• 1250-x200.jpg
  • Advt-Baba-Tripbhun.jpg
  • Advt-Laxman-saste.jpg
  • Advt-Nitin-Kalje.jpg
  • IMG-20171212-WA0093.jpg
  • Vaishali-Kalbhor.jpg
  • Vishal-Kalbhor.jpg
07 Dec 2017

Pimpri: बापलेकांनी सेल्स एक्झिक्युटिव्हच्या मदतीने फायनान्स कंपनीला घातला 20 लाखांचा गंडा
एमपीसी न्यूज - कर्ज घेऊन एकही हप्ता न भरता बापलेकांनी एका फायनान्स कंपनीला 20 लाखांचा गंडा घातला आहे. या प्रकारात संबंधित कंपनीचा सेल्स एक्झिक्युटिव्ह देखील सहभागी असल्याचे निदर्शनास आले आहे.

बापु कोंडीबा साबळे (वय 54) तेजस बापु साबळे (वय 30 दोघेही राहणार निगडी) अशी या बापलेकाची नवे असून आशिक अशोक माटे (वय 27 रा. इंद्रायणीनगर, भोसरी) असे संबंधित सेल्स एक्झिक्युटिव्हचे नाव आहे. या तिघांच्या विरोधात फायनान्स कंपनीचे कर्मचारी यश सिंघाई यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फायनान्स कंपनीच्या सेल्स एक्झिक्युटिव्हच्या मदतीने साबळे बापलेकानी बनावट कागदपत्रे बनवुन 23 मार्च 2016 रोजी कंपनीकडून 17 लाख 56 हजार 688 रुपयांचे कर्ज घेतले. मात्र आजपर्यंत एकही हप्ता न देता फायनान्स कंपनीची व्याजासह 20 लाख 13 हजार 396 रुपयांची फसवणूक केली आहे. तिघांच्या विरोधात आर्थिक फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला असून पिंपरी पोलीस तपास करत आहेत.

Read 86 times