहे.

आरोपी फऱार असून देहूरोड पोलीस पुढील तपास करत आहेत.

Read 97 times